scorecardresearch

Premium

जगप्रसिद्ध आर्ची या कॉमिक्स पात्राने दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात अमेरिकेतील नैतिक समाजाची पायाभरणी कशी केली?

त्या काळातील कॉमिक्सचे जग हिंसा आणि लैंगिक विषयाला प्राधान्य देत होते, त्या पार्श्वभूमीवर आर्ची हे कॉमिक्स हा एक चांगला पर्याय ठरला. आर्ची या कॉमिक्स मध्ये “अमेरिकन मूल्ये” ..

Archies: Indian teen musical comedy film
आर्चीज: भारतीय संगीत-कॉमेडी चित्रपट (Twitter/@ArchieComics)

झोया अख्तरचा बहुप्रतिक्षित ‘द आर्चीज’ हा सिनेमा सदाबहार ‘आर्ची’ या कॉमिक्सचे भारतीय चित्रपटातील रूपांतर असून, काल (७ डिसेंबर) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. १९४० च्या दशकापासून ते आजपर्यंत आर्ची हे कॉमिक्स कॅरेक्टर विशेष लोकप्रिय आहे. १९४१ च्या डिसेंबर महिन्यात आर्ची प्रथम मासिकात झळकला. आजही ८० वर्षांनंतर कॉमिक्सच्या जगातील एक चांगला पर्याय म्हणून आर्ची या पात्राकडे पाहिले जाते.

आर्चीचा जन्म

१९४० साला पासून ते १९६० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत विनोदी किशोरवयीन नायक हे कॉमिक्स मधील प्रमुख पात्र होते. आज कॉमिक्स जगतात सुपर हिरोंचे वर्चस्व पुन्हा वाढले आहे, त्यामुळेच कधी काळी प्रमुख भूमिकेत असलेल्या या किशोरवयीन नायकांचे अस्तित्त्व या जगातून धूसर झाल्याचे दिसते. आर्ची ही MLJ मॅगझिन्सचे सह-संस्थापक जॉन गोल्डवॉटर यांची निर्मिती होती, त्यांना कंपनीसाठी सुपर हिरोपेक्षा अधिक काहीतरी हवे होते, हा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. या कालखंडात सुपरहिरो हे अमेरिकन राष्ट्रवादाचे प्रतीक ठरले होते. कॅप्टन अमेरिका आणि त्याच्या नाझी नेमेसिस रेड स्कलचे यासाठी चपखल उदाहरण ठरते. असे असले तरी गोल्डवॉटर यांनी वास्तववादी जीवनावर लक्ष केंद्रित केले, आपला मुख्य उद्देश किशोरवयीन मुलांना आकर्षित करणे हाच आहे हे त्यांच्या मनाशी पक्के होते. त्यामुळेच त्यांच्या कॉमिक्स मधील आर्ची अँड्र्यूज, हा अमेरिकन किशोरवयीन नायक होता. आर्ची आणि त्याचे मित्र, मैत्रीण – शेजारची बेट्टी कूपर, पॉश गर्ल वेरोनिका लॉज, जुगहेड जोन्स आणि बरेच काही, हे रिव्हरडेल या काल्पनिक शहरात सेट केलेल्या (पांढऱ्या) अमेरिकन किशोरवयीन जीवनाचे एक आदर्श प्रतिनिधित्व करत होते.

America marathi news
विश्लेषण : अमेरिका ख्रिश्चन आहे की धर्मनिरपेक्ष? ट्रम्प समर्थकांना काय वाटते? वास्तव काय?
sensex jumps over 500 points nifty close at 22217
Stock Market Today: ‘निफ्टी’ नवीन उच्चांकावर स्वार; ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी मजल
Russian military use of Starlink in war
रशियन सैन्याकडून युद्धात स्टारलिंकचा वापर? युक्रेनचा गंभीर आरोप, एलॉन मस्कची भूमिका काय? वाचा सविस्तर…
alexei navalny marathi news, alexei navalny death marathi news, russian opposition leader alexei navalny marathi news
अकस्मात मृत्यू की राजकीय हत्या? पुतिनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना संपवण्याचे कारण काय? जगभर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य काय?

अधिक वाचा : भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची नावे कशी ठरतात? 

