ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घोषणा केली आहे की, राज्यात लवकरच आणखी १८ बालस्नेही पोलीस ठाणे (child-friendly police stations) असतील. याशिवाय त्यांनी लैगिंक अत्याचारातील पीडितांना मानसिक आधार देण्यासाठी आणि लैंगिक हिंसाचारांच्या घटनांना आळा बसवण्याच्या दृष्टीने ‘संपर्क हेल्प डेस्क’ सुद्धा सुरू आहे.

सध्या त्यांनी भुवनेश्वर, जगतसिंगपुर, पद्मपुर, जाजपुर रोड, झारसुगुडा, नयागढ, अस्का, सोरो, भवानीपटना सदर, रायरंगपुर, देवगढ, राउरकेला, ढेनकनाल, केओंझार, नाल्को आणि बिनिका या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये महिला आणि बालाकांविरुध्दच्या गुन्ह्यांसाठी विशेष शाखेची (CAW&CWs) स्थापना केली आहे.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?

बालस्नेही पोलीस स्टेशन म्हणजे काय? –

एडीजी रेखा लोहानी यांनी सांगितले की, “मुलांना अनुकुल असे वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने राज्यात बालस्नेही पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहेत. मुलांना आकर्षित करण्यासाठी या पोलीस ठाण्यांच्या आतमध्ये मुलांना आवडतील अशी चित्रे काढून ती रंगवण्यात आली आहेत, याशिवाय विविध सुविधा आणि तसे वातावरण तयार करण्यात आले आहे. याशिवाय या बालस्नेही पोलीस ठाण्यांमध्ये सॉफ्ट टॉईज, अॅनिमेटेड स्टोरीबुक्स असलेली लायब्ररी, मुलांसाठी झोके, प्रसाधनगृहे, मातांसाठी स्वतंत्र स्तनपान कक्ष आणि टीव्ही सारखी मनोरंजनाचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत.”

याशिवाय एडीजी रेखा लोहानी यांनी हेही सांगितले की, “याचा मुख्य उद्देश मुलांना कोणतीही भीती न बाळगता पोलीस स्टेशन्समध्ये तक्रार दाखल करता यावी. त्यांच्यातील भीती आणि मानसिक दबाब कमी करण्याबरोबर, न्यायाच्या मागणीसाठी प्रोत्साहन देणे आहे.”

बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोगाच्या(NCPCR) २०१७ च्या मार्गदर्शक तत्वांना बालस्नेही पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी या महत्त्वपूर्ण टप्प्यावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, या पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा उद्देश हा केवळ रंगीत भिंती, भौतिक पायाभूत सुविधा किंवा अन्य काही वरवरच्या बदलांवर संपत नाही. २०१७ च्या NCPCR मधील मार्गदर्शक तत्वांच्या उद्दिष्टांमध्ये नमूद केल्यानुसार अंतिम ध्येय हे पोलिसिंग आणि बालहक्क व बाल संरक्षणाशी संबंधित सिद्धांत आणि कामकाजातील अंतर कमी करणे असले पाहिजे.

बालस्नेही पोलीस ठाणे गरजू मुलांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी मदत करतील. बालस्नेही पोलीस ठाण्याचे उद्दिष्ट मुलांना गुन्ह्यांची आणि प्रकरणांची तक्रार करण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करणे आहे.