Premium

विश्लेषण : वेबसीरीज, चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन कसे शूट केले जातात?

ऑनस्क्रीन दिसणारे हे इंटिमेट सीन्स खरच केले जातात का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

विश्लेषण : वेबसीरीज, चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन कसे शूट केले जातात?

करोना काळानंतर भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, झी फाईव्ह, अल्ट बालाजी, कुकू अॅप यासारखे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय ठरत आहेत. या बहुतांश ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात सर्रास इंटिमेट सीन, सेक्स सीन किंवा न्यूड सीनचा समावेश केला जातो. एखाद्या चित्रपटात प्रसंगानुसार तर काही चित्रपटात कथानकाची गरज म्हणून इंटिमेट सीन दाखवले जातात.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

काही आठवड्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला कोबाल्ट ब्लू (cobalt blue) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट समलैंगिक संबंधावर आधारित आहे. कोबाल्ट ब्लू हा चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि नाटककार सचिन कुंडलकर यांच्या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कांदबरीवर निर्मित आहे. या चित्रपटात अनेक इंटिमेट सीन पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पण ऑनस्क्रीन दिसणारे हे इंटिमेट सीन्स खरच केले जातात का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. हे सीन कसे शूट केले जातात? त्यावेळी कलाकारांची मनस्थिती काय असेल? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. याची उत्सुकता आणि कुतूहल नक्कीच सगळ्यांना असते. त्यामुळे आज आपण याच ऑनस्क्रीन इंटिमेट सीनच्या पडद्यामागची गोष्ट जाणून घेणार आहोत.

“मी नाही म्हणायला हवे होते पण…”, माधुरी दीक्षितने केले विनोद खन्नांसोबतच्या किसिंग सीनवर भाष्य

चित्रपटातील इंटिमेट सीन दाखवण्याच्या पद्धतीत बदल

फार वर्षांपूर्वी एखाद्या चित्रपटात बोल्ड किंवा इंटिमेट सीन दाखवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत नसे. एखाद्या अंधार असलेल्या खोलीत फुलावर किंवा झुंबरावर कॅमेराचा फोकस केला जायचा किंवा दोन फुलं एकमेकांजवळ आल्याचे दाखवले जायचे. त्यामुळे प्रेक्षकांना हा इंटिमेट सीन होता, हे स्पष्ट व्हायचे. पण आता २१ व्या शतकात सर्वच गोष्टी वेगाने बदलत जात आहे. त्यामुळे चित्रपटातील इंटिमेट सीन दाखवण्याची पद्धतही बदलली आहे.

आता एखादा इंटिमेट सीन किंवा बोल्ड सीन शूट करणे फार अवघड आणि आव्हानात्मक झाले आहे. हे सीन अधिक आकर्षक, वास्तववादी आणि सुंदर व्हावेत यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. एखादा इंटिमेट सीन पाहताना प्रेक्षकांना तो अगदी खरा वाटावा, यासाठी प्रोडक्शन विभागातील अनेक तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, कॉस्च्युम डिझायनर हे जीवापाड मेहनत घेत असतात. पण या सीनमधील महत्त्वाचे योगदान हे पडद्यावरील कलाकारांनाच दिले जाते. कारण हे बोल्ड सीन करतेवेळी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

किसिंग सीनचे चित्रिकरण कसे केले जाते?

सध्या अनेक अभिनेत्री मोठ्या पडद्यावर किसिंग सीन द्यायला हरकत घेत नाही. पण काही कलाकार बोल्ड सीन करणे, किस करणे याला विरोध करतात. अशावेळी त्यांची मनधरणी केली जाते. या मनधरणीनंतर काही अभिनेत्री तयार होतात. तर काही मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम राहतात. मग अशावेळी काळ्या किंवा निळ्या रंगाच्या क्रोमाचा वापर करत हा किसिंग सीन शूट केला जातो.

‘आलियाला चित्रीकरण करताना किस करणं…’, सिद्धार्थ मल्होत्राचा धक्कादायक खुलासा

यावेळी त्या कलाकारांच्यामध्ये दुधी किंवा एखादी हिरवी भाजी ठेवली जाते. ते कलाकार दुधीला किस करतात आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते दोघे एकमेकांना किस करत आहेत, असे भासवले जाते. याच प्रकारे कधीकधी फक्त इंटिमेट सीन करत असायचा भासदेखील निर्माण केला जातो. त्या कलाकारांना एका विशिष्ट अँगलला उभं केले जाते. त्यामुळे प्रेक्षकांना हे कलाकार इंटिमेट सीन करत असल्याचा भास होतो.

