‘बॉयकॉट बॉलिवूड’ सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होणारा हॅशटॅग आहे. ज्या बॉलिवूडने एकेकाळी हाऊसफुलच्या पाट्या बघितल्या आहेत, त्याच बॉलिवूडला रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागत आहेत. एखाद्या स्टारचा चित्रपट प्रदर्शित झाला तर तिकिटांची आगाऊ विक्री व्हायची. मात्र आता असे होत नाही, यामागची नेमकी कारणं काय आहेत? बॉलिवूडला बॉयकॉट केले जात आहे का? जाणून घेऊयात सविस्तर..

नुकताच प्रदर्शित झालेला आमिर खानचा लाल सिंग चड्ढा लोकांनी बॉयकॉट केला. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली त्यामुळे चित्रपटाची कमाई जास्त झाली नाही. मात्र परदेशात चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे बोलले जात आहे. दीपिकाचा ‘गेहराइया’ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटात बोल्ड सीन्स आणि विवाहबाह्य संबंध अशा गोष्टी ठळकपणे दाखवण्यात आल्या होत्या. चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते तसेच बॉयकॉटचा हॅशटॅग तेव्हा देखील फिरत होता.

Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
nazi battle of normandy the great battle for normandy german defeat in normandy
भूगोलाचा इतिहास : ‘त्या’ भाकिताने बदलला जगाचा इतिहास
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?

थोडक्यात इतिहास :

गेल्या काही महिन्यांपासून ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा हॅशटॅग व्हायरल होताना दिसून येत आहे. त्यामागची पार्श्वभूमी आपण पहिली तर या हॅशटॅगची सुरवात दोन वर्षांपूर्वी झाली होती. २०२० वर्षाच्या सुरवातीलाच दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले अजय देवगणचा ‘तान्हाजी’ आणि दीपिकाचा ‘छपाक’. या दोन्ही चित्रपटांमध्ये कमाई केली ती तान्हाजी या चित्रपटाने, दीपिकाला प्रेक्षकांनी नाकारले कारण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने जेएनयू विद्यापीठात जाऊन तिकडच्या मोर्च्यात सहभागी घेतला. दीपिकाने तिकडच्या मोर्च्यात सहभाग दाखवल्याने तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेलं आणि याचा परिणाम चित्रपटावर झाला. खरं तर एक उत्तम विषय पडद्यावर आणायचे धाडस दिग्दर्शिकेने दाखवले होते मात्र चित्रपटाला अपयश आले. याचा फायदा झाला तो अजयच्या तान्हाजी चित्रपटाला, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले.

“हा चित्रपट केवळ…” रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर एस. एस. राजामौलींची पहिली प्रतिक्रिया

बॉयकॉट बॉलिवूड हॅशटॅगची सुरवात झाली दीपिकाच्या चित्रपटापासून आणि पूर्ण जगात टाळेबंदी लागली. त्याच दरम्यान ओटीटी प्लँटफॉर्म ही संकल्पना झपाट्याने वाढली. घरातच असल्याने लोकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगभरातील चित्रपट, मालिका, उत्तम कलाकृती पाहायला मिळाल्या. त्यातच सुशांत सिंहसारख्या अभिनेत्याच्या आत्महत्येने एकच वादळ उठले. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर ते अगदी बॉलिवूडच्या पार्ट्यांपर्यंत सगळी प्रकरण बाहेर येऊ लागली. ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी विभागाने श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांची चौकशी केली होती. त्यामुळे एकूणच बॉलिवूडबद्दलची लोकांची ओळख पूर्णपणे बदलली. सुशांत सिंग प्रकरण प्रचंड गाजले. या प्रकरणात करण जोहरपासून ते बॉलिवूडच्या घराण्यांवर प्रचंड टीका झाली होती. बॉयकॉट हॅशटॅग २०२० साली लोकप्रिय झाला त्याचे आणखीन एक कारण म्हणजे ‘बॉयकॉट चायनीज प्रॉडक्ट’ हा हॅशटॅग व्हायरल झाला होता. चिनी मालावर बहिष्कार घाला अशी मागणी तेव्हा सातत्याने होताना दिसून आली

स्टार किड्स :

बॉलिवूडचा घराणेशाहीचा इतिहास पहिला तर तसा तो जुना आहे. अगदी ऐंशीच्या दशकापासून संजय दत्त, सनी देओल ते आजची अनन्या पांडे, अभिनेत्यांची ही स्टार किड्स काम करत आहेत. सुशांत सिंहसारख्या कलाकाराच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड, स्टारकिड्स यांच्याविरोधात सोशल मीडियावर रान उठले होते. याच दरम्यान ‘सडक २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर, संजय दत्त असे स्टार असलेल्या चित्रपटाला प्रचंड ट्रोल केले गेलं. त्याच दरम्यान सुशांत सिंगबद्दल कोणत्या अभिनेत्री नेमकं काय म्हणाल्या आहेत याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

रोहित शेट्टीचा बरीच वर्ष रखडलेला ‘सूर्यवंशी’ मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेले चित्रपट मात्र प्रेक्षकांनी नाकारले. १९८३ च्या विश्वचषकावर आधारित ८३ हा चित्रपट बॉयकॉट करण्यात आला. संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाईला देखील ट्रोल करण्यात आले होते. नुकतेच प्रदर्शित झालेले शमशेरा, पृथ्वीराज चौहान हे चित्रपट साफ आपटले. अक्षय कुमारला देखील प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे कश्मीर फाइल्ससारखा चित्रपट यशस्वी ठरला.

पीके चित्रपट धार्मिक बाबींवर भाष्य करणारा होता. आमिर खान आणि दिग्दर्शक राजू हिरानी यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यातच २०१५ साली आमिर खानने देशातील असहिष्णुतेबद्दलचे मत व्यक्त केल्याने आमिरवर प्रचंड टीका झाली होती. सोशल मीडिया सक्रिय नसताना देखील २००६ साली आमिरच्या ‘फना’ चित्रपटाला गुजरातमध्ये बहिष्कार घालण्यात आला होता. नर्मदा धरण प्रकल्प विरोधी वक्तव्यामुळे गुजरातमध्ये बंदी घालण्यात आली होती. शाहरुखच्या माय नेम इज खानला विरोध झाला होता. कारण २०१० च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंना सहभागी करून घेतले नव्हते म्हणून शाहरुखने आयपीएलवर टीका केली होती. त्याच्या या धोरणावर प्रचंड टीका झाली होती आणि त्याच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी झाली होती.

कमल हासन यांच्यानंतर ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता साकारणार तब्बल २५ भूमिका

भारतातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूडचे चित्रपट सध्या बॉयकॉट केले जात आहेत. दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचा जोर वाढला आहे. प्रेक्षकांच्या देखील ते पसंतीस पडत आहेत.