जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या गुफेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत १६ भाविकांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे ४० लोक बेपत्ता असून पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. सुमारे १५,००० यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आहे. अचानक आलेल्या पुरामुळे २५ तंबू उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच भाविकांना भोजन देण्यासाठी बांधलेल्या तीन सामुदायिक स्वयंपाकघरांचेही नुकसान झाले.

अमरनाथजवळील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. लष्कराने बचाव कार्यासाठी विशेष तंत्राचा वापर करत त्याद्वारे ढिगाऱ्यांखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला गेला. दोन वॉल रडार आणि दोन स्निफर डॉग त्याठिकाणी नेण्यात आले. त्यांना शरीफाबाद येथून हेलिकॉप्टरने बचाव कार्यासाठी घटनास्थळी आणण्यात आले होते.

israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

अमरनाथ येथील दुर्घटनेत पुण्यातील दोघांचा मृत्यू

लष्कराने बचाव कार्यासाठी विशेष तंत्राचा वापर करत त्याद्वारे ढिगाऱ्यांखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या सैनिक आणि नागरिकांचा शोध घेण्यासाठी लष्कराने वॉल पेनिट्रेशन रडारचा वापर केला आहे.

पाहा व्हिडीओ –

वॉल पेनिट्रेशन रडार म्हणजे काय?

दहशतवादविरोधी कारवाईत घर आणि भिंतींच्या मागे लपलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण शोधण्यासाठी लष्कराकडून या रडारचा वापर केला जातो. हे रडार भिंतीच्या मागे स्थिर आणि हलणारे लक्ष्य शोधू शकते. या रडारचा वापर अमरनाथ गुफेजवळील ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी केला जात आहे.

वॉल पेनिट्रेशन रडार तंत्रज्ञान कसे काम करते?

वॉल पेनिट्रेटिंग रडार उच्च रिझोल्यूशनसह उच्च वारंवारता रेडिओ लहरी सोडते. फार कमी वेळात त्या लहरी वस्तूवर आदळतात आणि त्याची उपस्थिती जाणवते. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींवर आधारित आहे. ते सहज भिंत ओलांडण्यास सक्षम आहे. आता हे तंत्र तपासासाठी वापरले जात आहे.

Photos Amarnath Cloudburst अमरनाथ ढगफूटीत १६भाविकांचा मृत्यू तर ४० जण बेपत्ता; पाहा दुर्घटनेनंतरचे विदारक दृश्य

दरम्यान, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे जवान सतत प्रयत्न करत आहेत. अमरनाथला पोहोचलेल्या किमान १५,००० यात्रेकरूंना पंजतरणीला नेण्यात आले आहे.

२५ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यात लष्कर, सुरक्षा दल आणि एनडीआरएफचे जवान सहभागी आहेत. गेल्या २४ तासांपासून बचावकार्य सुरू आहे. वॉल पेनिट्रेशन रडारद्वारे लोकांना बाहेर काढले जात आहे.