उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दिल्लीसह आजूबाजूच्या राज्यांमध्ये दाट घुक्यांची चादर पसरली आहे. हवामान विभागाच्या अंजादानुसार पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील पाच ते सहा दिवस थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतातील राज्यांमध्ये अचानक थंडी वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण: जीभ स्वच्छ करण्यासाठी चरक संहितेत सांगितली आहे योग्य पद्धत; तुम्ही चुकताय का? जाणून घ्या नियम

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

कोणत्या राज्यांमध्ये वाढतेय थंडी?

तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उत्तर भारतातील पंजाब, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सध्या थंडीची लाट पसरली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत नाताळच्या दिवशी पारा रोजच्या तापमानापेक्षा १६.२ अंश सेल्सियसने खाली घसरला होता. त्यादिवशी सकाळी दिल्लीत सकाळचे तापमान ५.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे दिल्लीत सकाळी दाट धुक्याची चादर बघायला मिळाली. या धुक्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेगही मंदावला होता. दिल्लीसह पंजाब, हरियाणात आणि राजस्थानमध्येही पारा खाली आला आहे. पंजाब आणि हरियानातील काही भागांमध्ये किमान तापमान तीन ते सात अंश सेल्सिअस असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर राजस्थानमधील माउंट अबूमध्ये बर्फवृष्टी झाल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच चुरूमध्ये तापमान शुन्य अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. श्रीनगरमध्येही दल लेक सुद्धा गोठल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, उत्तर भारतातील राज्यांमध्ये पारा आणखी घसरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर भारतातील शाळा बंद

वाढत्या थंडीमुळे दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारने १ जानेवारीपासून हिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्येदेखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्येदेखील आठव्या वर्गापर्यंतच्या शाळा बंद आहेत.

हेही वाचा – विश्लेषण: देश गोवरमुक्त होणे इतक्यात शक्यच नाही?

उत्तर भारतात थंडीची लाट का?

हवामान विभागानुसार, उत्तर भारतात थंडी वाढण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे वायव्य आशियातील उच्च दाबाच्या पट्ट्यातून वाहणारे ‘जेट स्ट्रीम’ वारे आहेत. हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जगभरप्रवास करत असतात. तसेच हिमालयात होणारी बर्फवृष्टीदेखील या थंडीस कारणीभूत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – विश्लेषण: मेंदू खाणाऱ्या अमीबाने वाढवली जगाची चिंता; कशी होते लागण? लक्षणं व उपचार काय?

पुढचे पाच दिवस कसं असेल हवामान?

दरम्यान, पुढचे पाच ते सहा दिवस पंजाब आणि हरियाणातील काही भागांमध्ये दाट धुक्याची चादर पसरेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच सोमवारी चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. याचबरोबर हिमाचल प्रदेशातील कुल्लू, चंबा, लाहौल-स्पीती आणि किन्नौर जिल्ह्यांच्या उंच भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, असेही आयएमडीने म्हटले आहे.