सध्या देशात आणि राज्यातही एक नाव सध्या कालीचरण महाराज हे नाव चांगलंच चर्चेत आहे. मुळचा महाराष्ट्राचा असणारा हा कालीचरण महाराज सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. छत्तीसगड पोलिसांनी थेट मध्य प्रदेशात जाऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही दोन्ही राज्यं आमने-सामने आली असून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण मुळात हा कालीचरण महाराज नेमका आहे कोण? त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल असं कोणतं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे त्याला अटक करण्याची वेळ आली. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

हा कालीचरण महाराज कोण आहे? महाराष्ट्राशी काय संबंध

कालीचरण महाराज हा मूळचा अकोल्याचा आहे. कालीचरण महाराजचं मूळ नाव अभिजीत धनंजय सारंग असून अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ राहतो. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचं नाव धनंजय सारंग आहे.

kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!

शिक्षणाचा कंटाळा आणि त्यात खोडकर स्वभाव असल्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. आई-वडिलांनी प्रयत्न केले पण काही फायदा झाला नाही. अध्यात्माकडे ओढ असल्याने शाळा सोडली आणि हरिद्वारला जाऊन दिक्षा घेतली. नंतर पुढे हाच अभिजीत सारंग कालीचरण महाराज झाला.

मोठी बातमी! महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक

एका मुलाखतीत बोलताना कालीचरण महाराजने सांगितलं होतं की, “मला शाळेत जाणं पसंत नव्हतं. शिक्षणात मला कोणताही रस नव्हता. जर मला जबरदस्तीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचे. सर्वजण माझ्यावर प्रेम करायचे त्यामुळे माझं म्हणणं ऐकायचे. माझी धर्माकडे ओढ असल्याने अध्यात्माकडे वळलो”.

एका व्हिडीओमुळे मिळाली प्रसिद्धी

कालिभक्त म्हणून त्याने कालिचरण महाराज नाव धारण केलं. आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं तो सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला. २०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कालीचरण महाराजला पराभवाचा सामना करावा लागला.

महात्मा गांधींबद्दल त्याने काय विधान केलं –

छत्तीसगडच्या राजधानीत भरलेल्या धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. यावेळी त्याने गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केलं. (कालीचरण महाराज काय बोलला हे लिहिलंही जाऊ शकत नाही)

कालीचरण महाराज या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणीने यावेळी जोर धरला. यानंतर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रायपूर धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं.

छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल

महात्मा गांधींबाबत अपशब्द काढणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात रायपूर महापालिकेचे सभापती आणि काँग्रेस नेते प्रमोद दूबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्रमोद दूबे हे या धर्मसंसदेचं आयोजन करणाऱ्यांपैकीच एक होते.

कालीचरण महाराजांना अटक केल्याने मध्य प्रदेश सरकार संतापलं; म्हणालं “आमच्या राज्यात काँग्रेसच्या सरकारने…”

रायपूरचे माजी महापौर प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात कालीचरण महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. IPC च्या कलम ५०५(२) [वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा वाईट इच्छा निर्माण करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे] आणि कलम २९४ [कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य] अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्य प्रदेशात भल्या पहाटे ठोकल्या बेड्या

रायपूरमध्ये एफआयआर दाखल होताच कालीचरण महाराज छत्तीसगडमधून पळून गेल्याची माहिती आली होती. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पथके पाठवली होती. यानंतर गुरुवारी ३० डिसेंबरला मध्य प्रदेशात त्याला अटक करण्यात आली. रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली.

रायपूरचे पोलीस अधिक्षक प्रशांत अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कालीचरण महाराज मध्य प्रदेशात खजुराहोपासून २५ किमी दूर बागेश्वर धाम येथील एका भाड्याच्या घरात राहत होता. रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटकेची कारवाई केली. संध्याकाळपर्यंत पोलीस कालीचरण महाराजला घेऊन रायपूरमध्ये पोहोचतील”.

महाराष्ट्रातही उमटले होते पडसाद –

या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. कालीचरण महाराजवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. तर जितेंद्र आव्हाड यांनीदेखील कालीचरण महाराजविरोधात ठाणे शहरात पोलिसात तक्रार दिली होती. तर पुणे आणि अकोल्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते.

अटकेवरुन मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकार आमने-सामने

छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने मध्य प्रदेश पोलिसांना न कळवता कालीचरण महाराजला अटक करुन आंतरराज्य नियमांचं उल्लंघन केलं आहे. मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांशी संवाद साधत अटकेच्या प्रक्रियेसंबंधी निषेध नोंदवण्यास सांगण्यात आलं असून स्पष्टीकरण मागण्यास सांगण्यात आलं आहे असं मध्य प्रदेश सरकारने म्हटलं आहे.

दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेन बघेल यांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करता कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. “मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्याला अटक केल्याबद्दल आनंदी आहेत की दु:खी हे स्पष्ट करावं,” असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कालीचरण महाराजच्या कुटुंबीय आणि वकिलांना छत्तीसगड पोलिसांनी अटकेची माहिती दिली असल्याचं सांगितलं.