हरियाणामध्ये दोन जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडली. यातील एका जागेसाठी चुरशीची लढत झाली. या जागेवर काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन यांना पराभूत करुन अपक्ष असलेल्या कार्तिकेय शर्मा यांनी विजय प्राप्त केला. विशेष म्हणजे कार्तिकेय शर्मा यांनी ही पहिलीच निवडणूक लढवली असून राज्यसभेवर जात त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली आहे. पदार्पणातच अजय माकन यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत केल्यामुळे कार्तिकेय शर्मा यांची चर्चा होत आहे. याच कारणामुळे कार्तिकेय शर्मा नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया.

हेही वाचा >> विश्लेषण: ‘पोक्सो’ कायदा आहे तरी काय?

कार्तिकेय शर्माा यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली असली तरी त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील विनोद शर्मा माजी केंद्रीय मंत्री आहेत. विनोद शर्मा यापूर्वी काँग्रेसमधील मोठे नेते होते. मात्र सध्या ते काँग्रेस पक्षात नाहीत. तसेच कार्तिकेय शर्मा यांची ओळख त्यांचा भाऊ मनू शर्मा यांच्यामुळेदेखील होते. मून शर्मा यांना जसिका लाल खून प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.

हेही वाचा >> विश्लेषण: भारतात कसे काय आढळले कांगारू? आणखी कोणकोणत्या प्राण्यांची होते तस्करी?

कार्तिकेय शर्मा मोठे उद्योजक असून त्यांच्याकडे एका मोठ्या प्रसारमाध्यम नेटवर्कची मालकी आहे. ते उच्चशिक्षित असून त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनात पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण लंडन येथील किंग्ज कॉलेजमधून घेतलेले आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : व्हायग्राचं अतिसेवन केल्याने नेमकं काय होतं?

कार्तिकेय शर्मा यांनी २००७ साली आय टीव्ही नेटवर्कची स्थापना केली. आय टीव्ही नेटवर्क भारतातील आघाडीच्या न्यूज नेटवर्कपैकी एक आहे. आय टीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून वेगवेगळे इंग्रजी, हिंदी वृत्तवाहिन्या तसेच काही दैनिके चालवण्यात येतात. या आय टीव्ही नेटवर्कची राष्ट्रीय पातळीवर न्यूज एक्स ही वृत्तवाहिनी आहे. तर प्रादेशिक स्तरावर इंडिया न्यूज हरियाणा, इंडिया न्यूज मध्य प्रदेश, इंडिया न्यूज छत्तीसगड, इंडिया न्यूज पंजाब, इंडिया न्यूज उत्तर प्रदेश, इंडिया न्यूज उत्तराखंड अशा वृत्तवाहिन्या आहेत. हिंदी भाषिक प्रदेशामध्ये आय टीव्ही नेटवर्कचा बोलाबाला आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : मोसमी पाऊस खरंच महाराष्ट्रात पोहोचला?

आय टीव्ही नेटवर्क अंतर्गत तीन राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनेल्स, दोन वृत्तपत्रे, पाच प्रादेशिक वृत्तवाहिन्या, आणि दोन वृत्तसंकेतस्थळे यांचा कारभार पाहिला जाते. विशेष म्हणजे आय टीव्ही अंतर्गत जवळपास ३ हजार कर्मचारी काम करतात. कार्तिकेय यांचे गुरगाव, दिल्ली, चंदिगड आणि पंजाब येथील पंचतारांकित हॉटेल्समध्ये काही शेअर्स आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण: राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? काय आहे खासदार, आमदरांच्या मतांचे गणित, घ्या जाणून

कार्तिकेय वर्मा यांच्या पत्नीचे नाव ऐश्वर्या शर्मा आहे. ऐश्वर्या शर्मा यांचे वडील हरियाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष कुलदीप शर्मा हे आहेत. कार्तिकेय शर्मा यांनी दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रानुसार त्यांच्याकडे जवळपास ३९० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या संत तुकाराम मंदिराचे महत्त्व

कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याचे ठरवले आणि वेगवेगळ्या पक्षांचा पाठिंबा मागण्यास सुरुवात केली. आपला उमेदवारी अर्ज भरताना दुष्यंत चौटाला यांच्या JJP या पक्षाच्या १० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. भाजपातर्फे माजी परिवहन मंत्री आणि पाच वेळा आमदारकी भूषवलेले कृष्णलाल पनवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर काँग्रेस पक्षाकडून दिग्गज नेते अजय माकन हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. दरम्यान, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत कार्तिकेय शर्मा यांनी BJP, INLD, HLP तसेच काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवला होता. परिणामी कार्तिकेय यांनी अजय माकन यांना पराभूत करत राज्यसभेचे सदस्यत्व मिळवले.