संदीप कदम

४ सप्टेंबर १९६२ हा दिवस भारताच्या फुटबॉल इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यावर्षी या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संघाच्या विजयाच्या हीरक महोत्सवानिमित्त भारतीय फुटबॉल महासंघातर्फे (एआयएफएफ) आयोजित करण्यात येणाऱ्या खास कार्यक्रमाला प्रथमच माजी फुटबॉलपटू साहाय्य करणार आहेत. हा विजय भारतासाठी इतका विशेष का आहे, भारतासमोर या स्पर्धेत काय आव्हाने होती, याचा आढावा आपण घेणार आहोत.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Why is Smriti Mandhanas success in WPL important for Indian cricket
विश्लेषण : स्मृती मनधानाचे ‘डब्ल्यूपीएल’मधील यश भारतीय क्रिकेटसाठी का महत्त्वाचे?
Rashid Khan is 4 wickets away from creating history
IPL 2024 : मुंबईविरुद्ध राशिदला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! गुजरातसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिला गोलंदाज

भारताला या स्पर्धेत कोणत्या संघाचे आव्हान होते?

१९६२च्या आशियाई स्पर्धेपूर्वी बर्माने (म्यानमार) माघार घेतली. तसेच इस्रायल आणि तैवान यांना इंडोनेशियाने व्हिसा नाकारल्याने त्यांनीही स्पर्धेतून माघार घेतली. यानंतर तयार करण्यात आलेल्या गटवारीत भारताचा समावेश ब-गटात थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियासह करण्यात आला. दक्षिण कोरियाविरुद्ध पहिल्याच साखळी सामन्यात भारत ०-२ असा पराभूत झाला. पण भारताने इतर दोन साखळी सामन्यांत विजय नोंदवत गटसाखळीत कोरियानंतर दुसरे स्थान पटकावले.

हेही वाचा – विश्लेषण : शारजाह स्टेडियमचा इतिहास काय, पाकिस्तानमधून आणली होती माती, जाणून घ्या सविस्तर

दक्षिण कोरियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताची कामगिरी कशी होती?

उपांत्य फेरीत भारताने चुरशीच्या लढतीत तत्कालीन दक्षिण व्हिएतनामवर ३-२ असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात भारतासमोर मजबूत समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाचे आव्हान होेते. या संघाने साखळी लढतीत भारताला हरवले होते. पण चुन्नी गोस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने कोरियाला २-१ असे नमवत ऐतिहासिक विजय साजरा केला. भारताकडून पीके बॅनर्जी (१७व्या मिनिटाला) यांनी पहिला गोल झळकावत संघाला आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटांनंतर जर्नेल सिंग यांनी गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. कोरियाकडून चा ताए सुंगने (८५व्या मि.) एकमेव गोल केला. जकार्ताच्या सेनायन स्टेडियममध्ये हा सामना झाला होता. अंतिम सामन्यात भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त होते तर, गोलरक्षक आजारी होता. या स्थितीतही भारताने दिमाखदार खेळ करत ऐतिहासिक कामगिरी केली.

भारतीय संघाची स्पर्धेतील वाटचाल कशी होती?

१९५८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाकडून १-३ अशी हार पत्करली. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारताकडे चार वर्षे होती. मात्र, प्रशिक्षक सय्यद रहीम यांनी तयार केलेल्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये आपली छाप पाडली. १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातील १६ पैकी नऊ खेळाडूंनी रोम येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. भारताला साखळी सामन्यात दक्षिण कोरियाने २-० असे नमवले. पण, भारताने थायलंडला ४-१ असे पराभूत केले. भारताकडून बॅनर्जी यांनी दोन गोल करीत निर्णायक भूमिका पार पाडली, तर गोस्वामी आणि तुलसीदास बलराम यांनी प्रत्येकी एक गोल केला. बॅनर्जी आणि बलराम यांच्या गोलमुळे भारताने जपानचा २-० असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण व्हिएतनामवर ३-२ असा विजय साकारत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात गोस्वामीने दोन, तर जर्नेल सिंगने एक गोल केला. भारताच्या स्पर्धेतील ११ गोलपैकी नऊ गोल गोस्वामी, बॅनर्जी आणि बलराज या आघाडीपटूंनी केले.

भारताच्या या कामगिरीत प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांचे योगदान महत्त्वाचे का मानले जाते?

रहीम यांना भारतीय फुटबॉलचे युगप्रवर्तक म्हणून ओळखले जाते. १९६२मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकीकडे भारतीय संघ खेळत होता, तर दुसरीकडे रहीम कर्करोगाचा सामना करत होते. १९६३मध्ये कर्करोगाचा सामना करत असताना त्यांचे निधन झाले. ‘‘रहीम यांनी स्वत:सोबत, भारतीय फुटबॉललाही थडग्यात नेले,’’ असे बॅनर्जी यांनी त्यांच्या ‘बियाँड नाइंटी मिनिट्स’ या आत्मचरित्रात माजी फुटबॉलपटू फ्रँको फॉर्च्युनॅटोला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत म्हटले आहे. भारताची फुटबॉलमधील ऐतिहासिक कामगिरी ही त्यांच्याच कार्यकाळात झाली. १९५१मध्ये रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. १९५२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने चमक दाखवली नसली, तरीही १९५६च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने लक्षवेधक कामगिरी केली. भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला ४-२ ने नमवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आणि असे करणारा पहिला भारतीय संघ ठरला.

भारतीय फुटबॉलचा कोणता काळ सुवर्णकाळ म्हणून गणला जातो?

भारतीय फुटबॉल इतिहासातील १९५१ ते १९६२ हा कालखंड सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. १९५१मध्ये भारतात आयोजित केलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात इराणला हरवून सुवर्णपदक पटकावले. भारताने यानंतर चौरंगी फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले. या कामगिरीनंतर त्यांनी या स्पर्धेच्या १९५३, १९५४ आणि १९५५ हंगामांमध्येही चमक दाखवली. १९५४च्या मनिला येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आठव्या स्थानी राहिला. १९५६ मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथे स्थान मिळवले. यामध्ये भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. १९५८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे स्थान पटकावले. १९५९मध्ये मेर्डेका चषकात भारत दुसऱ्या स्थानी होता. १९६२च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णकामगिरीनंतर १९६४च्या ‘एएफसी’ आशिया चषक स्पर्धेत भारताने दुसरे स्थान मिळवले होते.