गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’, चित्रपटाचा दिग्दर्शक गेली १० वर्ष या चित्रपटावर काम करताना दिसून येत आहे. हा चित्रपट इतर बॉलिवूडच्या कथानकांपेक्षा वेगळा आहे. या चित्रपटात व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरले गेले आहे. ज्यामुळे चित्रपट भव्यदिव्य वाटत आहे. चित्रपटातील हे तंत्रज्ञान गेली अनेकवर्ष बॉलिवूड, हॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये वापरले जात आहे. अगदी शेखर कपूर यांच्या ‘मिस्टर इंडियापासून ते अलिकडच्या काही वर्षातील ‘झिरो’, ‘बाहुबली’, ‘रा वन’, ‘क्रिश’ सारख्या चित्रपटांमध्ये वापरण्यात आले आहे. या तंत्रामुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळते. मराठी चित्रपटांमध्येदेखील आज या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

व्हीएफएक्स म्हणजे एखादा चित्रपट चित्रित करताना वास्तविक अश्या काही गोष्टी चित्रित करणे शक्य नसते ते संगणकाच्या साहाय्याने रंगवून त्या फ्रेममध्ये ती गोष्ट जोडणे. चित्रपटात प्रत्यक्ष्य चित्रीकरण करताना काही दृश्ये खूप धोकादायक, खर्चिक, वेळ घेणारे ठरू शकतात अश्या ठिकाणी व्हीएफएक्स प्रामुख्याने वापरले जाते. या तंत्रज्ञानाचा इतिहास असा आहे की १८५७ मध्ये, ऑस्कर रेजलँडरने जगातील पहिली “स्पेशल इफेक्ट” प्रतिमा तयार केली. ज्यात एका प्रतिमेमध्ये ३२ निगेटिव्हचे वेगवेगळे भाग एकत्र केले होते. १८९५ मध्ये, आल्फ्रेड क्लार्कने प्रथम मोशन पिक्चर स्पेशल इफेक्टचा वापर केला होता असे मानले जाते.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

व्हीएफएक्स प्रकार :

ग्रीन स्क्रीन

सर्वात जास्त वापरात येणारी ही व्हीएफएक्स पद्धत, बाहुबलीच्या मेकिंग व्हिडिओमधून हा प्रकार पहिला असेल. यामध्ये फ्रेममध्ये ग्रीन स्क्रीन बसवली असते, त्या स्क्रीनवर संगणकाच्या साहाय्याने आपल्याला पाहिजे ते टाकता येते. कथा किंवा आभासी जगात कल्पित घटनांचे अनुकरण दाखवण्यासाठी याचा हमखास उपयोग केला जातो. व्हिज्युअल इफेक्ट कलाकार अशी साधने वापरतात जी “वास्तविक” आणि “अवास्तव” मधील रेषा एकत्र करण्याच्या सर्व क्षमतांमध्ये मदत करतात.

अॅनिमेशन:

अॅनिमेशन म्हणजे कठपुतळी किंवा मानवांच्या प्रतिमांचे चित्र तयार करून त्याला तंत्राची जोड दिली जाते, जेणेकरून कार्टून मालिकेत आपण पाहतो त्याप्रमाणे ते हलतात आणि कार्य करतात. प्रामुख्याने कार्टून मालिकांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ‘टॉम अँड जेरी’ या कार्टूनपासून ते ‘शिनचॅन’ सारख्या कार्टून मालिकांपर्यंत, कॉम्पुटरमधील विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने हे शक्य आहे.

विश्लेषण : नक्षलग्रस्त गडचिरोलीत आता नरभक्षक वाघांचा धुमाकूळ? काय आहेत कारणे?

CGI :

CGI चा संपूर्ण अर्थ (Computer Graphics Image) हे तंत्र आजकालच्या सर्व चित्रपटांमध्ये वापरले जात आहे. CGIचा वापर हा चित्रपटातील एखादे पात्र, सीन,यामध्ये जर स्पेशल इफेक्ट्स द्यायचे असतील तर तेव्हा या तंत्राचा वापर केला जातो तसेच हे तंत्रज्ञान जाहिरात, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, आभासी वास्तव या मध्ये देखील वापरले जाते. एखादा सेटदेखील तुम्ही कॉप्म्युटरमध्ये तयार करू शकता. या सॉफ्टवेअरची इतकी क्षमता असते की कॉप्म्युटरमध्ये तयार केलेला सेट हा खरा आहे की खोटा आहे पटकन ओळखू येत नाही

कंपोझिटिंग आणि ग्रीन स्क्रीन :

कंपोझिटिंग म्हणजे

कंपोझिटिंग म्हणजे विविध visual घटकांचे एकत्रीकरण करून एक प्रतिमा तयार करणे. म्हणजे बघणाऱ्या माणसाला एकच प्रतिमा पाहतो आहे असे वाटेल. यात क्रोमा हे आणखीन एक तंत्र वापरले जाते ज्यात एका पडद्यासमोर सीन चित्रित केला जातो. हा पडदा सामान्यतः निळा अथवा हिरवा असतो.

