राज्यात गेले १० दिवस सुरु असलेले राजकीय नाट्य अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, भारतीय जनता पक्षाने एकाच बाणाने दोन नव्हे तर तीन बळी घेतले आहेत. त्यामुळे या राजकीय घडामोडीतून भाजपाला फायदा झाला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भाजपाने ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री’ हटवल्याच्या उद्धव ठाकरेंच्या युक्तिवादावर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करुन पहिले प्रत्युत्तर दिले आहे. दुसरे म्हणजे, भाजपा आपल्या मित्रपक्षांची काळजी घेते, असा मोठा संदेश यातून दिला गेला आहे. तसेच, याच्या मदतीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा मोठा राजकीय खेळ खेळू शकतो. त्यामुळे आता वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

विश्लेषण : उद्धव ठाकरे यांना राजीनामा का द्यावा लागला?

उद्धव ठाकरे यापुढे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण करू शकतील का?

यातून भाजपाने आता उद्धव यांच्यासमोर आणखी एक समस्या निर्माण केली आहे. उद्धव ठाकरे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सहानुभूती किंवा राजकीय फायदा घेऊ शकणार नाहीत. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, उद्धव यांना हटवण्याचा हा एकमेव मार्ग होता. भाजपासाठी हा एक प्रकारे सूड आहे तसेच भविष्यासाठी एक सुरक्षितताही आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेणार आहेत. पुढील राजकीय आणि कायदेशीर लढाईत त्यांना आमची साथ हवी असल्याने ते भाजपाशी एकनिष्ठ राहतील.

शिवसेनेला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न

भाजपाच्या रणनीतीकारांच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला खात्री आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक आमच्या बाजूने असतील. उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे सेना अधिक ताकदवान म्हणून उदयास येईल. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांना फारसा वेळ उरलेला नाही. अशा स्थितीत शिवसेनेलाही वेळीच सावरणे कठीण होणार आहे.

व्हिडीओ पाहा –

विश्लेषण : संख्याबळ नाट्यात राज्यपालांच्या अधिकारांचे महत्त्व काय असते?

मराठा नेतृत्वाची बाजू भक्कम

एकनाथ शिंदे हे मराठा नेते आहेत. अशा स्थितीत भाजपाला राज्यातील ३० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचणेही सोपे जाईल. गेल्या सरकारमध्ये भाजपाला मराठा आरक्षण आंदोलनाला सामोरे जावे लागले होते. तसेच पक्षाने ब्राह्मण चेहऱ्याची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याने समाज संतप्त झाला होता. भाजपाला असा विश्वास आहे की ते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने मराठा आणि ओबीसींना आकर्षित करू शकतात. कारण दोन्ही समाजांना शिवसेनेचा भक्कम पाठिंबा आहे.