देवेश गोंडाणे

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून याचा फटका तेथे शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. एकट्या युक्रेनमध्ये वीस हजारांवर भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी असून यातील ९० टक्के केवळ वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षणाच्या अनेक संधी असताना आणि अमेरिका, युरोपमध्ये शिक्षण घेणे प्रतिष्ठेचे समजले जात असतानाही भारतीय मुले इतक्या मोठ्या संख्येने वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया, युक्रेन, चीन, फिलिपिन्स या देशांना सर्वाधिक पसंती का देतात, हा विषय रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या निमित्ताने नव्याने चर्चेला आला आहे.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?

विद्यार्थ्यांची रशिया, युक्रेनलाच पसंती का? –

भारतासारख्या १३० कोटींच्या देशात डॉक्टरांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या तुलनेत भारतातून दरवर्षी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी आहे. भारतात शासकीय आणि खासगी महाविद्यालये मिळून वैद्यकीय शिक्षणाच्या केवळ ९० हजार जागा असणे हे याचे प्रमुख कारण. यामधील ४० हजार जागा या ‘एमबीबीएस’च्या तर ६० हजार जागा या दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही दरवर्षी बारा लाखांच्या घरात असते. ९० हजार जागांवर बारा लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अशक्य आहे. याशिवाय भारतात खासगी आणि व्यवस्थापन कोट्यातील वैद्यकीय शिक्षणासाठी ५० ते ७० लाखांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. याउलट युक्रेन, रशिया या देशांमध्ये २५ ते ३० लाखांमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येते. त्यामुळे भारतात वैद्यकीय शिक्षण घेऊ न शकणारा आणि आर्थिक स्थिती बरी असणारा भारतीय विद्यार्थी हा युक्रेन, रशिया, चीन अशा देशांमधील वैद्यकीय शिक्षणाला आपली पसंती देतो.

शुल्कामध्ये तफावत कशी? –

परदेशी शिक्षण म्हटले की युरोप, अमेरिका या देशांना पहिली पसंती दिली जाते. तेथे शिक्षण घेणे इतर देशांच्या तुलनेत अधिक प्रतिष्ठेचे समजले जाते. मात्र, युरोप आणि अमेरिका हे शिक्षणासाठी रशिया, युक्रेन आणि चीनच्या तुलनेत चारपट महागडे आहे. म्हणजे युक्रेनमध्ये चार वर्षांच्या वैद्यकीय पदवीसाठी २५ लाखांपर्यंतचा असणारा खर्च युरोप, अमेरिकेमध्ये एक कोटीच्या घरात जातो. त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांना तेथील शिक्षण परवडणारे नाही. त्यामुळे युरोप, अमेरिकेपेक्षा युक्रेन, रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.

मर्यादित जागांमुळे हे घडते का? –

भारतात वैद्यकीय शिक्षणाच्या असलेल्या ९० हजार जागांमधून ५२ टक्के जागा या आरक्षित असतात. उर्वरित ४८ टक्के जागांवर खुल्या वर्गाला प्रवेश दिला जातो. मात्र, भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढली आहे. आरक्षित प्रवर्गाच्या जागांसाठी हल्ली मोठी स्पर्धा असते. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थी खुल्या वर्गातून प्रवेश घेतात. तर समांतर आरक्षणाच्या धोरणानुसार आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना खुल्या जागांवरही प्रवेश दिला जातो. परिणामी खुल्या वर्गातील ४८ टक्के जागांवर सर्व इच्छुकांना प्रवेश मिळणे अशक्य असल्याने शेवटी असे विद्यार्थी युक्रेन, रशिया, चीन अशा कमी खर्च असणाऱ्या देशांची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड करतात.

परदेशातील वैद्यकीय पदवीचा फायदा काय? –

भारताच्या तुलनेत युक्रेन, रशियातून कमी खर्चामध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना भारतातही वैद्यकीय सेवा देता येते. भारतात वैद्यकीय सेवेचा परवाना मिळवण्यासाठी ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’कडून पात्रता परीक्षा घेतली जाते. ही उत्तीर्ण केल्यावर भारतात सेवा देता येते. याशिवाय परदेशातून पदवी घेतल्याने अशा डॉक्टरांना रुग्ण अधिक पसंत करत असल्याने वैद्यकीय सेवेत परदेशी शिक्षणाची अशी दुहेरी मदत होते.

युक्रेन, रशियानंतर फिलिपिन्सला अधिक पसंती का? –

युक्रेन, रशियाप्रमाणे फिलिपिन्सला वैद्यकीय शिक्षणासाठी अधिक पसंती दिली जाते. फिलिपिन्समध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यास त्याला अमेरिक संयुक्त राष्ट्राची ‘एमएलई’ ही परीक्षा देऊन युरोपात नोकरीही करता येते. त्यामुळे सर्वाधिक भारतीय फिलिपिन्सलाही वैद्यकीय शिक्षणासाठी पसंती देतात.