एमआय, रेडमी आणि पोक्को या ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोन विकणारी शाओमी इंडिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या चिनी कंपनीचे वादांशी संबंध काही नवीन नाही. अरुणाचल प्रदेशचा भाग ऑक्टोबर २०२२ मध्ये शाओमीच्या हवामानविषयक अॅपवरून काढून टाकण्यात आला होता. त्यावेळी सोशल मीडियावर बॉयकॉट शाओमी ट्रेंड सुरु होता. गलवान हिंसाचारानंतरही शाओमीवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड होता. यानंतर शाओमीवर करचुकवेगिरीचा आरोप झाला होता. या वर्षी जानेवारीमध्ये शाओमीवर ६५३ कोटी रुपयांच्या आयात शुल्क चुकवल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर, ईडीने फेब्रुवारीमध्ये बेकायदेशीर पैसे पाठविण्याशी संबंधित तपास सुरू केला. कंपनी रॉयल्टीच्या नावाखाली भारतातून चीनला पैसे पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्या कंपन्यांकडून शाओमीने कोणतीही सेवा घेतली नाही त्यांना हे पैसे पाठवले जात होते.

भारतात मोबाईल निर्मितीचे कारखाने सुरु केल्यानंतरही चिनी मोबाईल कंपन्या मनी लॉन्ड्रिंग, बोगस रॉयल्टीद्वारे चीनमध्ये पालकत्व असलेल्या कंपन्यांना लाभ मिळवून देत आहेत. विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर कारवाई करत सक्तवसूली संचालनालय अर्थात ‘ईडी’ने शनिवारी कंपनीची ५,५५१.२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

शाओमीचा गेम काय आहे?

शाओमी इंडिया ही चीनमधील शाओमी समूहाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, शाओमीची जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यांमध्ये पडून होती. ईडीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने बेकायदेशीररित्या पैसे धाडण्याच्या (रेमिटन्स) केलेल्या सुविधेच्या संदर्भात तपास सुरू केला होता. तर एप्रिलमध्ये या प्रकरणाच्या संदर्भात शाओमीचे जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांची चौकशी केली होती. ईडीने दिलेल्या निवेदनानुसार, कंपनीने २०१४ मध्ये भारतात आपले कार्य सुरू केले आणि २०१५ पासून ‘रेमिटन्स’च्या माध्यमातून पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने ५५५१.२७ कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन तीन परकी संस्थांना रॉयल्टीच्या रुपात पाठवले. ज्यात शाओमी समूहाचा देखील समावेश होता. रॉयल्टीच्या माध्यमातून मोठी रक्कम चीनमधील मूळ समूहाच्या सूचनेनुसार पाठवण्यात आल्या. इतर दोन अमेरिकास्थित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील अप्रत्यक्षपणे शाओमी समूहातील घटकांच्या अंतिम फायद्यासाठी वळती करण्यात आली.

कंपनीने दिले स्पष्टीकरण

ईडीच्या कारवाईनंतर शाओमी इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “भारतासाठी वचनबद्ध ब्रँड म्हणून आमची सर्व कामे भारतीय नियम आणि नियमांचे काटेकोर पालन करून केले जातात. सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा आम्ही बारकाईने अभ्यास केला आहे. आमचा विश्वास आहे की आमची रॉयल्टी देयके आणि विवरणे पूर्णपणे अचूक आणि वैध आहेत. आमच्या उत्पादनांच्या भारतीय आवृत्तीमध्ये वापरलेल्या इन-लायसेंस टेक्नोलॉजी आणि आयपीसाठी शाओमीद्वारे रॉयल्टी भरली गेली आहे. रॉयल्टी भरणे ही शोओमी इंडियाची कायदेशीर व्यावसायिक व्यवस्था आहे. कोणताही गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही सरकारी अधिकाऱ्यांकडून वचनबद्धतेने काम करत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.

शाओमीच्या ग्राहकांवर परिणाम होईल का?

शाओमी इंडियाकडे भारतात कोटींच्या संख्येत ग्राहक आहेत. कंपनीवर ईडीच्या कारवाईचा या ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकार चिनी कंपन्यांना स्थानिक संसाधनांचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहे. चिनी कंपन्यांनी परदेशात असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांकडून सेवा घेण्याऐवजी सर्व सेवा भारतात घ्याव्यात, जेणेकरून येथील व्यवसाय भरभराटीला येईल, अशी सरकारची इच्छा आहे. चीनच्या सीमेवरील तणावामुळे सरकार परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीचे नियमही कडक करत आहे.