Aditya Raj Kaul Dhurandhar: आदित्य राज कौल हे प्रसिद्ध पत्रकार, विश्लेषक आणि लेखक आहेत. कौल हे राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि गुप्तचर विषयांवरील त्यांच्या पत्रकारितेसाठी (रिपोर्टिंगसाठी) ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे इंटेलिजन्स नेटवर्क्स, दहशतवादी कारवाया आणि संघर्षग्रस्त भागांवर रिपोर्टिंग केलं आहे. धुरंधर सारख्या प्रकल्पांमध्ये त्यांनी रिसर्च कन्सल्टंट (संशोधन सल्लागार) म्हणून काम केलं. त्यांच्या अनुभवामुळे चित्रपटांमध्ये वास्तवता (realism) आणि तपशील अधिक प्रभावीपणे दिसतो. कौल हे निव्वळ पटकथा लेखक नसून, त्यांच्या लेखनाला प्रदीर्घ अनुभवाची जोड आहे. त्यांनी गुप्तचर यंत्रणांवर अनेक वर्षे रिपोर्टिंग केल्यामुळे ते संबंधित घटनांची फक्त चर्चा करत नाहीत, तर ही यंत्रणा मुळात कशा पद्धतीने काम करते याचा प्रत्यक्ष अनुभव देतात. हीच खासियत धुरंधर मध्ये दिसते. आदित्य धर यांच्याबरोबर संशोधन सल्लागार म्हणून काम करताना, IC-814 विमान अपहरणासारख्या घटनांवरील त्यांच्या अनुभवाचा चित्रपटात प्रभावी वापर झाला आहे. त्यामुळे धुरंधर हा फक्त माहितीपट वाटत नाही.

सुधीर चौधरी

गेल्या दोन दशकांतील भारतीय बातम्या जर तुम्ही पाहिल्या असतील, तर तणावाच्या काळात सुधीर चौधरी यांची उपस्थिती तुम्हाला नक्कीच जाणवली असेल. कारगिल पासून २००८ मधील मुंबई हल्ल्यापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचे त्यांनी रिपोर्टिंग केले आहे. अशा अनुभवामुळे कथा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो मथळ्यांपुरतं विचार करणं थांबतं आणि त्या घटनांच्या परिणामांकडे पाहण्याची सवय लागते.

(फोटो : इन्स्टाग्राम)

हीच दृष्टी लवकरच येणाऱ्या The Terror Report मध्ये दिसून येते. विष्णु वर्धन यांच्या दिग्दर्शनाखाली आणि बालाजी टेलिफिल्म व Ellipsis Entertainment यांच्या पाठबळावर तयार होत असलेला हा चित्रपट दहशतवादाला केवळ एक घटना म्हणून न पाहता, राजकीय, भावनिक आणि मानवी चुका यांच्या साखळी प्रतिक्रियेसारखा मांडतो. म्हणूनच ही कथा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या गोंधळातून प्रत्यक्ष गेलेल्या व्यक्तीची वाटते आणि तो अनुभव पडद्यावर स्पष्टपणे जाणवतो.

Award Banner

शिव अरुर: Avrodh: The Siege Within

शिव अरुर हे भारतातील एक प्रसिद्ध पत्रकार, लेखक आणि संरक्षण विषयांचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी विशेषतः भारतीय सशस्त्र दल, राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी कारवायांवर अनेक वर्षे सखोल रिपोर्टिंग केलं आहे. ते India Today या वृत्तसंस्थेशी जोडलेले असून, डिफेन्स जर्नालिझममध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी India’s Most Fearless सारखी पुस्तके लिहून वास्तविक लष्करी मोहिमा आणि जवानांच्या शौर्यकथा प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांच्या कामामुळे सामान्य लोकांना सैन्याच्या कामकाजामागची वास्तवता समजून घेता येते.

हीच वास्तवता Avrodh: The Siege Within मध्ये जाणवते. हा शो अनावश्यक स्पष्टीकरण देत नाही, तर पडद्यावर दिसणाऱ्या तपशीलांमधूनच कथा सांगतो. यामागे अरूर यांच्या कामाचा मोठा वाटा आहे, विशेषतः India’s Most Fearless या पुस्तकात खऱ्या मोहिमांचे अतिशय स्पष्ट आणि प्रभावी वर्णन आहे. म्हणूनच हा अनुभव फक्त एखादी मोहीम पाहण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर ती प्रत्यक्षात कशी घडते हे समजून घेण्याची संधी देतो.

एस. हुसेन जैदी यांच्या ‘बम्बई मेरी जान’- S. Hussain Zaidi – Bambai Meri Jaan

रिसर्च कन्सल्टंट हा शब्द चित्रपटसृष्टीत प्रचलित होण्याच्या खूप आधीपासूनच जैदी यांच्या रिपोर्टिंगचा प्रभाव हिंदी चित्रपटसृष्टीवर पडत आला आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्डचा त्यांनी अनेक वर्षे जवळून अभ्यास केला. पोलिस फाइल्स, गँगमधील लोक आणि न्यायालयीन कागदपत्रे या सगळ्यांच्या आधारे त्यांनी आपलं काम उभं केलं. त्यांच्या पुस्तकांमुळे या गुन्हेगारी जगाचं संपूर्ण चित्र समोर आलं. म्हणूनच चित्रपट निर्माते वारंवार त्यांच्या लिखाणाचा आधार घेतात. Black Friday पासून Shootout at Wadala पर्यंत, त्यांच्या कथांनी अनेक चित्रपटांना दिशा दिली आहे. जैदी चित्रपटाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असोत किंवा नसोत, त्यांची छाप त्या कथांमध्ये नेहमीच जाणवते.

जिग्ना व्होरा’स्कूप’-Jigna Vora-Scoop

या यादीतील इतरांपेक्षा जिग्ना व्होरा यांची कथा वेगळी आहे. त्यांनी केवळ गुन्हेगारीवर रिपोर्टिंग केलं नाही, तर त्या स्वतःच देशाला हादरवून टाकणाऱ्या एका गुन्हेप्रकरणाचा भाग झाल्या. एक माजी क्राइम रिपोर्टर म्हणून, त्यांच्यावर पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आले होते. हे प्रकरण मुंबईतील सर्वात चर्चित मीडिया ट्रायल्सपैकी एक होत.

त्यांनी अनेक वर्षे या आरोपांविरुद्ध लढा दिला आणि शेवटी निर्दोष मुक्तता मिळवली. त्यानंतर त्यांनी आपला अनुभव Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकात मांडला. हेच पुस्तक Scoop साठी पाया ठरलं, या पुस्तकाची निर्मिती हंसल मेहता यांनी केली.

Scoop विशेष ठरतो तो त्याच्या दृष्टिकोनामुळे. ही बाहेरून सांगितलेली गुन्हेगारी कथा नाही; व्होरा यांच्या अनुभवामुळे ती व्यवस्थेच्या आतून सांगितलेली कथा ठरते. न्यूज रूममधील राजकारण, पोलिस ब्रिफिंग्स, मीडियाचा गोंधळ हे सगळं अस्वस्थ वास्तव वाटतं, कारण ते प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं आहे.