दिल्लीमध्ये जी-२० सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. दरम्यान, या बैठकीसाठी आलेल्या (६ मार्च) जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेअरबॉक यांची वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. बेअकरबॉक यांच्या आगमनादरम्यान भारताने शिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) पालन केले नाही, असा आरोप समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे. हा आरोप करताना बेअरबॉक विमानातून उतरतानाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विदेशी पाहुण्यांचे स्वागत करताना काय काळजी घेतली जाते? स्वागतासाठीचा प्रोटोकॉल काय असतो? बेअरबॉक यांच्या स्वागतादरम्यान नेमके काय घडले होते? हे जाणून घेऊ या.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘नॅक’ म्हणजे काय? मूल्यांकन प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या सविस्तर

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या आगमनादरम्यान काय घडले?

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेअरबॉक जी-२० सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आल्या होत्या. दिल्ली विमानतळावर त्यांचे विमान उतरले होते. नियमानुसार त्यांच्या स्वागतादरम्यान रेड कार्पेट असायला हवे होते. तसेच भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकृतपणे स्वागत करणे अपेक्षित होते. मात्र बेअरबॉक विमानतळावर आल्यानंतर तेथे कोणीही नव्हते. समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीमध्ये बेअरबॉक एकट्याच विमानतळावर चालत असल्याचे दिसत आहे. काही अंतर चालल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अधिकारी आल्याचे दिसत आहे. याच व्हिडीओचा आधार घेत, जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांचे उचित आदरातिथ्य झाले नसल्याचा आरोप केला जात आहे.

परराष्ट्रमंत्र्यांच्या स्वागतासाठीचा नियम काय आहे?

अन्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिष्टाचाराचे पालन करावे लागते. यामध्ये अन्य देशांचे परराष्ट्रमंत्री आपल्या देशात दाखल झाल्यानंतर त्यांचे अधिकृतपणे स्वागत करावे लागते. त्यासाठी रेड कार्पेट टाकले जाते. तसेच त्यांच्या आगमनावेळी शासकीय अधिकारीदेखील उपस्थित असतात. परराष्ट्रमंत्री बाहेर येताच हे अधिकारी त्यांचे अधिकृतपणे स्वागत करतात. जेव्हा परदेशातील पाहुणे त्यांच्या स्वत:च्या विमानाने येत असतील तेव्हाच अशा प्रकारे स्वागत करावे लागते. जेव्हा एखादा परदेशी पाहुणा येत असतो त्या वेळी दोन्ही देशांचे दूतावास एकमेकांच्या संपर्कात असतात. तसेच परदेशी पाहुण्याच्या आगमनाबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या शिष्टाचार विभागालाही सांगितले जाते. मिळालेल्या माहितीप्रमाणे शिष्टाचारानुसार स्वागताची तयारी केली जाते. स्वागतादरम्यान विमानाचे आगमन अर्धा तास उशिराने किंवा लवकर होईल, असे गृहीत धरले जाते. त्यानुसारच स्वागताची तयारी केली जाते.

हेही वाचा >>> विश्लेषण : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ या STEM क्षेत्रातील लैंगिक गुणोत्तराची तफावत

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बाबतीत नेमके काय घडले?

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेअरबॉक जी-२० सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी दिल्लीत आल्या होत्या. मात्र, निर्धारित वेळेच्या अर्धा तास अगोदर त्यांचे विमान दिल्लीच्या विमानतळावर दाखल झाले. बेअरबॉक आल्याचे समजताच त्यांना काही काळ विमानातच थांबण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी विमानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिष्टाचारानुसार त्यांचे स्वागत होऊ शकले नाही.

खरेच भारताकडून चूक झाली?

याबाबत जर्मनीचे राजदूत फिलीप अकेरमान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारताने काहीही चूक होऊ दिली नाही. त्यांनी शिष्टाचाराचे पालन केले, असे जर्मनीच्या राजदूतांनी स्पष्ट केले आहे. “आम्ही बेअरबॉक यांना कॉन्फरन्स सेंटरमध्ये जाण्यास सांगणार होतो. मात्र वेळेच्या अगोदर आल्यामुळे आम्ही त्यांना विमानातच थांबण्याची विनंती केली. आमच्या विनंतीनंतर बेअरबॉक यांनी विमानात ब्रेकफास्ट केला. त्यानंतर कसलीही माहिती न देता त्यांनी विमानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या शिष्टाचाराचा येथे प्रश्नच निर्माण होत नाही. भारताने राजशिष्टाचार यथायोग्य पाळला,” असे जर्मनीच्या राजदूतांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> विश्लेषण: लालूप्रसाद यादव यांची चौकशी होत असलेला ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळा काय आहे?

आमची कोणतीही तक्रार नाही

“विशेष म्हणजे स्वागतासाठी शासकीय अधिकारी नसल्यामुळे जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री नाराज नाहीत. बेअरबॉक विमानातून बाहेर आल्याचे तुम्ही पाहिले आहे. विमानतून बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. आमचे उत्तमपणे स्वागत करण्यात आले, अशी भावना बेअरबॉक यांनी व्यक्त केलेली आहे. विमानताळावर जे काही घडले, त्याबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही,” असेही जर्मनीचे राजदूत फिलिप यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> विश्लेषण: वैधानिक विकास मंडळांचे पुनर्गठन केव्‍हा होणार?

जी २० च्या या बैठकीला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव, चीनचे परराष्ट्रमंत्री किन जांग, फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री कॅथरीन कोलोना, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरले, इटलीचे परराष्ट्रमंत्री अँटोनिओ ताजान, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वॉंग, सौदी अरेबियाचे समकक्ष प्रिन्स फैसल बीन फरहान, इंडोनियेशियाचे समकक्ष रेन्टो मारसूदी, अर्जेंटिनाचे परराष्ट्रमंत्री सँन्टिगो क्रफेईरो आणि युरोपियन युनियनचे परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण विभागाचे प्रतिनिधी जेसेफ बेरेल उपस्थित होते.