Heart attack prevention tips for age 20s, 30s, and 40s: हरियाणा राज्य विधानसभेत बुधवारी सादर करण्यात आलेल्या एका धक्कादायक अहवालामुळे सार्वजनिक आरोग्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या अहवालानुसार, गेल्या सहा वर्षांत राज्यात १८ ते ४५ वयोगटातील सुमारे १८,००० लोकांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) किंवा हृदयविकारामुळे झाला आहे. PTI ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेसच्या एका आमदाराने विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात राज्य सरकारने ही माहिती दिली आहे. २०२० नंतर हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये झालेली वाढ कोविड-19 संसर्ग किंवा लसीकरणाच्या दुष्परिणामांशी संबंधित आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, सरकारने स्पष्ट केले की, अशा कोणत्याही संबंधाला सिद्ध किंवा खोडून काढण्यासाठी अद्याप कोणताही अधिकृत अभ्यास किंवा सर्वेक्षण करण्यात आलेले नाही.
२०२५ मधील All India Institute of Medical Sciences (AIIMS) आणि Indian Council of Medical Research (ICMR) यांच्या संयुक्त संशोधनानुसार, १८ ते ४५ वयोगटातील निरोगी भारतीयांमध्ये होणाऱ्या अचानक मृत्यूंचे मुख्य कारण म्हणजे निदान न झालेला हृदयविकार (undiagnosed heart disease) आहे. Indian Journal of Medical Research मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे आढळले आहे की, अशा प्रकरणांपैकी ४२.६ टक्के मृत्यू हे हृदयाशी संबंधित समस्यांमुळे झाले, तर उर्वरित मृत्यूंचे अस्पष्ट कारण बहुधा हृदयाच्या अनुवांशिक विकारांशी (inherited electrical disorders) संबंधित असू शकते.
हृदयविकाराचा बदलता धोका
पूर्वी हृदयविकार हा मुख्यतः वृद्धांचा प्रश्न मानला जात होता. मात्र हरियाणातील आकडेवारीतून लोकसंख्येतील बदल स्पष्टपणे दिसून येतो.
डॉ. बिमल छाजेर (Dr. Bimal Chhajer-तज्ज्ञ: non-invasive cardiology) यांनी संगितले की, २० आणि ३० वयोगटातील लोकांना वाटणारी ‘आपल्याला काही होणार नाही’ ही भावना अनेकदा धोकादायक भ्रम ठरते. या वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी त्यांच्या Saaol.com या वेबसाइटवरील ब्लॉगमध्ये आधुनिक जीवन शैलीला अनुसरून हृदयाच्या आरोग्यासाठी खास उपाय सुचवले आहेत.
डॉ. बिमल छाजेर सांगतात की, या काळात (20s) तयार होणाऱ्या जीवनशैलीविषयक सवयी… आहार, व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन भविष्यात हृदय किती सक्षम राहील हे ठरवतात.
काय लक्षात ठेवावे?
- Heart-first आहार: धान्य (whole grains), ताजी फळे आणि कमी चरबीयुक्त प्रथिने (lean proteins) यांना प्राधान्य द्या.
- Red list – टाळा: जंक फूड, जास्त मीठ आणि तळलेले पदार्थ शक्य तितके कमी करा.
- १५० मिनिटांचा नियम: दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम (जसे वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकलिंग) करण्याचा प्रयत्न करा.
- मानसिक स्वच्छता (Mental hygiene): करिअरची सुरुवात आणि सामाजिक बदलांमुळे येणारा ताण नियंत्रित करण्यासाठी ध्यान (meditation) किंवा दीर्घ श्वसन (deep breathing) यांचा सराव सुरू करा.
तुमच्या तिशी 30s आणि चाळीशी 40s मध्ये: सतर्कतेचा टप्पा (The Vigilance Phase)
डॉ. बिमल छाजेर Dr. Bimal Chhajer यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना संगितले की, या वयोगटात करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे शारीरिक हालचाल (physical activity) अनेकदा कमी होते. याच काळात उच्च रक्तदाब (high blood pressure) आणि कोलेस्ट्रॉल (cholesterol) सारखे सायलेंट किलर्स (silent killers) हळूहळू दिसू लागतात. बहुतेक लोक करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शारीरिक व्यायामापासून दूर राहतात,” असे डॉ. छाजेर सांगतात. “पण प्रत्यक्षात हाच तो काळ असतो, जेव्हा हृदयाला सर्वाधिक हालचालीची गरज असते.”
त्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना:
‘Know your numbers’ तपासणी: रक्तदाब (BP), कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर (blood sugar) यांची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर समस्या ओळखल्यास ती सहज नियंत्रणात ठेवता येते; अन्यथा ती गंभीर हृदयविकाराच्या झटक्यात (cardiac event) बदलू शकते.
परिस्थितीनुसार व्यायाम (Adaptive activity): व्यग्र दिनचर्येमुळे जिमला जाणे शक्य नसेल, तर घरातच हालचाल वाढवण्याचे मार्ग निवडा; जसे योग किंवा घरकाम. यामुळे हृदय सक्रिय आणि सक्षम राहते. हरियाणातील ही आकडेवारी एक स्पष्ट इशारा देते की, हृदयाचे आरोग्य ही आयुष्यभराची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञ लोकांना हृदयविकार हा केवळ वृद्धांचा आजार आहे, या समजुतीपलीकडे जाऊन आजपासूनच सक्रिय पावले उचलण्याचे आवाहन करत आहेत.
जानेवारी महिन्यात HT Lifestyle ला दिलेल्या मुलाखतीत Dr. Pratik Giri, कन्सल्टंट (कार्डिओलॉजी), Dr L H Hiranandani Hospital यांनी तरुण भारतीयांमध्ये वाढत असलेल्या हार्ट अटॅक आणि हृदयविकाराच्या समस्यांमागील कारणांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले.
हरियाणातील १८,००० मृत्यूंची ही संख्या फक्त आकडे नाहीत, तर आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा इशारा आहे. हृदयविकार आता फक्त वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो तरुणांनाही होत आहे. डॉक्टर सांगतात की, हृदयविकार अचानक होत नाही, तो आपल्या रोजच्या सवयींमुळे हळूहळू वाढत जातो. त्यामुळे २० व्या वर्षात चांगल्या सवयी लावणे, ३० व्या वर्षात तपासणी करणे आणि ४० व्या वर्षात काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजपासून थोडं चालणं, योग्य खाणं आणि वेळेवर तपासणी करणं सुरू करा यामुळे पुढे मोठा धोका टाळता येवू शकतो
