scorecardresearch

विश्लेषण : ‘माफिया क्वीन’ म्हटल्या गेलेल्या गंगूबाई काठियावाडी कोण आहेत? जाणून घ्या…

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असणारा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

gangubai kathiawadi, gangubai film, alia bhatt gangubai, Gangubai Kathiawadi legal trouble, Who was Gangubai Kathiawadi,

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असणारा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा वाद नेमका काय आहे, याबाबत काय आरोप केले जात आहेत आणि ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे त्या गंगुबाई कोण आहेत हे जाणून घेऊया…

गंगुबाई काठियावाडी या कोण आहेत?
गंगा हरजीवनदास काठियावाडी या मूळच्या गुजरातच्या रहिवासी होत्या. त्यांनी ५० ते ६०च्या दशकात मुंबईतील वेश्यागृह मालकांपैकी एक म्हणून स्वतःचे नाव कमावले. गंगुबाईंना त्यांच्या पतीने कामाठीपुरा येथील एका वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला विकले होते. कामाठीपुरा हा मुंबईतील सर्वात जुना आणि सर्वात प्रसिद्ध रेड लाईट एरिया आहे. पुढे जाऊन त्यांनी स्वत:चा कुंटणखाना चालू केला. तसेच वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढण्यास सुरुवात केली.

गंगूबाई काठियावाडी चर्चेत का होत्या?
गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित अशी फारशी माहिती नाही. “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” हे पुस्तक गंगूबाई यांच्या आयुष्यातील काही पैलूंवर आधारित आहे आणि याच पुस्तकावर आलिया भटचा हा चित्रपट आहे. गंगूबाई यांनी वेश्यांच्या हक्कासाठी लढण्यास सुरुवात केली आणि त्यांचे प्रश्न त्या काळातील राजकीय नेत्यांसमोर मांडले.

चित्रपटाला कोणाचा विरोध आहे?
गंगूबाई यांचे ७०च्या दशकात निधन झाले. त्यांना स्वत:चे मूल नव्हते. पण कामाठीपूरामध्ये राहणाऱ्या काही लोकांनी गंगूबाईंनी त्यांना दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर कुटुंबातील सदस्यांनी कुटुंबाची अब्रु वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली. गंगूबाई यांच्या कुटुंबीयांचे वकील नरेंद्र म्हणाले की, “ट्रेलर रिलीज झाल्यापासून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. गंगूबाईंची प्रतिमा ज्या पद्धतीने मांडली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या महिलेला वेश्या म्हणून दाखवत आहात, हे कोणत्या कुटुंबाला आवडेल? तुम्ही त्यांना लेडी माफिया डॉन बनवले आहे.”

“जेंव्हा कुटुंबियांना कळले की गंगूबाईच्या जीवनावर चित्रपट बनत आहे, तेव्हा ते लपून बसले होते. ते घर बदलून अंधेरी किंवा बोरिवलीला जाणार होते. या चित्रपटात गंगूबाईंचे चित्रण ज्याप्रकारे करण्यात आले आहे, ते पाहता गंगूबाई खरोखरच वेश्या होत्या का, त्या समाजसेविका होत्या का, असा प्रश्न अनेक नातेवाईक विचारत आहेत,” असे वकिलाने पुढे सांगितले.

गंगूबाई यांचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनीही २०२१ मध्ये या चित्रपटाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2022 at 16:32 IST
ताज्या बातम्या