निमा पाटील

अमेरिकेतील हवाई बेटे ही शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे पर्यटकांच्या विशेष पसंतीची आहेत. गेल्या आठवड्यात तिथे लागलेल्या वणव्यामध्ये १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आणि तो वाढण्याची शक्यता आहे. हा वणवा कसा लागला आणि त्याचे काय परिणाम होतील याचा घेतलेला हा आढावा.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Sharad Pawar on EVM machine
Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन…
newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

हवाई बेटांवरील वणव्याचे वैशिष्ट्य काय आहे?

हवाई बेटांवर वणवे नवीन नाहीत. मात्र, या वेळी लागलेला वणवा आतापर्यंतच्या सर्वात भीषण वणव्यांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत या वणव्यामध्ये १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या किमान शंभर वर्षांच्या इतिहासातील हा सर्वांत भीषण वणवा आहे. अटलांटिक महासागरातील डोरा चक्रीवादळामुळे वाहिलेले जोरदार वारे आणि कोरडे हवामान यामुळे आग अधिक भडकली. माउ बेटावरील दुष्काळ, यंदा नेहमीपेक्षा अधिक उष्ण उन्हाळा, त्यामुळे शुष्क झालेल्या वनस्पती याचाही परिणाम झाला.

वणवा कसा पसरतो?

वणवा पसरण्यासाठी वनस्पती किंवा वृक्ष, ठिणगी आणि आग पसरण्यासाठी पोषक हवामान या तीन गोष्टी आवश्यक असतात. हवाई बेटांवरील यंदा जवळपास १४ टक्के भूभागावर तीव्र ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शतकाच्या तुलनेत हवाई बेटांच्या ९० टक्के भागांवरील पर्जन्यमान घटले आहे. हवाई बेटांवर गियाना गवतासारख्या बाहेरून आणलेल्या वनस्पतींचे अनेक प्रकार मूळ हवाई बेटांवरील वनस्पतींपेक्षा अधिक ज्वालाग्राही आहेत. तेथील जवळपास २६ टक्के भूभागांवर हे गवत पसरले आहे. आग भडकण्यात अशा वनस्पतींचाही हातभार लागला.

लहेनामध्ये वणव्यामुळे काय नुकसान झाले?

लहेना हे माउ बेटावरील हवाई राजघराण्याच्या राजधानीचे शहर होते. या ऐतिहासिक शहरामध्ये लागलेल्या आगीत २,२०० पेक्षा जास्त इमारती जळून नष्ट झाल्या. घरे, दुकाने, चर्च यांच्या जागांवर आता वितळलेल्या धातूंचा सांगाडा आणि राख शिल्लक राहिली. लहेनामधील वाहनेही आगीच्या तावडीतून सुटली नाहीत. मुख्य म्हणजे, जळालेल्या अवशेषांमधील केवळ ३ टक्के भागांचा शोध घेतल्यानंतर हाती आलेली ही आकडेवारी आहे. शोधकाम जसजसे पुढे सरकेल तसतसा मृतांचा आकडा झपाट्याने वाढल्याचे दिसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हवाई बेटांवर नेहमी वणवे लागतात का?

हवाई बेटांवर वणवे यापूर्वीही लागले आहेत. हवाई बेटांवर यापूर्वीचा वणवा पाच वर्षांपूर्वी लागला होता. त्यामध्ये दोन हजार एकर जमिनीचे नुकसान झाले. ३१ वाहने आणि २१ इमारती जळाल्या होत्या.

विश्लेषण: निर्वासितांच्या नौका का बुडतात?

लहेनामधील वाचलेल्या लोकांनी काय माहिती दिली?

गेल्या आठवड्यात, मंगळवारी ८ ऑगस्टला लहेनामध्ये सकाळपासूनच विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मात्र, ही धोक्याची घंटा आहे अशी शंका स्थानिकांना आली नाही. सुरुवातीला ताशी १०५ किमी आणि नंतर १३० किमी वेगाने वाहणाऱ्या डोरा चक्रीवादळाचा परिणाम होईल याची लोकांना कल्पना होती. हवेमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली धूळ आणि राख ही जवळपास सुरू असलेल्या बांधकामांमुळे असेल असे लोकांना वाटले. दुपारनंतर परिस्थितीने गंभीर वळण घेतले आणि रात्रीपर्यंत वणवा रहिवासी भागापर्यंत पोहोचला. त्यानंतर ज्यांना शक्य होते त्यांनी जळत्या घरातून पळ काढला.

लहेनामधील जीवितहानी कमी करता आली असती का?

स्वतःचा जीव वाचवण्यात यश मिळालेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीबद्दल त्यांना कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. यामुळे संबंधित प्रशासनाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रहिवाशांना पूर्वसूचना दिली गेली असती तर अधिक लोकांचे प्राण वाचवता आले असते. आपल्याला कोणताही धोक्याचा इशारा देणारा भोंगा ऐकू आला नाही, असे जवळपास २० जणांनी सांगितले. हा भोंगा वाजला नाही हे अधिकाऱ्यांनीही मान्य केले. आता त्याचा तपास केला जात आहे.

वणव्याचा लहेनाच्या पर्यावरणावर काय परिणाम होईल?

या वणव्याचा लहेनाच्या पर्यावरणावर घातक परिणाम होईल, अशी भीती तज्ज्ञांना वाटत आहे. जमिनीची वेगाने धूप होईल, जलमार्गांमध्ये अधिक गाळ जमा होईल आणि या बेटांचे वैशिष्ट्य असलेल्या प्रवाळांचे नुकसान होईल हे गंभीर धोके पर्यावरणतज्ज्ञांना जाणवत आहेत. सागरी जीवन आणि जवळपास राहणारे मानवी जीवन यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जमिनीवरील दूषित घटक सातत्याने समुद्रात सोडले गेले तर त्यामुळे प्रवाळांना अधिक धोका निर्माण होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दुसरे म्हणजे पिण्याचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका मोठा आहे. खासगी उथळ विहिरींमध्ये हे दूषित घटक मिसळले जाण्याची भीती अधिक आहे. या वणव्यांमुळे हवाई बेटांचे निसर्गदृश्य बदलण्याचे आणि जमिनीचा पोत बदलण्याची शक्यता आहे.

वणव्यामध्ये कोणत्या सांस्कृतिक ठेव्याला धक्का बसला?

लहेनामध्ये एप्रिल १८७३ मध्ये भारतातून नेलेले वडाचे ८ फुटी रोपटे लावण्यात आले होते. नंतर हे झाड चांगलेच डवरले आणि त्याच्या पारंब्या जमिनीमध्ये रुजून झाडाचा घेर वाढत गेला. या झाडाची तब्बल ४६ खोडे असून त्याची उंची ६० फूट इतकी आहे. या झाडामुळे लहेना शहराला खास वैशिष्ट्य प्राप्त झाले असे म्हटले तर चूक ठरणार नाही. हे वडाचे झाड लहेनाचा दिमाखदार सांस्कृतिक ठेवा आहे. हे झाडही वणव्याच्या आगीत सापडले, मात्र जळाल्यानंतरही ते झाड उभे आहे. वडाचे झाड सहज नष्ट होत नाही, त्यामुळे ते पुन्हा बहरेल अशी या शहराची खात्री आहे. लहेना शहराच्या संकेतस्थळावर ‘झाडाची मुळे मजबूत असतील तर ते पुन्हा बहरते’, असे या झाडाचे वर्णन करण्यात आले आहे. या झाडाप्रमाणेच हे शहरही पुन्हा बहरावे अशीच तेथील लोकांची इच्छा असेल.