भारतीय चित्रपट, कलाकार यांची लोकप्रियता आज देशभरात पोहचली आहे. नुकतेच ‘आरआरआर’ चित्रपटातील कलाकार जपानला जाऊन आले आहेत. जपानमध्ये दाक्षिणात्य कलाकारांचे अनेक चाहते आहेत. जपानप्रमाणे चीनमध्येदेखील भारतीय चित्रपटांचे चाहते आहेत. आमिर खान या अभिनेत्याचे चित्रपट चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर बघितले जातात. सध्या चीनमध्ये दिवंगत संगीतकार बप्पी लहरी यांचे एक गाणे सध्या चीनमध्ये चांगलेच चर्चेत आले आहे.

८० च्या दशकात ‘डिस्को डान्स’र चित्रपटातील ‘जिमी जिमी’ हे गाणे सध्या चीनमध्ये व्हायरल होत आहे. या गाण्याने ८० च्या दशकात भारतात धुमाकूळ घातला होता. तब्बल ४ दशकानंतर या गाण्याची चीनमध्ये इतकी हवा का आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर चीनमधील शी जिनपिंग सरकारच्या ‘झिरो कोव्हीड’ धोरणावरून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेकजण आपल्या घरात अडकून पडले आहेत. चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आले आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?

विश्लेषण : पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व कसे दिले जाते?

चीनमधल्या या लॉकडाउनचा निषेध करण्यासाठी लोक या गाण्याचा वापर करत आहेत. या गाण्यातील जे शब्द आहेत ‘जिमी जिमी’ याचा मँडरिन भाषेत अर्थ निघतो ‘तांदूळ द्या तांदूळ द्या’, लोक व्हिडीओमधून घरातील रिकामे भांडे दाखवत मागे हे गाणे लावताना दिसून येत आहेत. हे व्हिडीओ टिकटॉकसारखे असणाऱ्या डौयिन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आहेत. झेंगझोऊ शहरातील ‘आयफोन’ निर्मितीच्या कारखान्यातून कर्मचारी अक्षरश: पळून गेले होते.

आज जगभरात करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे अगदी चीनमध्येदेखील रुग्ण संख्या कमी असूनदेखील देशाने संपूर्ण लॉक डाऊन करणे सुरू ठेवले आहे. आजही देशात हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी करोना चाचण्यांना सामोरे आहे. तसेच करोना नसल्याचा दाखल द्यावा लागतो आहे.चीनचा इतिहास बघता या देशात कम्युनिस्ट राजवट मोठ्या प्रमाणावर होती. हुकूमशाही नेता माओ झेडोंगच्या मृत्यूपूर्वी चीन हा देश इतरांच्या संपर्कात नव्हता. पाश्चात्य वस्तू, संस्कृती माहिती लोकांपर्यंत पोहचत नव्हती. त्याचकाळात भांडवलशाही, पाश्चिमात्य संगीत, अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव इतर देशांवर पडत होता. हुकूमशाहच्या मृत्यूनंतर चीन पुन्हा एकदा माणसात आला आणि जगाशी जोडला गेला. तसेच डिस्को प्रकार वाढल्याने लोकांना त्या पद्धतीच्या गाण्यांवर थिरकयाला आवडायला लागले होते. चीनच्या आधी हे गाणे रशियातदेखील प्रसिद्ध झाले होते. या गाण्यात मिथुन चक्रवर्ती थिरकले होते. ऐंशीच्या दशकात त्यांचे रशियात मोठ्या प्रमाणावर चाहते होते. शो मॅन अर्थात राज कपूर यांचे चित्रपटदेखील रशियात आवर्जून बघितले जात होते.

विश्लेषण: ऐन राजकीय गोंधळात पाकिस्तानचे पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर, जागतिक पटलावर नवी समीकरणं तयार होणार?

या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की जपानच्या ‘यु डोन्ट मेस विथ जोहान’ या चित्रपटात हे गाणे वापरले होते. माया अरुलप्रगासम या श्रीलंकेच्या संगीतकाराने हे गाणे आपल्या पद्धतीने २००७ साली प्रदर्शित केले होते. या गाण्याचे संगीतकार बप्पी दा यांना गाण्याच्या लोकप्रियतेबद्दल २०१८ मध्ये लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित केले होते.