मिरची म्हटली की आपल्याला कोल्हापुरी मिरचीचा ठसका आठवतो. मला हो म्हणतात लवंगी मिरची असं एक गाणंही प्रसिद्ध झालं आहे. पण जगातली तिखट मिरची असं ज्या मिरचीला म्हटलं जातं त्या मिरचीचं नाव आहे Carolina Reaper. जगातली सगळ्यात तिखट मिरची म्हणून ही मिरची ओळखली जाते. एक मिरचीचा झटका एवढा प्रचंड आहे की ती खाल्ल्यावर प्राण कंठाशी येईल. ही एक तिखट मिरची म्हणजे आग जाळच जणू. मात्र काही सेकंदामध्ये १० मिरच्या खाण्याचा विक्रम एका पठठ्याने केला आहे. तसंच सर्वात कमी सेकंदांमध्ये तीन कॅरोलिना रिपर मिरच्या खाण्याचा विक्रमही याच माणसाच्या नावे आहे.

कॅरोलिना रिपर खायचा गिनिज रेकॉर्ड कुणाच्या नावे?

कॅरोलिना रिपर ही मिरचीच्या झटक्यापेक्षा प्रचंड तिखट असलेलेली मिरची खाण्याचा गिनिज बुक रेकॉर्ड ग्रेगरी फोस्टरच्या नावे आहे. ग्रेगरीने ३३.१५ सेकंदात दहा केरोलिना रॅपर मिरच्या खाल्ल्या. ८.७२ सेकंदात तीन कॅरोलिना रॅपर मिरची खाण्याचा रेकॉर्डरी फोस्टरच्या नावावर आहे. ही मिरची खाल्ल्यावर ग्रेगरीने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला ही मिरची खाल्याने मज्जासंस्था सुधारण्यास मदत होते. गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. मला तरी हाच अनुभव आला असं त्याने सांगितलं.

जगभरातली सर्वात तिखट मिरची कुठली?


जगभरातली सर्वात तिखट मिरची कुठली या प्रश्नाचं उत्तर आहे कॅरोलिना रॅपर. आता कदाचित तुम्हाला हे वाटेल की मिरची तिखटच असते मग ही मिरची सर्वात तिखट हे कसं काय ठरवलं? त्याचं मूल्यमापन कसं काय गेलं असेल? खरं तर मिरची किती तिखट आहे हे चव घेतल्यावर लगेचच समजतं. मात्र मिरचीचा तिखटपणा स्कोविल स्केलवर मोजला जातो. विल्बर स्कोविल यांनी मिरचीचा तिखटपणा किती आहे याचं मूल्यमापन करण्यासाठी हे परिमाण तयार केलं होतं. त्यामुळे हे परिमाण त्यांच्याच नावाने ओळखलं जातं. कॅरोलिना रिपर ही मिरची १,५६९,३०० SHU ते २,२००,००० SHU या प्रमाणात तिखट असते. SHU चा अर्थ स्कोविल हिट युनिट असा आहे. मिरचीमध्ये किती गरमपणा आहे हे याद्वारे मोजलं जातं. त्यावरून ती किती तिखट असेल याचा अंदाज बांधला जातो.

२००७ मध्ये भारतातली मिरची ठरली होती सर्वात तिखट

२००७ मध्ये भारतातली भूत जोलिकया ही मिरची जगातली सर्वात तिखट मिरची ठरली होती. मात्र केरोलिना रिपर ही मिरची जगातली सर्वाधिक तिखट मिरची ठरली आहे. भारतातल्या भूत जोलोकिया या मिरचीचं नावही गिनिज बुकात नोंदवलं गेलं आहे. डीएनएने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

जगातल्या १० सर्वाधिक तिखट मिरच्या कुठल्या?

१) कॅरोलिना रिपर
२) त्रिनिनाद मोरुगा
३) नागार मोरिच
४) भूत जोलोकिया
५) हेबानेरो रेड साविना
६) हेबानेरो
७) स्कॉच बोन्नर
८) मॅनजानो
९) केयन्नी
१०) रेड हॉट चिली

मिरची जास्त प्रमाणात खाल्ली तर काय अपाय होतो?

आरोग्य विभागातले आहार तज्ज्ञ असतील किंवा डॉक्टर्स असतील ते असं सांगतात की मिरचीमध्ये कॅप्साइसिनचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे मिरची जास्त प्रमाणात खाल्ली तर ती अपायकारक ठरते. खूप जास्त प्रमाणात मिरची खाल्ली तर शरीरातली हानिकारक द्रव्यं (Toxic) वाढतात. त्यामुळे शरीराचं तापमानही वाढतं. जास्त प्रमाणात मिरची खाल्याने तोंड येणं, तोंडाची आग होणं, तोंडाला सूज येणं, उलटी होणं, पोट बिघडणं या सगळ्या समस्या भेडसावू शकतात.