ओमाक्रॉनची जगभरातील दहशत आणि वेगाने पसरत असलेल्या या कोविड-१९ प्रकारामुळे सध्या लोकांच्या मनात या आजाराबाबत भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत भारतात ओमायक्रॉनची २०० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना सातत्याने इशारा दिला जात आहे. दरम्यान, संपूर्ण अमेरिकेमध्ये ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत असताना, डेल्टासह इतर करोना व्हायरस प्रकारांमधील या नवीन प्रकाराची लक्षणांवरील उपचारांसाठी अमेरिकेतील लोक धावपळ करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुतेक पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचण्यांमधून ओमायक्रॉनचा शोध घेतला जाऊ शकतो. प्राथमिक डेटा काही लक्षणांमधील फरक सूचित करतो, पण तज्ञांना खात्री नाही की ते अर्थपूर्ण आहेत की नाही. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या खाजगी आरोग्य विमा कंपनीकडून गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की ओमायक्रॉन असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये नाक बंद होणे, कोरडा खोकला आणि स्नायू दुखणे, विशेषत: पाठदुखी, किंवा घसा खवखवणे यासह पुरळ उठण्याची लक्षणे आहेत.

पण ही सर्व डेल्टा आणि मूळ करोना व्हायरसची लक्षणे आहेत, असेही पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील नर्स प्रॅक्टिशनर अ‍ॅशले जेड रिटर यांनी सांगितले. ओमायक्रॉनचा केवळ तीन आठवड्यांपासून प्रसार होत असल्याचे लक्षात घेऊन त्या म्हणाल्या की, “ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि मागील व्हेरिएंटमधील लक्षणांमध्ये काही फरक आहे की नाही हे सांगणे खूप घाईचे ठरेल.” अशी शक्यता आहे की ओमायक्रॉनची लक्षणे डेल्टासारखी असतील असेही म्हटले जात आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस येथील डेव्हिड गेफेन स्कूलमधील संसर्गजन्य रोग चिकित्सक डॉ. ओटो ओ. यांग म्हणाले की, “ओमायक्रॉन आणि पूर्वीच्या प्रकारांमध्ये बहुधा मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅप आहे, कारण ते मूलत: समान गोष्ट करत आहेत. जर काही फरक असतील तर ते कदाचित अगदी सूक्ष्म असतील.”

एक संभाव्य फरक असा आहे की ओमायक्रॉनची चव आणि वास कमी होण्याची शक्यता पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा कमी असू शकते.. संशोधनात असे दिसून आले आहे की मूळ SARS-CoV-2 स्ट्रेन असलेल्या ४८ टक्के रूग्णांनी वास कमी झाल्याची तक्रार नोंदवली आणि ४१ टक्के रूग्णांनी चव कमी झाल्याची तक्रार नोंदवली. पण नेदरलँड्समध्ये लसीकरण केलेल्या लोकांमध्ये एक लहान ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव होता. विश्लेषणात असे आढळून आले की केवळ २३ टक्के रुग्णांनी चव कमी झाल्याची नोंद केली आणि फक्त १२ टक्के रुग्णांनी वास कमी झाल्याचे नोंदवले. मात्र हा फरक ओमायक्रॉन किंवा लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये आहे का हे स्पष्ट नाही.

अनेक करोनाची लक्षणे एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या लसीच्या स्थितीनुसार बदलतात. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या मेयर्स कॉलेज ऑफ नर्सिंगमधील सहाय्यक प्राध्यापक क्लार्क-कुटाया म्हणाल्या की, डेल्टा किंवा मूळ करोना व्हायरसची लसीकरण केलेल्या रूग्णांना डोकेदुखी, रक्तसंचय, अंगदुखीसारखी लक्षणे दिसून येतात. तर लसीकरण न झालेल्या रूग्णांमध्ये फ्लूसारख्या लक्षणांसह श्वासोच्छवास आणि खोकला होण्याची शक्यता असते.

क्लार्क-क्युटियांनी सांगितले की त्यांनीने पेनसिल्व्हेनियामध्ये ओमायक्रॉनच्या रूग्णांशी संवाद साधला असता त्यांच्यामध्ये डेल्टासारखीच लक्षणे दाखवत आहेत. लसीकरण केलेले ओमायक्रॉन रूग्ण डोकेदुखी, अंगदुखी आणि तापाची तक्रार करतात. श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि फ्लू सारखी लक्षणे डेल्टा आणि मूळ करोना व्हायरस असलेल्या लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये दिसतात.

ओमायक्रॉन आणि इतर प्रकारांमधील आणखी एक फरक म्हणजे एखादी व्यक्ती ओमायक्रॉनच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठी, संसर्गजन्य होण्यासाठी आणि चाचणी सकारात्मक होण्यासाठी चार ते सहा दिवसांच्या तुलनेत किमान तीन दिवस लागतात असे संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण संचालक डॉ. वालीद जावेद म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेतील गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार, लसीकरणाची स्थिती नियंत्रित आल्यानंतर, ओमाक्रॉनचे निदान झालेल्या प्रौढांसाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण प पहिल्या लाटेपेक्षा २९ टक्के कमी होते आणि दक्षिण आफ्रिकेतील कोविड-१९ रुग्णांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल दाखल करण्याची शक्यता कमी होती.

पण दक्षिण आफ्रिकेची निरीक्षणे अमेरिका आणि इतर देशांना लागू होणार नाहीत. बहुतेक दक्षिण आफ्रिकन लोकांना आधीच कोविड-१९ ची लागण झाली आहे. निरीक्षणांवरून असेही दिसून आले आहे की, जरी मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात, पण पहिल्या लाटेच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या लाटेदरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता २० टक्के जास्त होती.

“असे लोक आहेत ज्यांना ओमायक्रोनमुळे गंभीर आजार होतो. सुरुवातीला सौम्य लक्षणे नंतर गंभीर लक्षणांमध्ये विकसित होऊ शकतात, म्हणून सर्दी किंवा फ्लू सारखी लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी घेणे आणि घरी राहणे महत्त्वाचे आहे,” असे जावेद म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what are the covid 19 omicron variant symptoms abn
First published on: 23-12-2021 at 16:54 IST