गेल्या ५९ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये प्रचंड नुकसान होऊनही रशियन सैन्य मागे हटण्यास तयार नाही. युक्रेनमधील मारियोपोल हे शहर रशियन सैन्याने पूर्णपणे उद्धवस्त केले आहे. या शहरातील अ‍ॅझोव्ह्स्टल स्टील प्लांट अजूनही युक्रेनियन सैन्याच्या ताब्यात आहे. या स्टील प्लांटला ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याने खूप हल्लेही केले, परंतु युक्रेनियन सैनिकांच्या प्रतिकारामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला स्टील प्लांटवरील हल्ला थांबवण्याचे आदेश दिले. त्यांनी युक्रेनियन सैन्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आणि संपूर्ण स्टील प्लांट ताब्यात घेण्याचे आदेश दिले. हा स्टील प्लांट अशा प्रकारे सील केला पाहिजे की आतून एक माशीही बाहेर पडू शकणार नाही, असे आदेश राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिले आहेत. यानंतर आत अडकलेल्या युक्रेनच्या सैनिकांची प्रकृती बिघडू लागली आहे.

गेल्या काही आठवड्यात युक्रेनमधील या मोठ्या स्टील प्लांटमध्ये अडकले आहेत. रशियाच्या सैन्यदलाने त्यावर जोरदार हल्ला चढवून, युक्रेनच्या सैन्याला शरण येण्याचा इशारा वारंवार दिला होता. मारियोपोल स्वतंत्र करण्यासाठीचा संघर्ष यशस्वी झाल्याचा दावा मंगळवारी पुतिन यांनी केला. युक्रेनच्या दक्षिणेकडील महत्त्वाचे केंद्र असलेले मारियोपोल ताब्यात येणे, हे मोठेच यश आहे. परंतु मी माझ्या सैन्यदलास भव्य अ‍ॅझोव्ह्स्टल पोलाद प्रकल्पात जाऊ देणार नाही. कारण तेथे अनेक बोगद्यांचे जाळे असून, तेथे जाणे धोक्याचे आहे. यापेक्षा जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या युक्रेन सैन्याच्या आश्रयस्थानाची नाकेबंदी केली जाईल, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मारियोपोल महत्वाचे का आहे?

डोनबास म्हणून ओळखल्या जाणार्‍या पूर्व युक्रेनमधील औद्योगिक क्षेत्राचा भाग असलेले मारियोपोल, २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या हल्ल्यापासून रशियाचे प्रमुख लक्ष्य आहे. शहर काबीज केल्याने रशियाला सीमेपासून युक्रेनच्या क्रिमियन द्वीपकल्पापर्यंत लँड कॉरिडॉरची स्थापना करणे शक्य होईल. हे युक्रेनला एक प्रमुख बंदर आणि बहुमोल औद्योगिक संपत्तीपासून वंचित ठेवेल.

सात आठवड्यांच्या घेरावानंतर रशियन सैन्याची संख्या वाढली लक्षणीय आहे. जी डॉनबासमध्ये इतरत्र आक्रमणासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच प्रदेशात मॉस्को-समर्थित फुटीरतावादी क्रिमियाच्या विलयीकरणानंतर २०१४ पासून युक्रेनियन सरकारी सैन्याशी लढत आहेत.

युद्धाच्या सुरुवातीपासून रशियाचे संपूर्ण लक्ष मारियोपोल काबीज करण्यावर होते. १८व्या शतकातील रशियन राजा मारिया फेओदोरोव्हना याच्या नावावर असलेले, मारियोपोल शहर रशियातील शाही राजवटीच्या काळात अझोव्ह गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, हिटलरच्या नेतृत्वाखालील जर्मन सैन्याने मारिओपोलला ताब्यात घेतले. यादरम्यान नाझी सैन्याने स्थानिक लोकांच्या मदतीने ज्यूंचा नायनाट करण्याची मोहीम सुरू केली. यानंतर मारियोपोल शहर रशियन रेड आर्मीने मुक्त केले आणि सोव्हिएत डावे नेते आंद्रेई झ्दानोव्ह यांच्या नावावरून त्याचे नाव झ्डानोव्ह ठेवले.

१९८९ मध्ये, सोव्हिएत युनियनच्या पतनाच्या दोन वर्षांनंतर, त्याचे पुन्हा एकदा मारियोपोल असे नामकरण करण्यात आले. ब्रिटीश लष्कराचे माजी कमांडर जनरल सर रिचर्ड बॅरॉन यांनी बीबीसीला सांगितले की, मारियोपोल ताब्यात घेणे हे रशियासाठी खूप महत्त्वाचे आहे.

मारियोपोल ताब्यात घेतल्याने रशियाने आता युक्रेनच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील ८० टक्के भूभाग ताब्यात घेतला आहे. यामुळे युक्रेन केवळ सागरी व्यापारापासून दूर होणार नाही, तर जगापासून ते वेगळाही होईल. रशियाने मारियोपोलवर बंदुका, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनी इतका विध्वंस केला आहे की जवळपास ९० टक्के शहर उद्ध्वस्त झाले आहे. अंदाधुंद बॉम्बस्फोटाने घरे, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक इमारतींना फटका बसला आणि हजारो लोक मारले गेले. त्यामध्ये आश्रयस्थान म्हणून वापरल्या जात असलेल्या मारियोपोल ड्रामा थिएटरवर झालेल्या हवाई हल्ल्यात मारले गेलेल्या सुमारे ३०० लोकांचा समावेश आहे.

युक्रेनने कसा विरोध केला?

युक्रेनने मारियोपोलच्या रक्षणासाठी आपले काही सर्वोत्तम सैन्य पाठवले. त्यामध्ये ३६ वी मरीन ब्रिगेड, गृह मंत्रालयाचे सैन्य, सीमा रक्षक आणि नॅशनल गार्डची अझोव्ह रेजिमेंट यांचा समावेश होता. ही रेजिमेंट युक्रेनच्या सर्वात सक्षम युनिट्सपैकी एक म्हणून ओळखली जाते.

रशियाने मारियोपोलमध्ये रस्त्यावरील लढाया करण्यासाठी चेचेन स्पेशल फोर्स तैनात केली आहे. ते त्यांच्या क्रूरतेसाठी ओळखले जातात. चेचन्याचा नेता, रमझान कादिरोव्ह, मारियोपोलमध्ये युक्रेनियन लोकांना पराभूत करण्याबद्दल सोशल मीडियावर वारंवार भाषण देत आहे. पण युक्रेनकडून प्रतिकार सुरुच आहे.

या स्टील प्लांटच्या लढाईला इतका वेळ का लागला?

मॉस्कोच्या अंदाजानुसार काही हजार युक्रेनियन सैन्य या प्लांटमध्ये आहेत, जे सुमारे ११ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, सुमारे १,००० नागरिक देखील प्लांटमध्ये अडकले आहेत.

मारियोपोल ताब्यात आल्याचे व ते स्वतंत्र झाल्याचे चित्र जरी पुतिन उभे करत असले तरी येथील स्टील प्लांट पूर्णपणे ताब्यात आल्याशिवाय, मारियोपोल संपूर्णपणे जिंकल्याचे ते जाहीर करणार नाहीत. रशियाचे संरक्षण मंत्री सर्जेई शोईगू यांनी सांगितले, की युक्रेनचे दोन हजार सैनिक अद्याप या प्लांटमध्ये सुमारे ११ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या बोगदे आणि बंकर यांच्या चक्रव्यूहात लपलेले आहेत.

Story img Loader