आर्चीची लोकप्रियता

१९४२ पर्यंत, पात्रांच्या वाढत्या लोकप्रियतेच्या दरम्यान, आर्चीला स्वतःचे शीर्षक मिळाले (तोपर्यंत आर्चीच्या कथा पेप मध्ये येत राहिल्या), आणि दोन वर्षांत, MLJ मॅगझिनने आर्चीच्या विश्वाचा विस्तार करण्याच्या बाजूने सुपरहिरोच्या कथा बाजूला सारण्यास सुरुवात केली. १९४६ पर्यंत, MLJ ने त्यांचे नाव बदलून आर्ची कॉमिक्स पब्लिकेशन्स (ACP) असे ठेवले, इतकेच नाही तर १९४९ मध्ये आर्चीच्या पाल जुगहेडसह अनेक स्पिन-ऑफ शीर्षके उदयास आली, आणि लोकप्रियही झाली. आर्चीने कथेच्या माध्यमातून अमेरिकेतील लहान शहराचे चित्रण उभे केले. या यशाचे श्रेय आर्चीचा जन्मदाता, बॉब मॉन्टाना यांच्याकडे जाते, असे लॅविन नमूद करतो. गोल्डवॉटरने आर्चीच्या मागची कल्पना मांडली तर व्यंगचित्रकार बॉब मॉन्टाना आणि नंतर डॅन डीकार्लो यांनी शेवटी कॉमिक विश्वाचे स्वरूप निश्चित केले. चार्ल्स फिलिप्सने आर्ची: हिज फर्स्ट ५० इयर्स (१९९१) मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, “मॉन्टानाने किशोरवयीन जीवनाचे एक आदर्श चित्र तयार करण्यासाठी एक भावनिक विश्व उभे केले, जे आपल्यापैकी कोणीही जगलेले नव्हते.

अधिक वाचा: टायगर ३: बॉलिवूडमधील पाकिस्तानचे चित्रण आणि नवा बदल, पण असे का?

आर्चीने नैतिकता कशी जपली

त्या काळातील कॉमिक्सचे जग हिंसा आणि लैंगिक विषयाला प्राधान्य देत होते, त्या पार्श्वभूमीवर आर्ची हे कॉमिक्स हा एक चांगला पर्याय ठरला. आर्ची या कॉमिक्स मध्ये “अमेरिकन मूल्ये” आणि “नैतिकता” दृढपणे दर्शवलेली होती. “तो मुळात एक चौकोन आहे, परंतु माझ्या मते हा चौकोन अमेरिकेचा कणा आहे,” असे गोल्डवॉटरने १९७३ मध्ये द न्यूयॉर्क टाईम्सला आर्चीच्या पात्राबद्दल मत व्यक्त करताना सांगितले. “जर आमच्याकडे चौकोन नसतील तर आमच्याकडे मजबूत कुटुंबे नसतील,” असेही ते म्हणाले. पारंपारिक आणि जुन्या पद्धतीच्या व्यक्तीसाठी स्क्वेअर हा अमेरिकेत वापरला जाणारा शब्द आहे. खरं तर, १९५४ मध्ये, कॉमिक पुस्तकांच्याबद्दल अमेरिकेतील समाजात नैतिक घबराहट असताना जॉन गोल्डवॉटरने कॉमिक्स मॅगझिन असोसिएशन ऑफ अमेरिका स्थापन केली, या संस्थेच्या कॉमिक्स कोड ऑथॉरिटीने मासिकांना ‘आक्षेपार्ह’ गोष्टी काढून टाकण्यास प्रवृत्त केले. गोल्डवॉटर हे २५ वर्षे या संस्थेचे प्रमुख होते. १९७३ मध्ये, गोल्डफिंगरने आर्चीचा परवाना स्पायर ख्रिश्चन कॉमिक्सला दिला, ज्यांनी इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चन मेसेजिंगसह कथा प्रकाशित करण्यास सुरुवात केली. गोल्डवॉटर हे स्वतः ज्यू असले तरी त्यांनी NYT ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, स्पायरने आर्ची कॉमिक्समध्ये व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या निरोगी कौटुंबिक संदेशाशी सुसंगत होत्या. पुढे स्पायर १९ वर्षे आर्ची प्रकाशित करत होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How did the world famous comic book character archie lay the foundation for moral society in america during world war ii svs

First published on: 08-12-2023 at 14:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×