चीनमध्ये करोनानंतर आता नव्या व्हायरसने चिंता वाढवली आहे. चीनमध्ये लांग्या हेनिपाव्हायरसचे (Langya Henipavirus) ३५ रुग्ण आढळले आहेत. चीनमधील ईशान्येकडील शँडोंग (Shandong) आणि हेनान (Henan) प्रांतामध्ये सर्वात प्रथम २०१८ मध्ये हा व्हायरस आढळला होता. गेल्या आठवड्यात अधिकृतपणे या व्हायसरची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व चीनमधील काही रुग्णांच्या घशातून घेतलेल्या नमुन्यांची चाचणी घेतली असता हा विषाणू आढळून आला. या रुग्णांना ताप आला असल्याने नमुने घेण्यात आले होते. रिपोर्टनुसार, रुग्णांमध्ये प्रामुख्याने शेतकरी आहेत, ज्यांना थकवा, खोकला, भूक न लागणे आणि वेदना अशी लक्षणं जाणवत आहेत. इतरांमध्ये रक्तपेशींमधील अडचणी आणि यकृत, मूत्रपिंड खराब होण्याची लक्षणंदेखील दिसली आहेत.

नव्या व्हायरसमुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.

लांग्या व्हायरस नेमका काय आहे?

हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. या प्रक्रियेला Zoonosis म्हणतात. शास्त्रज्ञांनी २०० हून अधिक श्रूजची (Shrews) चाचणी केली असून त्यांच्यात विषाणूजन्य आरएनए आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यामधूनच या व्हायरसची उत्पत्ती झाली असल्याचा अंदाज आहे. गार्डियनच्या वृत्तानुसार, दोन टक्के पाळीव शेळ्यांमध्ये आणि पाच टक्के कुत्र्यांमध्येही हा विषाणू आढळून आला आहे.

विश्लेषण : चीन आणि तैवानचं युद्ध झाल्यास भारताला बसणार मोठा फटका; स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, एसी महागणार

गेल्या आठवड्यात शास्त्रज्ञांनी नोंद केल्यानुसार, ‘चीनमधे हेनिपाव्हायरस व्हायरसचा शोध लागला आहे. श्रूजमध्येही हा व्हायरस आढळला आहे”. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये (NEJM) हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

लांग्या हेनिपाव्हायरसमध्ये सिंगल-स्ट्रँडेड आरएनए जिनोम आहे. या विषाणूंमुळे प्राणी आणि माणसांना गंभीर रोग होऊ शकतो. यामध्ये मृत्यू दर ४० ते ५० टक्के इतका आहे.

हेही वाचा – विश्लेषण : भारत सरकारविरुद्धच्या खटल्यावरुन ट्विटर आणि मस्क आमने-सामने; समजून घ्या संपूर्ण प्रकरण

जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं काय?

तैवानच्या सीडीसीचे (CDC) उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी या व्हायरसचा संसर्ग माणसांमधून माणसांना होत नाही. मात्र, सावध राहण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लांग्या हेनिपाव्हायरसचा संसर्ग प्राणी आणि माणसांमध्ये होऊ शकतो. दुर्लक्ष केल्यास याची गंभीर लक्षणंही दिसू शकतात.

आतापर्यंत या व्हायरसवर लस उपलब्ध झालेली नाही.

More Stories onहेल्थHealth
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is novel langya virus emerging from china sgy
First published on: 10-08-2022 at 16:23 IST