Chikungunya Symptom and Treatment: माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची पत्नी डोना गांगुली यांना चिकनगुनियाचे निदान झाल्याने कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वुडलँड्स हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. रुपाली बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हिमोडायनॅमिकली डोना यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना सध्या लिक्विड डाएटवर ठेवण्यात आले आहे. मंगळवारी डोना यांना अचानक ताप, स्नायू दुखी तसेच अंगावर पुरळ असे त्रास जाणवू लागले. खबरदारी म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता डोना यांना चिकनगुनियाचे निदान झाले आहे. चिकनगुनिया हा आजार नेमका काय आहे आणि यापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चिकनगुनिया म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार चिकनगुनिया या आजाराचे नाव हे चिकनगुनिया व्हायरस (CHIKV) यावरून पडले आहे. अगदी साध्या शब्दात सांगायचे तर हा एक संसर्गजन्य विषाणू आहे तो सहसा डासांमुळे संक्रमित होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे मानवी वस्तीच्या जवळ असणे हे चिकुनगुनियामागील सर्वात मोठे कारण आहे.

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

चिकनगुनियाची लक्षणे

चिकनगुनियाच्या संसर्गामुळे ताप, तीव्र सांधेदुखी, स्नायू दुखणे, सांधे सुजणे, डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि पुरळ येते अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. जागतिक आरोग्य संस्थेने नमूद केले आहे की चिकनगुनियाशी संबंधित सांधेदुखी अनेकदा शरीरातील शक्ती संपवून टाकते म्हणजेच तुम्हाला प्रचंड थकवा जाणवू शकतो. विशेष म्हणजे मध्येच आराम वाटू शकतो पण पुन्हा थोड्या थोड्या वेळाने सांधे दुखी सुरु होते. मात्र हे एकमेव कारण चिकनगुनियाचे लक्षण आहे असा दावा करता येणार नाही, असे नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, गुरुग्रामचे वरिष्ठ सल्लागार डॉ. तुषार तायल यांनी सांगितले आहे.

चिकुनगुनिया निदान कसे होते?

एखाद्या व्यक्तीमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्यांनी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना भेटावे, असे डॉ. तायल यांनी सांगितले. चिकनगुनियाची लक्षणे सहसा मलेरिया आणि डेंग्यू सारख्या इतर डासांमुळे पसरणाऱ्या आजारासारखी असतात. रोगाचे निश्चित निदान करण्यासाठी रक्त तपासणीचा सल्लादिला जातो.

चिकगुनियावर उपचार

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, तूर्तास चिकनगुनियावर कोणतेही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. डॉ तायल पुढे सांगतात की, या रुग्णांना विश्रांती घेण्याचा व भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करावे. चिकुनगुनियामुळे मृत्यूचे प्रमाण अगदीच कमी आहे किंबहुना यामुळे आरोग्याबाबत गुंतागुंत होण्याचेही प्रमाण कमी असते. काहीजण आठवड्याभरातही या विषाणूंवर मात करू शकतात तर काहींना सांधे आणि स्नायूदुखीचा त्रास काही दिवस ते अगदी वर्षभर कायम राहतो.

भारतीय स्पाइनल इंज्युरीज सेंटरमधील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, वरिष्ठ सल्लागार डॉ विवेक महाजन यांनी सांगितले की “चिकुनगुनिया संधिवात तीन महिन्यांपर्यंत आणि क्वचित प्रसंगी एक वर्षापर्यंत टिकू शकतो. यामध्ये जर आपण सांध्यांची अजिबात हालचाल केली नाही तर वेदना वाढू शकतात, यामुळेच सहसा सकाळच्या वेळी (रात्री स्नायूंची हालचाल होत नसल्याने) वेदना अधिक तीव्र होतात. आपण एक साधारण हालचाल करत सांधे सक्रिय ठेवावे आणि सूज आल्याचे वाटत असल्यास त्याला गरम किंवा थंड पाण्याने शेक द्यावा.

कोणतीही औषधे घेण्यापूर्वी, नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. “वेदना निवारक औषधांचा अतिवापर आणि दीर्घकालीन वापर तुमच्या मूत्रपिंड आणि यकृतासाठी हानिकारक ठरू शकतो,” असेही डॉ महाजन यांनी सांगितले आहे.

चिकनगुनिया कसा रोखू शकता?

चिकुनगुनियाचा प्रसार डास चावल्याने होतो त्यामुळे डासांचा संपर्क टाळणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे, असे डॉ. तायल यांनी नमूद केले.