भक्ती बिसुरे

छातीतील जळजळ किंवा ॲसिडिटी या सर्रास जाणवणाऱ्या शारीरिक त्रासावर तेवढेच सर्रास घेतले जाणारे औषध म्हणजे झेन्टॅक. या औषधामुळे अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचा आरोप करत अमेरिकन ग्राहकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र उत्पादक कंपन्यांनी पाच लाख अमेरिकन डॉलरची रक्कम देऊन हे प्रकरण न्यायालयाबाहेरच मिटवल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकन ‘एफडीए’कडून या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. भारतातही झेन्टॅकचे स्थानिक झिंटॅक हे औषध उत्पादन कोणत्याही चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) म्हणजेच ‘ओव्हर द काऊंटर’ विकले जाते. हे औषध आणि त्याच्याशी संबंधित प्रकरण नेमके काय आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते विकत घेण्यातील धोका काय अशा मुद्द्यांबाबत हे विश्लेषण.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
Redevelopment of Abhyudaya Nagar Colony through open tender
मुंबई : खुल्या निविदेद्वारे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?

झेन्टॅक हे काय आहे?

छातीतील जळजळ किंवा ॲसिडिटी बरे करणारे एक औषध म्हणजे झेन्टॅक होय. जठरामध्ये निर्माण झालेले ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच पोट आणि आतड्यांमधील अल्सर बरे करण्यासाठी हे औषध वापरले जाते. गॅस्ट्रोएसोफॅगेल रिफ्लक्स डिसिज बरा करण्यासाठीही या औषधाचा वापर होतो. या औषधामध्ये कर्करोगकारक घटक आढळल्याने अमेरिकन एफडीएने हे औषध बाजारातून मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. काही संशोधकांनी या औषधातील घटकांचा संबंध हा मूत्राशय आणि इतर अवयवांच्या कर्करोगाशीही जोडला आहें. रॅनिटिडाईन या घटकाची ॲलर्जी असल्यास झेन्टॅक न घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. शिवाय बाजारात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही हे औषध सहज उपलब्ध असले, तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते न घेण्याबाबत तज्ज्ञ आग्रही आहेत.

विश्लेषण: करोनाचा प्रसार आता थांबला आहे का? करोना अजून किती काळ टिकणार? तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?

अमेरिकेतील प्रकरण नेमके काय?

झेन्टॅक या औषधाचे उत्पादन करणाऱ्या जेनेरिक औषध उत्पादक कंपन्यांविरुद्ध अमेरिकन नागरिक जोसेफ बायर यांनी तेथील इलिनॉय राज्य न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तेवा फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रिज लिमिटेड, पेरिगो कंपनी, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि डॉ. रेड्डीज या त्या कंपन्या होत. झेन्टॅक औषध घेतल्यामुळे अन्न नलिकेचा कर्करोग झाल्याचे सांगत बायर यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, न्यायालयात खटला चालण्यापूर्वीच तेवा फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रिज लिमिटेड, पेरिगो कंपनी, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांनी जोसेफ बायर यांना एकत्रितपणे पाच लाख अमेरिकन डॉलर देऊन न्यायालयाबाहेर हे प्रकरण मिटवण्याचा मार्ग पत्करला. बायर हे सध्या कर्करोगावरील उपचारांसाठी अमेरिकन रुग्णालयात दाखल आहेत.

न्यायालयीन लढाईचे काय?

झेन्टॅक औषध वापरकर्त्यांनी जेनेरिक औषध उत्पादक कंपन्या तसेच फायझर इंक आणि जीएसके पीएलसी या सारख्या कंपन्यांवर न्यायालयात दावा दाखल केला. सदर औषधामध्ये रेनिटिडाइन सारखे अपायकारक घटक होते. तसेच नायट्रो सोडिमेथिलामाईनसारखे धोकादायक घटकही होते. त्याबद्दल वर्षानुवर्षे माहिती असून देखील कंपन्यांनी या उत्पादनाची विक्री करणे थांबवले नाही, असा आरोप करुन या औषध ग्राहकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर या औषधाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या परिस्थितीमुळे झेन्टॅकची उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर बाजारातील समभाग कोसळले. मात्र, जीएसके, फायझर आणि बोहरिंजर यांसारख्या कंपन्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी (सेटलमेंट) कोणतेही प्रयत्न केले नाहीत तसेच ते शेवटचे प्रतिवादी असल्याने त्यांच्यावरील दावेही फेटाळण्यात आले. जीएसके या कंपनीने रेनिटिडाईन आणि कर्करोगाचा काहीही संबंध नसल्याने झेन्टॅक आणि कर्करोग यांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, उर्वरित कंपन्यांनी मात्र ‘आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट’चा पर्याय निवडत बायर यांना पाच लाख अमेरिकन डॉलर एकत्रितपणे दिले.

जोसेफ बायर यांचा न्यायालयीन दावा कमकुवत का?

झेन्टॅक औषधाचे उत्पादन करणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांविरुद्ध जोसेफ बायर यांनी केलेला न्यायालयीन दावा कमकुवत ठरण्याचे एक कारण म्हणजे बायर यांनी आपण झेन्टॅक औषधाचे जेनेरिक की ब्रँडेड उत्पादन घेतले, याबाबतची त्यांची साक्ष संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यामुळे नेमके ब्रँडेड औषधामुळे कर्करोग झाला की जेनेरिक याबाबत ठोस निष्कर्ष काढता येणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर बायर यांच्या वकिलांनी त्यांचा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे.

भारतात झिन्टॅक विक्री सुरुच?

रेनिटिडाईन, नायट्रोसोडिमेथिलामाईन सारखे कर्करोग निर्माण करणारे घटक झिन्टॅकमध्ये आहेत, हे माहिती असल्याने अमेरिकेत या औषधाच्या विक्रीवर अधिकृत बंदी घालण्यात आली आहे. भारतात मात्र सर्रास हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही बाजारात सहज विक्रीस उपलब्ध आहे. ॲसिडिटी या एका कारणास्तव हे किंवा झिन्टॅक प्रकारातील औषधे सर्रास विकत घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचे सेवन करणे घडते हे आपण पाहतोच. मात्र, औषध निर्मितीमध्ये समाविष्ट घटक, त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम, दुष्परिणाम याबाबतचे ज्ञान डॉक्टरांना अधिक नेमक्या स्वरtपात असल्याने कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.