चीनमध्ये नुकतंच बँक ठेवीदारांकडून मोठं आंदोलन करण्यात आलं. ठेवीदारांकडून आपल्या बचत खात्यांमधील पैसे परत करण्याची मागणी केली जात आहे. हेनान प्रांतात रविवारी आंदोलन करण्यात आलं असता पोलिसांनी आंदोलकांवर हिंसक पद्धतीने कारवाई केली.

एप्रिल महिन्यापासून चीनच्या मध्य हेनान प्रांतातील चार ग्रामीण बँकांनी लाखो डॉलर्सच्या ठेवी गोठवल्या आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार मे महिन्यापासून आंदोलन करत आहेत. मात्र रविवारी झालेल्या आंदोलनानंतर चीनच्या बँकिंग नियामक मंडळाकडून ५० हजार युआनपर्यंत ठेवी असणाऱ्या ग्राहकांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र यासाठी नेमकी काय व्यवस्था केली आहे याची घोषणा केलेली नाही.

Indians are eligible for multi-entry Schengen visa for longer validity Why Changes in Schengen Visa Rules Matter
विश्लेषण : भारतीयांसाठी युरोपियन युनियनची भेट… शेंगन व्हिसाच्या नियमांमध्ये केलेले बदल महत्त्वाचे का?
Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?

बँका पैसे परत करण्यास असमर्थ; चीनमध्ये आंदोलकांवरच सरकारची कारवाई, ठेवीदारांना फरफटत नेलं

पण या ग्रामीण बँकांमध्ये रोखीचं संकट निर्माण होण्यामागचं कारण काय? यामधून चीनच्या अर्थव्यवस्थेसंबधी काय संकेत मिळत आहेत? यासंबधी घेतलेला हा आढावा.

बँक रन म्हणजे काय? चीनमध्ये याचा प्रत्यय का येत आहे?

जेव्हा मोठ्या संख्येने ठेवीदार एकाच वेळी त्यांचे पैसे काढण्यासाठी वित्तीय संस्थेकडे धाव घेतात तेव्हा त्याला बँक रन म्हणतात. आपले पैसे संस्थेत सुरक्षित नसल्याची ठेवीदारांची भावना असते. गेल्या काही वर्षांपासून चीनमधील छोट्या ठेवीदारांचं हे प्रमाण वाढलं आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हेनानमधील आंदोलनाची सध्या चर्चा सुरु असली तरी, याआधी २०१९ मध्ये किमान दोन वित्तीय संस्थांमधून पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केली होती. तसंच २०२० मध्ये पाच संस्थांना बँक रनचा फटका बसला होता. यामधील बहुतांश घटनांमध्ये ठेवीदारांना शांत करण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागला होता.

चीनमध्ये जवळपास चार हजार ग्रामीण वित्तीय संस्था आहेत. अर्थतज्ज्ञांच्या माहितीनुसार, करोनासंबंधी कठोर प्रतिबंध, अपारदर्शक मालकी तसंच या संस्थांमधील बेभरवशाचा कारभार यामुळेच त्यांनी आपल्या ठेवीदारांची विश्वासार्हता गमावली आहे. यादरम्यान चीनमधील बँकिंग अँड इन्शुरन्स रेग्युलेटरी कमिशन (CBIRC) जोखीम कमी करण्यासाठी लहान संस्थांची मालमत्ता एकत्रित करण्याचं आवाहन करत आहे.

हेनान प्रांतातील ठेवीदार आंदोलन का करत आहेत?

हेनान प्रांतातील चार ग्रामीण बँकांनी १८ एप्रिलला पैसे काढण्यावर निर्बंध आणल्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. चीनमधील मीडिया रिपोर्टनुसार, गोठवलेल्या खात्यांमधील रक्कम तब्बल १.५ बिलियन डॉलर्स इतकी आहे. महत्वाचं म्हणजे या बँकांनी अंतर्गत देखभालीचं काम सुरु असल्याने पैसे काढू शकत नाही असं आपल्या ग्राहकांना सांगितलं होतं. यानंतर, बँका आर्थिक फसवणूक चौकशीच्या केंद्रस्थानी असल्याचं उघड झालं. शेजारील अनहुई प्रांतातही दोन ग्रामीण बँकांच्या ग्राहकांना खाती गोठवण्यात आल्याने फटका बसला आहे.

हेनानमधील ग्रामीण बँकांमध्ये रोखीचं संकट का निर्माण झालं आहे?

सीबीआयआरसीने या ग्रामीण बँकांमधील प्रमुख भागधारक असणाऱ्या हेनान न्यू फॉर्च्युनवर आरोप केले आहेत. हेनान न्यू फॉर्च्युनने इतर मार्गाने नागरिकांकडून अवैधपणे पैसे आकर्षित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनमध्ये स्थानिक बँकांना त्यांच्या क्षेत्राबाहेरील ग्राहकांकडून ठेवी घेण्यास परवानगी ​नाही.

मे महिन्यात, बँकिंग नियामकाकडून सरकारी वृत्तसंस्थेला देण्यात आलेल्या माहितीनुसार, “हेनान न्यू फॉर्च्यून ग्रुपने अनधिकृत मार्ग तसंच फंड ब्रोकर्सच्या सहाय्याने अंतर्गत आणि बाह्य संगनमताने, जनतेचा निधी काढून घेतला”.

सध्याच्या प्रकरणात आरोप केला जात आहे की, या बँकांनी आकर्षक अटी आणि जास्त व्याजदर देऊन ठेवीदारांना आकर्षित केलं. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने मे महिन्यात प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, एकीकडे बँक ऑफ चायना पाच वर्षांच्या ठेवीसाठी वर्षाला २.७५ टक्के व्याजदर देत असताना, संबंधित बँका अनधिकृत मार्गाच्या सहाय्याने येणाऱ्या पैशांचा वापर करत ४.५ टक्के व्याजदर देत होत्या.

१० जुलैला हेनान पोलिसांनी एका गुन्हेगारी गटाने ग्रामीण बँकांवर ताबा मिळवला असून निधी बाहेर काढत असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान बँक रनमुळे वाढतो असंतोष सरकारसाठी अडचणीचा ठरु शकतो. ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये ग्रामीण बँका छोटासा भाग असल्याने व्यापक चिनी बँकिंग क्षेत्रात याचा फारसा मोठा फरक जाणवणार नाही असं म्हटलं आहे. मात्र आर्थिक व्यवस्थेतून निर्माण होणारी अस्थिरता त्रासदायक ठरू शकते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतंच आर्थिक आणि सामाजिक स्थिरतेचे महत्वं अधोरिखित केलं होतं. तसंच करोनामधून बाहेर पडत देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे यासाठी नागरिकांना आश्वस्त करणंही गरजेचं असल्याचं सांगितलं होतं.