तरुणांमध्ये अमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्याच्या तस्करीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. परंतु, आता चक्क पिझ्झामध्ये कोकेन टाकून त्याची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. जर्मनीतील पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन पिझ्झाची विक्री केली जात होती, ज्यावर कारवाई करण्यात आली आहे. डसेलडॉर्फमधील जर्मन पिझ्झेरियामधील कोकेन पिझ्झा तरुणांमध्ये लोकप्रिय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटमध्ये मिळणार्‍या कोकेन पिझ्झाला मेन्यू कार्डवर ‘पिझ्झा क्रमांक ४०’ असे नाव देण्यात आले होते. अनेक महिन्यांच्या तपासानंतर, अधिकारी संघटित गुन्हेगारी गटावर कारवाई करू शकले. डीपीए या वृत्तसंस्थेनुसार, उच्चभ्रू घटकांसह सुमारे १५० पोलिसांनी गेल्या आठवड्यात नऊ शहरांमध्ये १६ ठिकाणी छापे टाकले; ज्यात तीन संशयितांना अटक केली आणि शस्त्रसाठा जप्त केला. नेमके हे प्रकरण काय? लोकांमध्ये कोकेन पिझ्झाची क्रेझ का वाढली होती? पोलिसांनी ही कारवाई कशी केली? त्याविषयी जाणून घेऊ.

कोकेन पिझ्झावर पोलिसांची कारवाई

क्रिमिनल डायरेक्टर मायकेल ग्राफ वॉन मोल्टकेस यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार, नियमित अन्न तपासणीत स्वयंपाकघरात अमली पदार्थ आढळून आले होते, त्यानंतर पोलिस मार्चपासून पिझ्झरियाची चौकशी करत आहेत. जेव्हा अमली पदार्थ तपासनीसांनी या व्यवसायांवर पाळत ठेवली तेव्हा त्यांना आढळले की, ‘पिझ्झा क्रमांक ४०’ ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. “हे सर्वात जास्त विकल्या गेलेल्या पिझ्झांपैकी एक होते,” असे वॉन मोल्टकेस म्हणाले. मेन्यूमध्ये दिलेल्या या पिझ्झाची किंमत किती आणि त्यात कोणकोणत्या टॉपिंग असतील, याचा उल्लेख मेन्यूमध्ये नव्हता, जे आम्हाला संशयात टाकणारे होते, असेही ते म्हणाले.

जर्मनीतील पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन पिझ्झाची विक्री केली जात होती, ज्यावर कारवाई करण्यात आली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : पुण्यात तयार होतंय क्लाऊड चेंबर, हे कशासाठी असतं?

“आम्हाला आश्चर्य वाटले, कारण मालकावर कधीही ड्रग गुन्ह्यांचा आरोप नव्हता,” असेही त्यांनी सांगितले. ३६ वर्षीय रेस्टॉरंट मालक जो क्रोएशियन याची चौकशी करण्यासाठी पोलिस आले, तेव्हा त्याने खिडकीतून कोकेनने भरलेली बॅग बाहेर फेकली. ही बॅग अधिकार्‍यांच्या हाती लागली, ज्यात २६८,००० युरो रोख, ४०० ग्राम गांजा, १.६ किलोग्राम कोकेन, लक्झरी घड्याळे, त्यासह एक बंदूक, कुर्‍हाड आणि चाकू जप्त केले.

अमली पदार्थांच्या नेटवर्कवर छापे

दोन दिवसांनंतर अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट मालकाला सोडले, कारण त्याचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नव्हता. रेस्टॉरंटच्या मालकाने त्याचे रेस्टॉरंट पुन्हा उघडले आणि कोकेन व पिझ्झाची विक्री पुन्हा सुरू केली. त्याच्या आठवड्याभरानंतर, पिझ्झेरियाला अमली पदार्थ पुरवणार्‍या पश्चिम जर्मनीमधील ड्रग नेटवर्कचा पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन गांजाच्या बागांवर सुमारे दीडशे अधिकाऱ्यांनी छापे टाकले. डसेलडॉर्फच्या पश्चिमेला असलेल्या मोंचेनग्लॅडबॅचमध्ये ३०० झाडे जप्त करण्यात आली होती आणि शहराच्या पूर्वेकडील सोलिंगेन येथे ६० झाडे जप्त करण्यात आली. बारा संशयितांची निवासस्थाने आणि व्यवसायाच्या ठिकाणांचीही झडती घेण्यात आली. छाप्यांदरम्यान पोलिसांना महागडी घड्याळे, रोख रक्कम आणि बंदूक सापडली.

(छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या टोळीला अटक

फॉन मोल्टके यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासादरम्यान एका २२ वर्षीय संशयिताला अटक केली. संशयित तरुण मार्शल आर्ट्स फायटर असून त्याचा जन्म रशियामध्ये झाला आहे. त्याच्यावर ड्रग कायद्यांचे उल्लंघन करून कोकेन आणि मोठ्या प्रमाणात गांजाचा व्यापार करत असल्याचे आरोप आहेत. त्याच्यावर प्रतिस्पर्ध्याच्या व्यापाऱ्यांना वारंवार लुटल्याचा आणि मारहाण केल्याचा संशय आहे. आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे; ज्यात मोरोक्कन जो डसेलडॉर्फच्या जवळ असलेल्या हानमधील २८ वर्षीय तरुण आणि एका ३० वर्षीय जर्मन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आणखी बारा जणांचा संशयित यादीत समावेश आहे. ऑगस्टमध्ये देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा अटक झाल्यानंतर पिझ्झा मालक अजूनही कोठडीत आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तात असे नमूद करण्यात आले आहे की, या गटाने कथितपणे ३०० पेक्षा जास्त वनस्पती असलेल्या मोंचेनग्लॅडबॅकमधील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये स्वतःचा गांजा वाढवला आणि इतर डीलर्सना विकण्यासाठी “किलो” गांजा आणि कोकेन खरेदी केले.

हेही वाचा : ‘McDonald’ बर्गर खाल्ल्याने ४९ जणांना ई-कोलायचा संसर्ग; कारण काय? हा जीवाणू किती घातक?

सॉफ्ट ड्रिंक कॅनमध्येही कोकेन

सॉफ्ट ड्रिंक कॅनमध्ये कोकेन लपवल्याच्या आरोपावरून बर्लिन पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका २४ वर्षीय ड्रायव्हरला अटक केली होती. Wühlischstrasse (Friedrichshain-Kreuzberg) येथे संभाव्य ड्रग डीलचे निरीक्षण करत असताना मंगळवारी रात्री गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहिले. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाइल फोन, ६२० युरो रोख असलेले सिगारेटचे पॅकेज आणि २० अतिरिक्त एक्स्टसी गोळ्यादेखील जप्त केल्या.

Story img Loader