भारताचे शेजारील राष्ट्र बांगलादेशची परिस्थिती मागील काही दिवसांपासून खराब आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत, हजारो लोक रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत. अर्थव्यवस्था सातत्याने बिघडत आहे. विरोधी पक्षही सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडत नाही. विरोधकांनी सत्ताधारी अवामी लीग सरकारच्या राजीनाम्याची आणि संसद बरखास्त करण्याची मागणी केली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी(BNP)च्या नेतृत्वात हजारो आंदोलक मागील आठवड्यापासून राजधानी ढाका येथे सरकार बरखास्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

सरकारविरोधात तीव्र आंदोलन –

बीएनपी सातत्याने सरकारविरोधी मोर्चे काढत आहे. एक दशकाहून अधिक काळ बांगलादेशच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या शेख हसीना यांना पदावरून हटवण्याची संधी म्हणून ते या संकटाकडे पाहत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच सरकारविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनात एका व्यक्तीला जीवही गमावावा लागला आणि अनेकजण गंभीर जखमीही झाले होते.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

IMF कडे केली मदतीसाठी याचना –

बांगलादेशमधील परिस्थिती किती खराब झाली आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, अर्थव्यवस्ता स्थिर करण्यासाठी मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणनिधी(IMF) कडे मदतीसाठी याचना करावी लागली. आयएमएफनेही मदतीसाठी होकार दर्शवला. आयएमएफ बांगलादेशला ४.५ बिलियन डॉलरची (जवळपास ३७ हजार कोटी रुपये) आर्थिक मदत करणार आहे.

करोना महामारीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला, अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवरही दिसून आला. यानंतर रशिया-युक्रेन युद्धाने परिस्थिती अधिकच गंभीर बनवली. बांगलदेशच्या अर्थव्यवस्थेवर कापड निर्यात आणि तेलाच्या आयतीचा मोठा परिणाम होतो. बांगलादेशने जून २०२१ ते जून २०२२ दरम्यान ४२.६ बिलियन डॉलर्सच्या किंमतीचे कापड आणि इंधन आयत केले.

आता महामारीने दहा लाख लोकांना बेरोजगार केले आणि जेव्हा कापड उद्योग यावर्षी सकारात्मक संकेत दाखवत होते, तर जुलैमध्ये परदेसी कंपन्यांच्या मागणीत ३० टक्के घसरण झाली. कारण, अमेरिका, युरोप आणि अन्य देशातील ग्राहकांनी आर्थिक मंदीच्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर आपला खर्च कमी केला. एवढच नाही तर यावर्षी रेमिटेंसमध्येही १५ टक्के घसरण झाली. यामुळे जागतिक आर्थिक मंदीच्या कारणामुळे प्रवाशांवर दबाव आणि डॉलरची मजबुती आहे. हसीना यांच्या सरकारद्वारे या वर्षाच्या सुरुवातीच्या एक आठवड्यातच इंधन किंमतीत ५० टक्के वाढ करण्यात आल्याने, बांगलादेशमध्ये इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

परकीय चलन साठ्यात झपाट्याने घट –

कापड निर्यातीत घट झाल्याने बांगलादेशमधील पकरीय चलन साठा झपाट्याने घटत होत आहे. २०११ ते २०२१ पर्यंत बांगलादेशचे एकूण परदेशी कर्ज २३९ टक्क्यांनी वाढून ९१.४३ बिलियन डॉलर झाले आहे. विशेष म्हणजे याच काळात श्रीलंकेच्या कर्जात ११९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये चलनवाढीचा दर जवळपास ९ टक्क्यांवर पोहचला होता.