-गौरव मुठे  

जागतिक पातळीवरील एफटीएक्स हे क्रिप्टो एक्स्चेंज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पण नेमके असे काय घडले आणि त्याचा या क्रिप्टोकरन्सी अर्थात कूटचलन बाजारमंचावर नेमका काय परिणाम झाला, ते जाणून घेऊया. 

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Cyber Fraud Mumbai crime Cases
जैसे ज्याचे कर्म तैसे! कंपनीला गंडा घालून मिळवलेले १ कोटी रुपये ‘फ्रॉड स्कीम’मध्ये गमावले

प्रतिस्पर्धी एक्स्चेंज बायनान्सशी असलेल्या कडव्या स्पर्धेचा फटका एफटीएक्सला बसला किंवा आणखी कोणतेही कारण असो, आधीच दीर्घ मंदीच्या गर्तेत असलेल्या कूटचलन आणि तिच्या भवितव्यासंबंधी गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वास यातून नक्कीच डळमळीत झाला आहे.

एफटीएक्स काय आहे?

एफटीएक्स हे बहामा येथील क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज आहे. सॅम बँकमन-फ्राईड (एसबीएफ) यांनी २०१९मध्ये त्याची स्थापना केली. त्यानंतर जगभर वेगाने प्रचार-प्रसार करून त्यांनी मोठी भांडवल उभारणीदेखील केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्याचे २५ अब्ज डॉलरचे मूल्यांकन होते. त्यानंतर सिंगापूरस्थित टेमासेक आणि अमेरिकी कंपनी टायगर ग्लोबलकडून निधी उभारणी केली. जानेवारी २०२२ मध्ये, जपानच्या सॉफ्टबँककडून निधी उभारणी केल्यावर त्याचे एकत्रित मूल्यांकन ३२ अब्ज डॉलरपर्यंत वाढले.

मग असे असूनही एफटीएक्स एक्स्चेंज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर कसे पोहोचले?

जगात कायम पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले एफटीएक्स क्रिप्टो एक्स्चेंज सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. यामागे आर्थिक गैरव्यवहारांची मालिका असून, भारतीय वंशाचे निषाद सिंग त्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर एफटीएक्सने अधिकृतरित्या दिवाळखोरीसाठी अर्ज केला. यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ८,०५४ कोटी रुपये एक्स्चेंजमधून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. एक्स्चेंजचे संस्थापक असलेले सॅम बँकमन यांनी कोणाचीही परवानगी न घेता ही रक्कम त्यांची दुसरी कंपनी असलेल्या अल्मेडा रिसर्चकडे वळती केल्याचा आरोप होत आहे. यामध्ये कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे बोलले जात आहे.

एफटीएक्स एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम बँकमन-फ्राईड यांच्या नऊ विशेष सहकाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या सिंग यांनी देखील यासाठी मदत केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

बायनान्सकडून करार रद्द का?

सॅम बँकमन-फ्राइड हे आभासी चलन अर्थात क्रिप्टो करन्सी उद्योगातील व्यक्तिमत्त्व सध्या सर्वाधिक चर्चेत होते. ते आभासी चलन उद्योगातील मोठे एक्स्चेंज असलेल्या एफटीएक्सचे संस्थापक आहेत. चालू वर्षाच्या सुरुवातीला आभासी चलनांच्या किमती कमी होत असताना व्हॉएजर आणि ब्लॉकफाय या कंपन्यांना त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. त्यांनी क्रिप्टो हेज फंड थ्री एरोजची मालमत्ता खरेदी केली. त्यावेळी बँकमन-फ्राइडची मालमत्ता दोन लाख कोटी रुपयांहून अधिक होती. त्यांनी क्रिप्टोचे नियमन आणि विस्तार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र एफटीएक्समध्ये निधी नसल्याच्या अफवा पसरल्यानंतर गेल्या सप्ताहात ७ नोव्हेंबरला गुंतवणूकदारांनी एक्स्चेंजमधून सुमारे सात ते आठ हजार कोटी रुपये काढून घेतले. यानंतर एक्स्चेंजने गुंतवणूकदारांचे पैसे देणे बंद केले. परिणामी एफटीएक्सच्या टोकनचे मूल्य ४ नोव्हेंबरपासून सुमारे ९० टक्क्यांहून कमी झाले आहे. ८ नोव्हेंबरला बायनान्स या सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंजचे प्रमुख चांगपेंग झाओ यांनी एफटीएक्स खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली होती. मात्र बायनान्स यांनी दुसऱ्या दिवशी निर्णय बदलत करार न करण्याची घोषणा केली.

