Hindenburg Research Closed : अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी गुरुवारी (१६ डिसेंबर) एक निवेदन जाहीर करत यासंदर्भातील घोषणा केली आहे. वर्षभरापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चने अहवाल सादर करत भारतातील अदाणी समूहावर घोटाळ्याचे आरोप केले होते. यामुळे समूहाला अब्जावधींचा फटका बसला होता. दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चने अचानक कामकाज बंद करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

कंपनीचे संस्थापक काय म्हणाले?

हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, “आम्ही ज्या प्रकल्पांचं कामकाज हाती घेतलं होतं ते पूर्ण झाले आहेत. अलीकडेच पॉन्झी प्रकरणांवरील कामकाजही आम्ही पूर्ण केलं आहे. कंपनी बंद करण्याचा निर्णय आम्ही गेल्यावर्षीच घेतला होता. त्याबाबत कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांनाही कळवलं होतं.”

Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Important information from CM Devendra Fadnavis regarding Purandar Airport
पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची माहिती, म्हणाले…
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
Superstition Eradication Committee to launch courses for public education against superstition
अंधश्रद्धाविरोधी लोकशिक्षणासाठी अंनिस अभ्यासक्रम सुरू करणार
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
How To Use Roti Checker AI
AI For Roti : महिलांनो! आता एआय घेणार तुमच्या स्वयंपाकाची परीक्षा; पोळीला देणार गुण
Who does fact-checking
फॅक्ट चेकिंग नेमकं कोण करतं? फॅक्ट चेकर्स कसे काम करतात? जाणून घ्या सविस्तर….

हेही वाचा : Saif Ali Khan Attack : सैफ अली खानची दरोडेखोराबरोबर झटापट कशी झाली? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

हिंडेनबर्ग रिसर्चच्या कामकाजाबाबत माहिती देताना अँडरसन म्हणाले की, “आमच्या अहवालांमुळे जवळजवळ १०० व्यक्तींवर नियामकांनी दिवाणी किंवा फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अनेक अब्जाधीशांचा समावेश आहे. आमच्या कामामुळे अनेक साम्राज्यांच्या मनमानी कारभाराला दणका बसला. आम्हाला संस्थेच्या कार्याची आणि अलीकडील निर्णयांची नेहमीच आठवण येईल.”

हिंडेनबर्ग संशोधन म्हणजे काय?

२०१७ मध्ये अमेरिकेत हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीची स्थापना करण्यात आली होती. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटमध्ये दिलेल्या माहितीत असं म्हटलं आहे की, “आम्ही शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि अनियमितातंवर नजर ठेवतो, त्यांचं सत्य बाहेर आणणं आमचा उद्देश आहे.” कंपनीचा असा विश्वास आहे की, “सर्वात प्रभावी संशोधन हे कठीण माहितीच्या आधारे केलं जातं. सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या संशोधन केलं जातं. गुंतवणुकीचा निर्णय देण्यासाठी कंपनी विश्लेषणाचा आधार घेते. लेखा परीक्षणातील अनियमितता, महत्त्वाच्या पदांवर ‘अयोग्य’ व्यक्ती, अघोषित देवाणघेवाण व्यवहार, तसेच कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर कंपनी लक्ष केंद्रित करते.”

हिंडेनबर्गने अदाणी समूहावर काय आरोप केले होते?

जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहाबाबतच्या कंपन्यांवर शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचा अहवाल जाहीर केला होता. या अहवालानंतर अदाणी समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर विखारी टीका केली होती. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या ‘सेबी’ला या प्रकरणाची तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आदेश दिले.

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात असं म्हटलं होतं की, “अदाणी समूहाने दशकभरापासून ‘स्टॉक मॅनिपुलेशन’ आणि लेखा परीक्षणातील अनियमितता करून अनेकांची फसवणूक केली. अदाणी समूहातील काही कंपन्यांवर खूप मोठं कर्ज आहे. त्यामुळे संपूर्ण समूहावर आर्थिक संकटाचा धोका निर्माण झाला आहे.” हिंडेनबर्ग रिसर्चनेअहवालात असेही सांगितलं होतं की, अदाणी समूहाच्या काही प्रमुख सूचीबद्ध कंपन्यांमध्ये लेखा परीक्षणातील अनियमितता आणि “विविध पक्षांशी संबंधित लपवलेले व्यवहार होते.”

दरम्यान, अदाणी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर सिंग यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात चुकीची माहिती देण्यात आली असून समूहाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं जुगेशिंदर सिंग यांनी म्हटलं होतं. विशेष बाब म्हणजे डिसेंबर २०२४ मध्ये न्यूयॉर्कमधील अमेरिकी अभियोगकांनी २ हजार ०२९ कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात आरोप लावले होते. मात्र, अदाणी समूहाने हे आरोप फेटाळून लावले.

हिंडेनबर्ग रिसर्च बंद का होत आहे?

हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्यामागे कोणतेही ठोस कारण दिले नाही. ते म्हणाले की, “मी हिंडेनबर्ग रिसर्चकडे माझ्या जीवनाच्या एक अध्याय म्हणून पाहत होतो. समाधानकारक मार्ग शोधणे शक्य होईल की नाही हे मला सुरुवातीला माहिती नव्हते. हा सोपा पर्याय नव्हता. पण मी धोक्याचा मार्ग निवडला. चुंबकाप्रमाणे त्याकडे ओढले गेलो. मग आता बंद का करू नये? मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, माझे छंद जोपासण्यासाठी आणि प्रवास करण्यास उत्सुक आहे.”

फायनान्शियल टाईम्सने जून २०२१ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीची स्थापना अँडरसन यांनी केली होती, त्यांनी University of Connecticut मधून आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास केला होता. सुरुवातीला जेरुसलेममध्ये राहिल्यानंतर अँडरसन हे अमेरिकेत परत आले. त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणून काम केले होते. या कंपनीत एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ११ इतकी होती.

आणखी वाचा : Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? 

अँडरसन यांनी आपल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की, “पुढील ६ महिन्यांमध्ये मी आमच्या मॉडेलच्या प्रत्येक पैलूंवर आणि आमच्या तपास पद्धतीवर आधारित साहित्य आणि व्हिडिओ तयार करण्याचा विचार करत आहेत.”

हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे कोणकोणत्या कंपन्या अडचणीत?

असोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, हिंडेनबर्ग रिसर्चने Lordstown Motors या इलेक्ट्रिक ट्रक निर्माता कंपनीच्या मॉडेलसाठी जाहीर केलेल्या प्री-ऑर्डर्सच्या संख्येबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ज्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले. सध्या ही कंपनी अडचणीत असून त्यांनी ओहायोमधील एका मोठा ऑटो असेंबली प्लांट तैवानच्या Foxconn कंपनीला विकला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने २०२० मध्ये निकोला या इलेक्ट्रिक-वाहन कंपनीवर एक महत्वाचा अहवाल प्रकाशित केला होता.

या अहवालात निकोला कंपनीच्या संस्थापकांवर आणि त्याच्या उत्पादनांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. अहवालानुसार, निकोला कंपनीने टेस्ला कंपनीबरोबर स्पर्धा करण्यासाठी इतर कंपन्यांबरोबर भागीदारी केली आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे दावे केले. सुरुवातीला निकोला कंपनीकडून हिंडेनबर्गच्या आरोपांचे खंडण करण्यात आले. मात्र, २०२१ गुंतवणूकदारांना चुकीच्या माहिती दिल्याबद्दल त्यांनी आपली चूक कबूल केली. तसेच १२५ दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले.

Story img Loader