चीन सरकारचे वादग्रस्त ‘शून्य कोविड धोरण’ आणि सरकार लागू करत असलेल्या लॉकडाऊनविरोधात देशभरात उसळलेला जनउद्रेक कायम असून हे आंदोलन थोपावण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असताना, आता हे शून्य कोविड धोरण शिथिल करण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आणि त्यासोबतच काहीशी वाढती धाकधूक अशी संमिश्र अवस्था असलेच्या चीनच्या नागरिकांचे आता या निर्णयाचे आरोग्यावर काय परिणाम होणार आणि वैद्यकीय व्यवस्थेवर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर संशोधकांनी विश्लेषण केले आहे की, जर हे पूर्णपणे उघडले तर देशात किती मृत्यू होऊ शकतात. कारण, देशातील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असणासा लसीकरण दर आणि लोकांमधील प्रतिकारशक्तीचा अभाव हे सर्वात हे दोन अतिशय गंभीर मुद्दे आहेत. शुक्रवारपर्यंत चीनमध्ये ५ हजार २३३ कोविड संबंधित मृत्यू आणि लक्षणांसह ३३१,९५२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

… तर दोन दशलक्ष पेक्षाही जास्त मृत्यू होऊ शकतात –

दक्षिण-पश्चिम गुआंग्शी प्रदेशातील रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख झोउ जियाटोंग यांनी मागील महिन्या शांघाय जर्नल ऑफ प्रव्हेंटेव्ह मेडिसनने प्रकाशित केलेल्या एका पेपरमध्ये म्हटले होते की, मुख्य भूभाग असणाऱ्या चीनने जर हाँगकाँगप्रमाणेच कोविड प्रतिबंध कमी केले तर दोन दशलक्षाहून अधिक मृत्यूंना सामोर जावे लागू शकते. याशिवाय संक्रमण २३३ दशलक्षांपेक्षा जास्त प्रमाणात वाढू शकते, असाही अंदाज दर्शवला गेला आहे.

नेचर मेडिसनमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, मे महिन्यात चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला होता की, जर चीनेने कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय जसे की लसीकरण आणि योग्य उपचाराचा शोध घेतल्याशिवाय आपले शून्य कोविड धोरण सोडले तर केवळ दीड दशलक्ष मृत्यूंचा धोका आहे. तर लसीकरणावर लक्ष दिले तर मृत्यूंची संख्या कमीही होऊ शकते असेही चीनमधील फुदान विद्यापीठातील प्रमुख संशोधकांनी सांगितले आहे.

तर कमी लसीकरण आणि बूस्टर दर दर तसेच प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे चीनने शून्य कोविड धोरण मागे घेतल्यास १.३ दशलक्ष ते २.१ दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटिश वैज्ञानिक माहिती आणि विश्लेषण कंपनी एअरफिनिटीने सांगितले आहे.

‘शून्य कोविड धोरण’ काय आहे? –

वुहानमध्ये २०१९च्या अखेरीस पहिला करोना संसर्ग झाला असावा. त्याचे गांभीर्य कळूनही संबंधित रुग्णाचे विलगीकरण करण्यात, किंवा संसर्ग थोपवण्यात चीन कमी पडला. या साथीची महासाथ होईस्तोवर चीनकडून नेमकी व पुरेशी माहिती जगाला कळाली नव्हती. कळाली तेव्हा फार उशीर झाला होता. कोविड रोखण्यासाठी टाळेबंदी, संचारबंदी असे उपाय भारतासह बहुतेक देशांनी सुरुवातीला राबवले. त्याचे सर्व भलेबुरे परिणामही दिसून आले. पण या बहुतेक देशांमध्ये एका मुद्द्यावर मतैक्य दिसून आले. तो मुद्दा म्हणजे, करोनाचा संसर्ग एका मर्यादापलीकडे पूर्णपणे थांबवणे शक्य नाही! या समजुतीला अपवाद ठरला चीन. संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी मानवी क्रियाकलाप आणि परस्पर संपर्कावर वाट्टेल तशी आणि तेव्हा बंधने आणणे हे चीनचे धोरण, यालाच सैलसरपणे ‘शून्य कोविड धोरण’ (झिरो कोविड पॉलिसी) असे संबोधले जाते.