एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड यांचं विलिनीकरण होणार असल्याचं सोमवारी जाहीर करण्यात आलं. भारतीय आर्थिक क्षेत्रातील हा विलिनीकरणाचा सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक व्यवहार ठरणार आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजार उघडण्याच्या सुमारास झालेल्या या घोषणेनंतर या कंपन्यांच्या शेअर्सच्या भावांनी सात टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. विलिनीकरण पुढील १८ महिन्यांमध्ये पूर्ण होईल असे एचडीएफसी बँकेनं म्हटलं आहे. नियंत्रकांची अनुमती व अन्य आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी एवढा कालावधी लागणार आहे.

विलिनीकरणाची योजना काय आहे?

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

या व्यवहाराचं स्वरुप असं आहे की, एचडीएफसी लिमिटेड एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या व्यवस्थापनांतर्गत ५.२६ लाख कोटी रुपयांची मालमत्ता असून कंपनीचं भांडवली बाजार मूल्य ४.४४ लाख कोटी रुपये आहे. तर खासगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचं भांडवली बाजार मूल्य ८.३५ लाख कोटी रुपये आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या उपकंपन्याही एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहेत.

या व्यवहारामध्ये शेअर्सचा स्वॅप रेश्यो काय असेल?

नोंदणीकृत दिवशी समभागधारक असलेल्या एचडीएफसी लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना एचडीएफसी लिमिटेडच्या २५ शेअर्सच्या बदल्यामध्ये एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर्स मिळणार आहेत.

मालकीमध्ये काय बदल होणार?

या विलिनीकरणानंतर, एचडीएफसी लिमिटेडचा एचडीएफसी बँकेतील हिस्सा संपुष्टात येईल आणि एचडीएफसी बँक ही समभागधारकांच्या १०० टक्के मालकीची बनेल. एचडीएफसी लिमिटेडच्या विद्यमान समभागधारकांचा एचडीएफसी बँकेमध्ये ४१ टक्के हिस्सा असेल.

दोन्ही कंपन्यांना या विलिनीकरणाचा काय फायदा होईल?

ग्राहकांची व्याप्ती यामुळे वाढणार असून एकमेकांची उत्पादने एकमेकांच्या ग्राहकांना विकण्याची क्षमता या विलिनीकरणामुळे वाढणार आहे. शहरी, निम शहरी व ग्रामीण भागामध्ये दोन्ही कंपन्यांच्या असलेल्या वितरण व्यवस्थेचाही अधिक चांगला फायदा एक झालेल्या कंपनीला उठवता येणार आहे. दोन्ही कंपन्यांची एकत्रित आर्थिक ताकद इतकी मोठी असेल की त्यामुळे आतापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक कारभार करण्याची क्षमता एकत्रित कंपनीची मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.