तंत्रज्ञानात प्रत्येक दिवशी खूप वेगाने बदलत होत आहेत. मग तो मोबाईल असो किंवा त्यात बसवलेले सिमकार्ड असो. प्रत्येक गोष्ट काळासोबत बदलत असते. अलीकडेच सामान्य सिमच्या ऐवजी ई-सिम (eSIM) सादर केले गेले आहे. तसेच लवकरच हे व्हर्च्युअल ई-सिम प्रत्यक्ष सिम कार्डऐवजी वापरले जाईल. पण ई-सिम म्हणजे काय? ते कसे काम करते आणि सामान्य सिम कार्डपेक्षा वेगळे कसे आहे?

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

 सिम कार्ड म्हणजे काय?

सध्या, आपण फोनमध्ये जे सिम कार्ड वापरतो ते सामान्य सिम कार्ड म्हणून गणले जाते. हे सिमकार्ड प्लास्टिकचे बनलेले असून त्याच्या मध्यभागी धातू वापरला आहे. हे वापरणाऱ्याशी संबंधित सर्व माहिती या धातूच्या भागामध्ये असते. सामान्य सिम कार्डच्या मदतीने तुम्ही कॉल करू शकता तसेच डेटा वापरू शकता. सामान्य सिम कार्डमध्ये काही स्टोरेज देखील दिले जाते. या स्टोरेजमध्ये तुम्ही लोकांची नावे आणि नंबर सेव्ह करू शकता. जर तुम्ही सामान्य सिम कार्डमध्ये नाव आणि नंबर सेव्ह केला तर ते इतर फोनवर देखील ट्रान्सफर करू शकतो.

पाहा व्हिडीओ –

ई-सिम म्हणजे काय?

सामान्य सिमकार्डच्या उलट, प्लॅस्टिक फिजिकल सिमऐवजी त्यामध्ये एक छोटी चिप दिली जाते. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून ही चिप काढू शकत नाही. माध्यमांच्या वृत्तांनुसार, ई-सिम लवकरच फिजिकल सिमची जागा घेणार आहे. ई-सिमच्या मदतीने तुम्हाला एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कवर शिफ्ट करणे सोपे होईल. ई-सिम बदलण्याची सुविधा दिली जात नाही कारण ते स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच बसवलेले असते. तुम्ही एका ई-सिममध्ये पाच पर्यंत सिम कार्ड्स स्टोअर करू शकता. म्हणजे तुम्ही एकाच ई-सिममध्ये वर पाच नेटवर्क वापरण्यास सक्षम असाल. ई-सिमच्या मदतीने स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमधील जागेचा वापर कमी करू शकतील. ई-सिमच्या मदतीने स्मार्टफोन स्‍लिम आणि हलके बनण्‍यास मदत होते. अमेरिकन टेलिकॉम कंपनी T-Mobile नुसार, तुम्ही एका ई-सिममध्ये १० ई-सिम प्रोफाइल जोडू शकता.

ई-सिम कसे वापरावे?

जर तुमचा स्मार्टफोन ई-सिम सह आला असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे वापरू शकाल.

तुमच्या स्मार्टफोनमध्ये ई-सिम वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग उघडावी लागेल आणि Add Mobile Plan पर्याय निवडावा लागेल.

तुमच्या ईमेल आयडीवर क्यूआर कोड पाठवला जाईल. तो क्यूआर कोड स्कॅन करून, तुम्ही ही सेवा वापरू शकाल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why use of e sim is necessary how to use abn
First published on: 07-07-2022 at 19:35 IST