दिल्ली उच्च न्यायालयाने ‘शरबत दिल अफजा’ नावाचे पेय पदार्थाच्या उत्पादन आणि विक्रीवर तोपर्यंत स्थगिती लावली आहे. जोपर्यंत ‘रूह अफजा’ची निर्माता हमदर्द दवाखानाची याचिका निकाली निघत नाही. या याचिकेत हमदर्दने ट्रेडमार्कच्या कथित उल्लंघनाचा आरोप केला आहे. न्यायमूर्ती विभू बाखरू आणि न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, प्राथमिकदृष्ट्या ‘रूह अफजा’ एका शतकाहून अधिक काळापासून हमदर्दची ओळख बनलेला आहे आणि याने चांगली ओळख निर्माण केली आहे. खंडपीठाने सांगितले की स्पर्धकांनी या चिन्हापासून योग्य अंतर राखले आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे.

हमदर्दने अपील दाखल केले –

या अगोदर एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने ‘दिल अफजा’च्या निर्मात्यांना कथित ट्रेडमार्क उल्लंघनापासून रोखणारा अंतरिम आदेश देण्यास नकार दिला होता. या आदेशाविरोधात हमदर्द यांनी अपील दाखल केले. २१ डिसेंबरच्या आपल्या आदेशात न्यायालायने म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला ‘दिल अफजा’चे लेबल दिसल्यास त्याला ‘रूह अफजा’ची आठवण येईल. कारण अपजा शब्द सारखा आहे.

Indians are eligible for multi-entry Schengen visa for longer validity Why Changes in Schengen Visa Rules Matter
विश्लेषण : भारतीयांसाठी युरोपियन युनियनची भेट… शेंगन व्हिसाच्या नियमांमध्ये केलेले बदल महत्त्वाचे का?
Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?

रंग आणि बाटलीही सारखीच –

न्यायालयाने म्हटले की याशिवाय शरबताचा रंग आणि बाटलीही एकसारखीच आहे. त्यामुळे न्यायालयाने सांगितले की, याचिका निकाली निघेपर्यंत ‘दिल अफजा’ या चिन्हाखाली शरबत आणि शीतपेयांचे उत्पादन आणि विक्री करण्यास मनाई राहील.

या अगोदर पाकिस्तानी कंपनीने बनवलेला ‘रूह अफजा’ आपल्या भारतातील वेबसाईटवरून काढून टाकावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिले होते. ‘हमदर्द नॅशनल फाऊंडेशन’ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला होता. भारतातील ई-कॉमर्स वेबसाईटवर विकला जाणारा ‘रूह अफजा’ हा पाकिस्तानातील कंपनीत बनवण्यात आला असून त्यावर कंपनीची कोणतीही माहिती नाही, असे या याचिकेत सांगण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ‘रूह अफजा’ हे भारतीय नागरिक पेय म्हणून वापरत आहेत. इतके महत्त्वाचे प्रॉडक्ट कंपनीच्या माहिती शिवाय अॅमेझॉन कसे विकू शकतो? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला होता.

‘रूह अफजा’ नेमकं काय आहे? –

‘रूह अफजा’ हे युनानी पद्धतीने बनवलेले एक पेय असून त्यात थंड गुणधर्म असलेले पदार्थ आहेत. उत्तर भारतात उन्ह्याळ्यात या पेयाचा वापर केला जातो. २०व्या शतकाच्या सुरूवातीला त्याचा शोध लावण्यात आला होता. ‘रूह अफजा’ हे गुलाबी रंगाचं पेय असून फळ, गुलाब आणि आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करत ते बनवले जाते. ‘रूह अफजा’ हे थंड पाण्यात किंवा दुधात टाकूनही घेतात. तसेच फालुद्यातही याचा वापर केला जातो.