ग्रीन स्क्रीन वि. निळा पडदा :

चित्रीकरणादरम्यान सेटच्यामागे हिरवा पडदा वापरला जातो. तथापि, निळा पडदा हा वस्तू किंवा लोक लपविण्यासाठी मदत करतो. थेट-अ‍ॅक्शन आणि अॅनिमेटेड चित्रपटांसाठी हे सर्वात योग्य आहे. इरफान खानच्या ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटात निळा पडदा वापरला गेला होता.

मोशन कॅप्चर :

या तंत्रात, तुम्ही अभिनेत्याच्या हालचाली रेकॉर्ड करता आणि ती माहिती तुम्ही कॉम्पुटरला ती पाठवली जाते. जेणेकरून डिजिटल कॅरेक्टर मॉडेल अॅनिमेट केले जाते. जेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर आणि बोटांवरचे भाव कॅप्चर करता तेव्हा त्याला परफॉर्मन्स कॅप्चर म्हणतात. चित्रपट आणि व्हिडिओग्राफीमध्ये, मोशन ट्रॅकिंगला मॅच मूव्हिंग म्हणून संबोधले जाते. मॅच मूव्हिंगचा वापर हा जर अभिनेत्याच्या हालचाली हिरव्या पडद्याच्या विरोधात असतील तर याचा वापर केला जातो. चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये याचा वापर केला जातो

व्हीएफएक्सचा वापर ऐतिहासिक, जुन्या काळाचा संदर्भ असणाऱ्या चित्रपटात केला जातो. हल्ली जितके जुन्या काळावर आधारित चित्रपट बनतात त्यामध्ये व्हीएफएक्सचा वापर आढळेल. व्हीएफएक्सचा वापर करण्याचे ठिकाण म्हणजे साहसदृश्ये चित्रण करताना. जिथे ते चित्रित करताना एखादाच्या जीवाला धोका पोहचवू शकतो तिथे शक्यतो व्हीएफएक्सचा वापर केला जातो. व्हीएफक्स हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रामुख्याने अॅडोब आफ्टर इफेक्ट, मॅक्सन सिनेमा 4D, ऑटोडेस्क माया, सिंथेस 3Ds मॅक्स अशा सॉफ्टवेअरर्सचा वापर केला जातो.

विश्लेषण : महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला धाडल्याचे प्रकरण का ठरतेय वादग्रस्त?

उत्तम उदाहरणं :

‘मेट्रिक्स’ या चित्रपटाची चर्चा आजही होते. या चित्रपटातील व्हीएफएक्स पाहून आजही थक्क व्हायला होते. या चित्रपटात बुलेट टाइमचे तंत्र वापरणारे एक अनोखे दृश्य आहे. यासाठी अनुक्रमाने ट्रिगर केलेले ११२ कॅमेरे वापरले होते. ‘मॅन ऑफ स्टील’ (२०१३) या चित्रपटात, आपण सुपरमॅनला आकाशाच्या विशाल विस्तारावर उडताना पाहिले. तथापि, आपल्याला प्रत्यक्षात हिरव्या पडद्यावर चित्रित केलेले दृश्य सापडते. तारांच्या साहाय्याने उडण्याच्या कृतीची नक्कल करण्यात आली. ‘द डार्क नाइट’ (२००८) या चित्रपटात अॅरॉन एकहार्टला स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने त्याचा चेहरा भयानक पदतीने दाखवण्यात आला होता. टायटॅनिकसारखा ऑस्कर विजेत्या चित्रपटात मोठया प्रमाणावर तंत्राचा वापर केला होता. एक स्विमिंग पूलमध्ये याचे चित्रीकरण करण्यात आले होते. ‘बाहुबली’ चित्रपटाचा तर ९० % भाग हा व्हीएफएक्स तंत्राने चित्रित केला होता. आजकाल सध्या चित्रपटांपेक्षा वेबसिरीजची चर्चा जास्त आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘स्ट्रेन्जर थिंग्स’ अगदी अनुराग कश्यपच्या ‘सॅक्रेड गेम्समध्येदेखील’ याचा वापर केला गेला आहे.

आज चित्रपटांमध्ये जे भव्यदिव्य सेट्स बघतो ते खरं तर एका खोलीत अथवा स्टुडिओमध्ये चित्रित केलेले असते. व्हीएफएक्स हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस आधुनिक होत असल्याचे दिसून येत आहे. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे साधन आहे. आज जगभरातून या तंत्रज्ञानाला मागणी आहे. परदेशात हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत.