पंजाबमधील प्रसिद्ध गायक तथा काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या ट्रकवरील पोर्ट्रेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो मूळचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील असून या फोटोच्या निमित्ताने पाकिस्तामधील ट्रक आर्टची चर्चा होत आहे. पाकिस्तानमधील या ट्रक आर्टची सुरुवात कशी झाली? या आर्टचा विकास कसा झाला? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांचे पोर्ट्रेट असेलेले ट्रक ३० वर्षीय शाहजबाज भट्टी यांचे असून ते मूळचे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रहिवासी आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूच्या सोशल मीडियावर भारतीय देवतांचे फोटो! जाणून घ्या केशव महाराजचे उत्तर प्रदेश कनेक्शन

पाकिस्तानमध्ये ट्रक आर्टला महत्त्व का आहे?

पाकिस्तानमध्ये ट्रक आर्टला खूप महत्त्व आहे. येथे अनेक ट्रक्सवर तेथील नेते तसेच गायक यांचे पोर्ट्रेट पाहायला मिळेल. भारत देशातील अनेक अभिनेत्रींचेदेखील पोर्ट्रेट येथे पाहायला मिळतील. ट्रकवर पोर्ट्रेटच्या माध्यमातून फक्त गायक, अभिनेते तसेच मोठ्या राजकीय नेत्यांना स्थान मिळते. याबाबत ६५ वर्षीय पेंटर असलेल्या नाजी नाझ यांनी सविस्तर सांगितले आहे. त्यांनी जवळपास पाच दशके ट्रक्सवर पोर्ट्रेट काढण्यात घालवले आहेत. “माझ्या कारकिर्दीमध्ये मी ट्रकवर शेकडो पोर्ट्रेट काढले. लोकांना जनरल अयुब खान, जनरल राहील शरीफ, कवी अल्लामा इक्बाल तसेच इम्रान खान या बड्या व्यक्तींचे पोर्ट्रेट ट्रकवर आवडते. ट्रकवर गायक अता उल्लाह खान तसेच नुसरत फतेह अली खान यांचे पोर्ट्रेटदेखील मोठ्या उत्साहाने काढले जातात. अजूनदेखील आम्हाला जनरल अयुब खान, स्वातंत्र्यसैनिक अब्दुल गफार खान तसेच बेनझीर भुत्तो यांचे पोर्ट्रेट काढण्यासाठी ऑर्डर मिळतात,” असे नाझ यांनी सांगितले. काही ट्रकचालक तर त्यांच्या परिवाराचे पोर्ट्रेट आपल्या ट्रकवर काढून घेतात असेही नाझ यांनी सांगितले.

दिव्या भारती

हेही वाचा >>> विश्लेषण : आशिया चषक फुटबॉलसाठी भारत पुन्हा पात्र… आता कोणती आव्हाने?

मुसेवाला यांचे पोर्ट्रेट खास का आहे?

मुसेवाला यांचे पोर्ट्रेट पाकिस्तामधील ट्रकचालकांसाठी खास का आहे, याबाबतही पेंटर नाझ यांनी सांगितले आहे. “पाकिस्तानी ट्रक्सवर अभिनेत्री दिव्या भारती, ऐश्वर्या राय, ममता कुलकर्णी अशा भारतीय व्यक्तींचे पोर्ट्रेट अजूनही काढले जाते. मात्र सिद्धू मुसेवाला हे एकमेव भारतीय शिख धर्मिय असावेत ज्यांना ट्रक आर्टमध्ये स्थान देण्यात आलं. अजूनदेखील मी दिव्या भारती यांचे ट्रकवर पोर्ट्रेट काढतो,” असे नाझ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण : राज्यात ठेवी-कर्ज गुणोत्तराचा असमतोल का दिसतो?

मुसेवाला यांच्या पाकिस्तानमधील प्रसिद्धीविषयी ट्रकवर पोर्ट्रेट काढणाऱ्या पेंटरचा मुलगा रिझवान मुघल याने सांगितले. “सिद्धू मुसेवाला यांच्या जीवनातील संघर्षामुळे लोकांना ते जवळचे वाटतात. इकडे पंजाबी गीतांना खूप पसंद केले जाते. मुसेवाला यांनी २०२२ सालाच्या शेवटी एकदा पाकिस्तानमधील लाहोर आणि इस्लामाबाद येथे गाण्याचा कार्यक्रम घेण्याचे वचन येथील लोकांना दिले होते. मात्र त्यांची हत्या झाली,” असे रिझवान मुघल याने सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण : बिहारमध्ये रेल्वे गाड्यांचे नुकसान; सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत कायदा काय सांगतो?  

ट्रक आर्टची सुरवात कधी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार ट्रक आर्टची सुरुवात पाकिस्तानमधील पेशावर येथे १९५० साली झाली. ट्रकला अधिक सुशोभित करण्याच्या उद्देशाने या आर्टची सुरुवात झाली. कालांतराने या ट्रक आर्टला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली. २०१९ साली युनेस्कोने पाकिस्तानमधील कोहीस्तान जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समजाऊन सांगण्यासाठी या ट्रक आर्टचा उपयोग केला होता.

हेही वाचा >>> विश्लेषण : कोळशाचा सर्वात मोठा निर्यातदार असूनही ऑस्ट्रेलियात विजेचं महासंकट; जाणून घ्या नेमकी कारणे

१९५२ साली या कलेला सुरुवात झाली

एजाज उल्लाह मुघल याचे दिवंगत वडील हबीब हे रावळपींडी येथे जुन्या ट्रकवर पोर्ट्रेट काढणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. १९५६ सालापासून ते ट्रकवर पोर्ट्रेट काढायचे. त्यावेळी पाकिस्तान नॅशनल काऊन्सिल ऑफ आर्ट्स (PNCA)चे अधिकारी ट्रक आर्टची मस्करी करायचे. मस्करीचे प्रसंग अजूनही एजाज मुघल यांच्या स्मरणात आहेत. “१९५२ साली काही स्थानिक कलाकारांनी नंबर प्लेट तसेच लाकडावर कोरीव काम करुन ट्रकला सुशोभित करण्यास सुरुवात केली. हीच कला नंतर जगभरात पोहोचली. यूकेमधील कंपन्यांनी बेडफोर्ड ट्रकचे उत्पादन घेणे थांबवले. मात्र ट्रक आर्टमुळे पाकिस्तानमधील हे ट्रक अजूनही नवेच दिसतात. ट्रक आर्ट करणाऱ्या या कलाकारांना कोणीही शिकवलेले नाही. त्यांनी ही कला स्वत:च आत्मसात केलेली आहे,” असे एजाज मुघल यानी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण : रेव्हलॉनवर दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ का आली?

मोजकेच ट्रक आर्टिस्ट हयात आहेत

तसेच, “सध्या ट्रक आर्टसाठी काही लोक एका लाखापासून ते २० लाख रुपये (पाकिस्तानी चलन) खर्च करतात. मात्र सध्या ट्रक आर्ट मरणपंथावर आहे. पेशावर, रावळपींडी, कराची येथे सध्या मोजकेच ट्रक आर्टिस्ट हयात आहेत. या मोजक्याच कलाकारांना खरी ट्रक आर्ट माहिती आहे,” असेदेखील मुघल यांनी सांगितले.

काही ट्रक चालकांककडे तर सोन्याच्या चाव्या असायच्या

रावळपींडी येथील ट्रक आर्टिस्ट तारिक उस्ताद १९७१ सालापासून रावळपींडी येथे ट्रकवर पोर्ट्रेट काढण्याचे काम करतात. यांनीदेखील हेच सांगितले. “ट्रक आर्ट सुरुवातीला खूप सोपी होती. आम्ही एका दिवसात पाच पाच ट्रक्सवर पोर्ट्रेट काढायचो. आता मात्र पाच दिवसांत एकाच ट्रकवर पोर्ट्रेट काढता येते. त्या काळात काही ट्रक चालकांककडे तर सोन्याच्या चाव्या असायच्या. ट्रक आर्ट आता क्लिष्ट होत चालली आहे,” असे उस्ताद यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण : विकास मंडळे म्हणजे काय? त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने कोणते प्रश्न निर्माण झाले?

तसेच, “पाकिस्तानमधील पंजाब आणि खैबर पख्तुनवाला या काही भागातच ट्रक आर्ट दिसून येते. कारण येथील लोकांना ट्रक चालवायला अजूनही आवडते. या कलेचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ट्रकला एखाद्या नवरीसारखे सजवायचे आमचे काम आहे. या कामाचे जतन केले पाहिजे,” असे बहार अली या दुसऱ्या एका ट्रक आर्टिस्टने सांगितले.