क्रिप्टोकरन्सी बाजारावर काय परिणाम?

एफटीएक्समध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर आभासी चलन बाजारात मोठ्या प्रमाणावर त्याचे पडसाद उमटले. ८ नोव्हेंबरपर्यंत बिटकॉइनचे मूल्य सुमारे १९ टक्क्यांपर्यंत खाली आले. एक बिटकॉइनचे मूल्य सुमारे १६,६०० डॉलरवर पोहोचले आहे. एफटीएक्समधील गैरव्यवहाराचा आभासी चलन बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एफटीएक्स हे एक्स्चेंज बायनान्सकडून अधिग्रहित केल्या जाण्याचा घोषणेनंतर आभासी चलन बाजार सावरला होता. त्याबरोबर एफटीएक्सचा कॉइन असलेला एफटीटीदेखील सावरला. मात्र बायनान्सने पुन्हा अधिग्रहण करण्याचा निर्णय रद्द केल्याने एफटीटीसहित इतर आभासी चालनांची पडझड झाली. बिटकॉइनसह इथेरिअम आणि इतर आभासी चलनांचे मूल्य घसरल्याने एकंदरच कूटचलन बाजारात भीती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात ९ नोव्हेंबरला अमेरिकेची बाजार नियंत्रक असलेल्या – सिक्युरिटीज एक्स्चेंज कमिशन आणि न्याय विभागानेदेखील एफटीएक्सची चौकशी सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे.

एफटीएक्सला बायनान्ससोबत स्पर्धेचा कसा फटका बसला?

एफटीएक्सने मोठ्या प्रमाणावर विस्तार योजना आखली होती. त्यानुसार त्यांनी जगभरामध्ये विविध कंपन्यांशी करार देखील केले. प्रचारासाठी त्यांनी अनेक खेळाच्या स्पर्धांमध्ये जाहिराती आणि प्रायोजकत्व दिले. यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्येदेखील त्यांनी जाहिरातबाजी केली. शिवाय प्रतिस्पर्धी असलेल्या बायनान्सला खाली खेचण्यासाठी त्यांनी काही खेळी खेळल्या. बायनान्सचा एफटीएक्समध्ये असलेला हिस्सा ‘बायबॅक’ करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. शिवाय तो खरेदी करताना एफटीएक्सची करन्सी असलेल्या एफटीटीमध्ये हा निधी देण्याचे ठरविण्यात आले. सुमारे १.३ अब्ज एफटीटीमध्ये हा व्यवहार पार पडला. मात्र त्यानंतर बायनान्सने तरलतेची गरज असल्याचे सांगत एफटीटीची विक्री केल्याने त्याचे मूल्य मोठ्या प्रमाणावर गडगडले. लुप्त झालेल्या १० अब्ज डॉलरपैकी केवळ एक अब्ज डॉलर तरल रुपात एफटीएक्सकडून जेमतेम उभे राहू शकतील, असेही वृत्त आहे.

एफटीएक्समध्ये काम करणारे निषाद सिंग कोण आहेत?

सिंग यांचा बँकमन-फ्राइड यांच्या नऊ विशेष सहकाऱ्यांमध्ये समावेश होता. ते क्रिप्टोसंबंधित महत्त्वाच्या विषयांवर मुख्याधिकाऱ्यांना मदत करायचे. एफटीएक्स एक्स्चेंजमध्ये कामाला सुरुवात करण्याआधी ते फेसबुकमध्ये कार्यरत होते. फेसबुकमध्ये त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून सुमारे पाच महिने काम केले. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये एफटीएक्सची कंपनी असलेल्या अल्मेडा रिसर्चमध्ये ते रुजू झाले. अल्मेडा रिसर्चमध्ये ते १७ महिने अभियांत्रिकीचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज एफटीएक्समध्ये कामाला सुरुवात केली.