महाराष्ट्र सरकारने गुरुवारी (१० नोव्हेंबर) छत्रपती शिवाजीमहाराज यांची इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये असलेली तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शिवाजीमहाराजांच्या या तलवारीचा इतिहास काय आहे? ही तलवार कशी आहे? ही तलवार इंग्लंडच्या राजाला कोणी आणि का दिली? आतापर्यंत ही तलवार परत आणण्यासाठी कोणी आणि काय प्रयत्न केले? या सर्व गोष्टींचा हा आढावा…

राज्य सरकारने काय म्हटलं?

सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, ऋषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिवाजीमहाराजांची जगदंबा तलवार २०२४ पूर्वी परत मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

शिवाजीमहाराजांच्या तलवारीचा इतिहास काय?

‘शोध भवानी तलवारीचा’ या पुस्तकाचे लेखक व इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यानुसार, शिवाजीमहाराजांच्या तलावीराचा मागोवा घेतला असता ती तलवार चौथे शिवाजी यांनी १८७५-७६ मध्ये तत्कालीन इंग्लंडचे राजपुत्र एडवर्ड यांना दिली होती. नंतर हेच एडवर्ड इंग्लंडचे राजा एडवर्ड सातवे म्हणून ओळखले गेले.

इंद्रजीत सावंत सांगतात, “शिवाजीमहाराजांनी वापरलेली ही तलवार करवीरच्या छत्रपतींकडे होती. तेथील शस्त्रागाराच्या नोंदीवरूनही हे स्पष्ट होते. या नोंदीत या तलवारीवर किती हिरे होते हेही नमूद करण्यात आलं आहे. एडवर्ड यांची मुंबईमध्ये भेट घेतल्यानंतर चौथे शिवाजी यांनी त्यांना ही तलवार भेट दिली होती.”

राजपुत्र एडवर्ड यांना शिवाजी महाराजांची तलवार का भेट दिली?

काही इतिहासकारांनुसार, चौथे शिवाजी यांनी राजपुत्र एडवर्ड यांना आनंदाने भेट दिली नव्हती, तर ब्रिटिशांनी जबरदस्तीने ती तलवार भेट म्हणून घेतली होती. त्यावेळी चौथे शिवाजी यांचं वय केवळ ११ वर्षे होतं. इतर भारतीय राजांप्रमाणेच त्यांनाही ब्रिटिशांना मौल्यवान भेट देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शस्त्रांचाही समावेश होता.

राजपुत्र एडवर्ड यांना शस्त्रास्त्र जमा करण्याची आवड होती. शिवाजीमहाराजांची तलवार भेट मिळाल्यानंतर एडवर्ड यांनीही चौथे शिवाजी यांना तलवारच भेट दिली. ही तलवार कोल्हापूर येथील संग्रहालयात आहे.

शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडमध्ये कोठे आहे?

शिवाजीमहाराजांची तलवार इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये आहे. रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या संग्रहात ही तलवार ठेवण्यात आली आहे. रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या वेबसाईटवर या तलवारीचा फोटोही पाहतो येतो. तेथे दिलेल्या माहितीनुसार, ही तलवार १२७.८ x ११.८ x ९.१ सेंटीमीटर आहे. तलवारीच्या पात्याची लांबी ९५ सेंटीमीटर आहे. म्हणजेच ही तलवार तीन फुटापेक्षा काहिशी अधिक लांब आहे.

आतापर्यंत तलवार परत आणण्यासाठी कोणी-कोणी प्रयत्न केले?

शिवाजीमहाराजांची ही तलवार इंग्लंडहून परत आणण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. यातला पहिला प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केली. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही ही तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले. नंतरच्या काळात मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी इंग्लंडमध्ये भारताचा खटला मजबुत व्हावा म्हणून कागदपत्रांचीही जुळवाजुळव केली. या तलवारीला भवानी तलवार म्हटलं जातं. मात्र, भवानी तलवार आधीपासून साताऱ्यात असल्याचा युक्तिवाद ब्रिटिश करत आहेत.

हेही वाचा : ‘आजचा’ अफझलखान…

भवानी आणि जगदंबा तलवारीत फरक काय?

छत्रपती शिवाजीमहाराजांकडे साताऱ्यात असलेल्या भवानी तलवारीसह एकूण तीन तलवारी होत्या. मात्र, साताऱ्यातील तलवार लंडनमध्ये असलेल्या तलवारीपेक्षा वेगळी आहे. करवीर संस्थानच्या नोंदणीप्रमाणे लंडनमधील तलवारीची नोंद जगदंब अशी आहे. तलवारीच्या नावांच्या वादामुळेच ब्रिटिशांकडे तलवारीची मागणी करताना तलवारीच्या नावाचा उल्लेख न करता केवळ १८७५-७६ मध्ये राजपुत्र एडवर्ड यांना दिलेली तलवार परत हवी आहे, अशी मागणी करावी, असं मत इतिहासकार सावंत व्यक्त करतात.