इंटिमेट दिग्दर्शकाची महत्त्वाची भूमिका

या संपूर्ण सीनदरम्यान इंटिमेट दिग्दर्शक हा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. एखादा बोल्ड सीन कोरिओग्राफ करणं हे त्याचं मुख्य काम असतं. हे कोरिओग्राफर एखादा इंटिमेट सीन अगदी स्टंट सीन किंवा डान्स सीन असल्यासारखा चित्रित करतात. काही इंटिमेट दिग्दर्शक हे शूटींगपूर्वी त्यांच्या पार्टनरसोबत ते सीन करुन दाखवतात. त्यानंतर संबंधित अभिनेता आणि अभिनेत्रीला ते सीन शिकवले जातात. या सर्व गोष्टींमुळे कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्रीला असुरक्षित वाटत नाही. त्याशिवाय त्यांना सहजरित्या चित्रपटातील इतर सीनप्रमाणे हा सीन करता येतो.

ब्यूटी शॉट्स आणि बॉडी डबलचा उपयोग

सध्या अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री अनेकदा पडद्यावर फार बिनधास्तपणे बोल्ड सीन देतात. पण काही कलाकारांना अद्याप हे सीन करताना फार अडचण येते. अशावेळी या कलाकारांसाठी ब्युटी शॉट्स उपयोगी ठरतात. हे तांत्रिकदृष्ट्या वापरली जाणारी पद्धत आहे. यामुळे फोटोग्राफीच्या तंत्रांचा उपयोग फार चलाखपद्धतीने करावा लागतो. ज्यामुळे तिथे काहीही न घडताही खूप काही घडले असे प्रेक्षकांना भासवले जाते.

“अनेक पुरुषांना नीट किस करता येत नाही कारण…”, ‘बिग बॉस’मधील अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत

त्यासोबतच जेव्हा कलाकार एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्यात अशी एखादी वस्तू ठेवली जाते ज्यामुळे त्यांच्या शरीराचा एकमेकांना स्पर्श होत नाही. कधीकधी या कलाकारांमध्ये हवा भरलेली उशी ठेवली जाते. तर अभिनेत्रीसाठी पुशअप्स पॅड्सचा वापर केला जातो. अनेक इंटिमेट सीन्समध्ये अभिनेत्रींची पाठ पूर्णपणे उघडी दाखवण्यात येते, त्यावेळी त्या अभिनेत्री सिलिकॉन पॅड्सचा वापर करतात.

जेव्हा एखाद्या सीनसाठी कलाकार न्यूड होतो, त्यावेळी कॉश्च्युम विभागातील एक व्यक्ती त्याच्यासाठी बाथरोब आणि स्लीपर घेऊन उभी असते. इंटिमेट सीन शूट झाल्यानंतर संबंधित कलाकाराला बाथरोब दिले जाते. तसेच एखाद्या इंटिमेट सीनचे दीर्घकाळ शूटींग केले जाणार असते त्यावेळी कलाकार बॉडी डबल किंवा डमी व्यक्तीचा वापर करतात.

वरुणला किसिंग सीनसाठी किती गुण देशील?, आलिया म्हणते…

कलाकारांची परवानगी महत्त्वाची

एखादा इंटिमेट सीन शूट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे परवानगी. कोणत्याही बोल्ड दृश्यासाठी कलाकारांची परवानगी फार आवश्यक असते. या इंटिमेन सीनसाठी कलाकारांना एक करार करावा लागतो. या करारात सर्व गोष्टीत स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. तसेच तुम्ही या सीनसाठी तयार आहात की नाही हे देखील यात लिहिले असते. तर काहीवेळा अशाप्रकारे दृश्याचे शूटींग केले जाणार आहे, याची चर्चा करतानाचा व्हिडीओही पुरावा म्हणून शूट केला जातो. विशेष म्हणजे हे सीन शूट करताना तिथे कमीत कमी लोक उपस्थित असतात.

अनेक कलाकार हे बऱ्याच लोकांमध्ये इंटिमेट सीन करण्यास तयारी दर्शवत नाही. त्यामुळे तेथे फक्त संचालक, डीओपी आणि अत्यंत महत्वाचे क्रू मेंबर उपस्थित असतात. कधीकधी तर दिग्दर्शक देखील बोल्ड सीन करताना बाहेर जातात. ते शूटनंतर व्हिडीओ पाहतात आणि मग बदल करतात. त्यामुळे आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या काही मिनिटांच्या इंटिमेट सीनसाठी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. यासाठी फार खटाटोप करावा लागतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How intimate bold scenes are shoot in movies and web series know the truth behind the scenes nrp

Next Story
विश्लेषण: कर्ज घेणाऱ्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास बँक कर्ज माफ करते का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी