वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिर वादात आता आग्रा येथील ताज महलही चर्चेत आला आहे. ताजमहलबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात, जेणेकरून आत देवदेवतांच्या मूर्ती आणि शिलालेख आहेत की नाही हे कळू शकेल, असे म्हटले आहे.

ताजमहलच्या २२ खोल्या उघडण्याबाबत भाजपा नेते डॉ.रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल झाल्यानंतर या २२ खोल्यांच्या रहस्याबद्दल लोकांना उत्सुकता आहे. याचिका मान्य करून भविष्यात या २२ खोल्या उघडल्या गेल्या तर या खोल्यांमधून काय गूढ उकलणार? याबाबत सर्वाच्याच मनात उस्तुकता आहे.

nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Chief Minister eknath shinde order on BJPs letterhead ruled illegal by High Court
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…
bombay hc decision on petition filed by congress mla ravindra dhangekar over Development works in Kasba Constituency pune news
उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कसब्याच्या वाट्याला ‘भोपळा’च?

खरे तर फारसी, भारतीय आणि इस्लामिक स्थापत्यकलेच्या अनोख्या शैलीत बांधलेला ताजमहाल हे प्रेमाचे प्रतिक असल्याचे म्हटले जाते. असा दावा केला जातो की मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ यमुनेच्या काठावर पांढऱ्या संगमरवराने ही वास्तू बांधली होती. ताजमहाल जितका सुंदर आहे तितक्याच वादांची सावली त्याच्यावर पडलेली आहे.

१६६६ मध्ये शाहजहानचा मृत्यू झाला, परंतु वाद जिवंत आहे. ताजमहाल हे खरे तर तेजो महालय आहे आणि हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे, असाही दावा करण्यात आला आहे. तर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात भाजपाचे मीडिया प्रभारी रजनीश सिंह यांनी याचिका दाखल केली आहे.

मानसिंग यांचा राजवाडा असल्याचा तर्क

याचिकाकर्त्याने मागणी केली आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला ताजमहालच्या आत २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि शिलालेख लपलेले आहेत की नाही हे कळू शकेल. रजनीश सिंह यांचे वकील रुद्र विक्रम सिंह यांनी युक्तिवाद केला की १६०० मध्ये आलेल्या सर्व प्रवाशांनी त्यांच्या प्रवास वर्णनात या वास्तूचा उल्लेख मानसिंग यांचा राजवाडा असल्याचा केला आहे.

वकील रुद्र विक्रम सिंह यांनी सांगितले की, ताजमहाल १६५३ मध्ये बांधण्यात आला होता. १६५१ मध्ये औरंगजेबचे एक पत्र आले होते ज्यात त्यांनी लिहिले होते की अम्मीच्या थडग्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अशा सर्व तथ्यांच्या आधारे आता हे शोधणे आवश्यक आहे की ताजमहालच्या या २२ बंद खोल्यांमध्ये काय आहे?

सरकारने एएसआय आणि इतिहासकारांचा समावेश असलेली तथ्य शोध समिती स्थापन करून या प्रकरणी अहवाल सादर करावा, अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र ही याचिका दाखल होताच राजकारण तापले. भाजपा मुद्दाम मुद्दा वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील तपस्वी छावणीतील पीठाधीश्‍वर आचार्य परमहंस यांनाही अयोध्येला जाण्यापासून रोखण्यात आले होते. याआधीही काही हिंदू पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ताजमहालच्या आत हनुमान चालीसा वाचल्याने वाद आणखी वाढला होता.

कुठून सुरु झाला वाद?

इतिहासकार पीएन ओक यांच्या ‘ट्रू स्टोरी ऑफ ताज’ या पुस्तकावरून ताजमहालचा वाद सुरू झाला. या पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याबाबत अनेक दावे करण्यात आले होते. काही इतिहासकारांचा दावा आहे की ताजमहालमधील मुख्य समाधी आणि चमेलीच्या मजल्याखाली २२ खोल्या आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत.

यमुनेच्या बाजूने तळघरात जाण्यासाठी चमेली फर्शवर दोन ठिकाणी पायऱ्या आहेत असे इतिहासकारांचे मत आहे. त्यावर लोखंडी जाळी लावून ते बंद करण्यात आले आहेत. सुमारे ४५ वर्षांपूर्वीपर्यंत पायऱ्या उतरून जाण्याचा मार्ग खुला होता. या २२ खोल्या उघडण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.