नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने शुक्रवारी एक निवेदन जारी करून १५ कंपन्यांना क्वालिफाइड स्टॉक ब्रोकर्स (QBs) च्या यादीत टाकले आहे. यामध्ये झेरोधा ब्रोकिंग, ५ पैसा कॅपिटल, एचडीएफसी सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आनंद राठी शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स, एंजल वन, आयआयएफएल सिक्युरिटीज, कोटक सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओस्वाल या कंपन्यांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये सेबीने दिलेल्या निर्देशानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. क्यूएसबीमध्ये या कंपन्यांना समाविष्ट केल्यानंतर त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढते. ती कशी? ते पाहुया

क्वालिफाइड स्टॉक ब्रोकर्स म्हणजे काय?

स्टॉक ब्रोकरच्या क्लाइंट्सची संख्या, त्यांच्या क्लाइंट्सची एकूण मालमत्ता (Asset), स्टॉक ब्रोकरचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि दिवसाखेर स्टॉक ब्रोकरच्या सर्व क्लाइंट्सचे मार्जिन ऑब्लिगेशन याचा विचार करून क्लालिफाइड स्टॉक ब्रोकर्सची यादी तयार केली जाते. क्यूएसबी असणाऱ्या स्टॉक ब्रोकरच्या क्लाइंट्सचा आकार आणि ट्रेडिंगमुळे सिक्युरिटीज मार्केटवर पडणारा परिणाम आणि प्रशासन व सेवा मानकांवर होणारा परिणाम लक्षात घेतला जातो.

suryakumar yadav
MI VS RCB: ‘सूर्या’चं असणं मुंबई इंडियन्ससाठी इतकं का महत्त्वाचं?
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

क्यूएसबी महत्त्वाचे का आहेत?

क्यूएसबीचा आकार, त्यांच्या ग्राहकांची संख्या आणि त्यांच्याकडून गुंतवणूक केली जाणारी रक्कम पाहता क्यूएसबींनी भारतीय सिक्युरिटीज मार्केट व्यापलेले आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटने आता या क्यूएसबींवर लक्ष केंद्रित केले आहे. जर हे स्टॉक ब्रोकर अपयशी ठरले तर गुंतवणूकदारांना प्रदान केलेल्या सेवेमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे सिक्युरिटीज मार्केटवरदेखील मोठा परिणाम होऊ शकतो.

क्यूएसबी कसे नियुक्त केले जातात?

स्टॉक ब्रोकरला क्यूएसबीमध्ये समाविष्ट करण्यासाठी चार निकष पाहिले जातात. सक्रिय ग्राहकांची संख्या, ग्राहकांची एकूण उपलब्ध मालमत्ता, ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि दिवसाच्या अखेर मार्जिनची जबाबदारी. या निकषांवर स्टॉक ब्रोकर्सची वर्गवारी केली जाते. यामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या ब्रोकरना क्यूएसबीच्या रुपात ओळख मिळते. नव्याने यादीत समाविष्ट केलेल्या ब्रोकर्सनी ही पात्रता निश्चित केल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्टॉक ब्रोकरच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊन सुधारित गुणतालिका तयार केली जाते. त्यानुसार सेबीच्या सल्ल्यानुसार क्यूएसबीची सुधारीत यादी जाहीर होते.

क्यूएसबीसाठी अतिरिक्त नियामक आवश्यक का?

ज्या स्टॉक ब्रोकर्सना आता क्यूएसबी म्हणून गणले गेले आहे, त्यांना यापुढे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे, योग्य प्रशासनाच्या रचनेची जबाबदारी सुनिश्चित करणे, जोखीम व्यवस्थापनाचे योग्य धोरण आणि प्रक्रिया, योग्य तांत्रिक क्षमता, वातावरण चांगले राखण्यासाठी फ्रेमवर्क आणि ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणेसह गुंतवणूकदारांना सेवा देणे बंधनकारक असणार आहे.

क्यूएसबीच्या जोखीम व्यवस्थापन धोरणानुसार ग्राहकांच्या (Client) व्यवहारांवर लक्ष ठेवून त्यांच्या ट्रेडिंग पद्धतीचे बारकाईने विश्लेषण करावे लागणार आहे. यामध्ये एखादी खटकणारी किंवा असामान्य बाब लक्षात येण्यासाठी जोखीम व्यवस्थापनाकडे उपाय असणे आवश्यक आहे. स्टॉक एक्स्चेंजमध्ये एखाद्या ग्राहकाकडून असामान्य वर्तन केले जात असेल तर क्यूएसबी त्याला लाल शेरा देऊन मार्केटमधील चुकीच्या प्रथांना रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करेल.

क्यूएसबी हे एक नियामक मंडळासारखीच रचना आहे. जी क्सूएसबीमुळे सिक्युरिटीज मार्केटवर प्रभाव टाकणाऱ्या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवते. डेटा सिक्युरिटीचे उल्लंघन आणि स्टॉक ब्रोकरच्या गुंतवणुकीचे सरंक्षण यावरही नजर ठेवली जाते.