गेल्या काही दिवसांपासून काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून देशभरात वाद सुरू आहे. चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लीना मणीमेकलाई यांच्या माहितीपटाचे पोस्टर हे हिंदुंच्या भावना दुखावणारं असल्याची टीका केली जात असून त्यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आजपर्यंत अनेक चित्रपटांवर अशाच प्रकारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, नंतर वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे यासंदर्भात बोलताना तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद सुरु झाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोईत्रा यांनी विधान केलं आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?

यासंदर्भात बोलताना महुआ मोईत्रा यांनी प्रत्येकाला आपल्या इश्वराविषयी कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे, असं म्हटलं आहे. “माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे. तुमच्या ईश्वराविषयी कल्पना करण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे. काही ठिकाणी ईश्वराला व्हिस्की नैवेद्य म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी ही ईश्वरनिंदा ठरते”, असं महुआ मोईत्रा म्हणाल्या आहेत.

माझ्यासाठी कालीमाता मांसाहार, मद्याचा स्वीकार करणारी – तृणमूल खासदार महुआ मोईत्रा

महुआ मोईत्रा यांच्या या वक्तव्याने त्यांच्यावर उत्तर प्रदेश, कोलकाता आणि भोपाळसह अनेक भागात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. त्याचवेळी सर्व बाजूंनी वादात अडकलेल्या महुआ यांनी आपण कोणाला घाबरत नसल्याचे म्हटले आहे. पण महुआ यांनी केलेल्या या वक्तव्यामध्ये काही तथ्य आहे का?

“जय काली कलकत्ता वाली” अशी घोषणा आपण अनेक ठिकाणी ऐकली असेल. त्यामुळे काली माता आणि कोलकाता हे शब्द एकमेकांना पूरक आहेत. काली मातेची आख्यायिका बंगालच्या सांस्कृतिक अस्तित्वाचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. कालीमाता राक्षसांना मारते आणि काहींसाठी ती आई आहे.

संपूर्ण बंगालमध्ये शेकडो कालीमातेची मंदिरे आहेत आणि त्यापैकी प्रत्येक असंख्य दंतकथांशी संबंधित आहे. पण काही सुसंगत विधी आहेत ज्या बंगालमध्ये काली पूजेच्या मूळ गोष्टी आहे. कालीघाट, तारापीठ किंवा दक्षिणेश्वर या मंदिरांमध्ये या विधी केल्या जातात.

कालीघाट, कोलकाता – हे २०० वर्षे जुने मंदिर देशातील ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. या मंदिरात दररोज प्राण्यांचा बळी दिला जातो, असे मंदिराचे पुजारी सांगतात. सर्वसाधारणपणे देवीला नवस बोलणारे भक्त हे प्राणी आणतात. नंतर मांस शिजवून भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. मात्र येथे देवीला शाकाहारी भोजन दिले जाते. तर कालीमातेच्या सोबत असणाऱ्या डाकिनी आणि योगिनी यांना मांसाहारी भोजन दिले जाते.

तारापीठ, बीरभूम – बंगालमधील आणखी एक शक्तीपीठ असलेल्या तारापीठ येथील पुजारी म्हणतात की तंत्रानुसार मासे आणि मांस दोन्ही बळी म्हणून देवीला अर्पण केले जातात. येथे मद्य अर्पण केले जाते. खरं तर, मद्य आवश्यक असते पण त्याव्यतिरिक्त शाकाहारी पदार्थ आणि फळे देखील अर्पण केली जातात.

दक्षिणेश्वर, कोलकाता – श्री रामकृष्णाच्या दक्षिणेश्वर मंदिरात रोज देवीला भोग म्हणून मासे अर्पण केले जातात. मात्र, येथे कोणत्याही प्राण्याची बळी देण्याची परवानगी नाही.

थंथनिया कालीबारी, कोलकाता – उत्तर कोलकाता येथील ३०० वर्ष जुन्या थंथनिया काली मंदिरात माशाशिवाय देवीचा कोणताही प्रसाद पूर्ण होत नाही. प्रत्येक पौर्णिमेला देवीला बळी अर्पण केला जातो. मात्र, या मंदिरात बळीचे मांस शिजवले जात नाही, तर ते बळी देणाऱ्या भक्ताला दिले जाते.

तारापीठाचे सेवक तारामय मुखोपाध्याय यांनी इंडिया टुडेला सांगितले की, “भक्त जे काही देवीला अर्पण करतात ते भोग म्हणून दिले जाते. एकीकडे तारापीठात देवीला शाकाहारी भोजन दिले जात असताना, प्रथेनुसार मासे आणि मद्यही लागते. त्यांच्यासोबतच देवीची प्राचीन काळापासून पूजा केली जात आहे.”

विद्वान नृसिंह प्रसाद भादुरी यांनी सांगितले की, “तंत्र प्रथा म्हणजे मद्य आणि मांस देण्याची प्रथा. तांत्रिक तत्त्वज्ञानाच्या अशा प्रथांमध्ये सहभागी असलेले लोकच हे असे का दिले जाते याचे उत्तर देऊ शकतात.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why fish and meat are offered in the temples of goddess kali in bengal abn
First published on: 07-07-2022 at 15:21 IST