दर वर्षी दिवाळीनिमित्त फटाके मोठ्या प्रमाणात वाजविले जातात. यामुळे हवा प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण गंभीर पातळी गाठते. दिवाळीपुरता सुरू असलेल्या फटाक्यांचा वापर गेल्या काही वर्षांत नियमितपणे होऊ लागला. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्रचारसभांच्या वेळेला मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो आहे. याचबरोबर भारताने एखादा क्रिकेटचा सामना जिंकला अथवा वाढदिवस असला तरी गल्लोगल्ली फटाके वाजविण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीत फटाक्यांवर कारवाई करायची कोणी, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

आवाजाची चाचणी कशासाठी?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर वर्षी दिवाळीआधी फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेतली जाते. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या फटाक्यांचे नमुने मंडळाकडून यासाठी निवडले जातात. ही चाचणी खुल्या मैदानात काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने घेतली जाते. या चाचणीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण मोजले जाते. यात फटाका वाजविल्यानंतर त्यापासून ४ मीटर परिसरात किती आवाज होतो, याची नोंद घेतली जाते. मर्यादेपेक्षा जास्त ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली जाते. ही बंदी केवळ विक्रीसाठी नव्हे तर त्या फटाक्यांच्या उत्पादनासह त्यांच्या वापरावर असते.

silver sales increase in 2024
सोन्यापेक्षा चांदीची मागणी का वाढली? सोन्याच्या विक्रीत घट होण्याची कारणं काय?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”

हेही वाचा : विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?

u

चाचणीसाठी निकष काय?

फटाक्यांच्या आवाजाची चाचणी किमान ५ मीटर व्यासाच्या क्राँकिट पृष्ठभागावर घेतली जाते. ही चाचणी खुल्या वातावरणात घेणे बंधनकारक आहे. यामुळे चाचणीच्या ठिकाणापासून १५ मीटर अंतरापर्यंत कोणताही अडथळा नसावा. आवाजाची चाचणी करताना ते मोजण्यासाठी मंजूर केलेली उपकरणे वापरावीत. या सर्व निकषांचे पालन करून फटाक्यांच्या आवाजाची चाचणी केली जाते. या चाचणीत १२५ ते १४५ डेसिबल आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणण्याची शिफारस मंडळाकडून केली जाते. या चाचणीतून निर्यातीसाठीच्या फटाक्यांना वगळण्यात येते.

निष्कर्ष काय?

निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल आवाज ध्वनिप्रदूषण ठरतो. याच वेळी शांतता क्षेत्रात ही मर्यादा दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५, औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबल अशी आहे. या सर्व विभागांतील कमाल मर्यादा पातळीपेक्षा छोट्या फटाक्यांचा आवाजही अधिक आहे. यामुळे ध्वनिप्रदूषण नियमांचा भंग होत आहे. मंडळाने केलेल्या आवाज चाचणीत लवंगी फटाक्यांच्या माळेची आवाज पातळी ८१ डेसिबल नोंदविण्यात आली. रंगीबेरंगी पाऊसमुळे ६८ ते ८० डेसिबल आवाज होत आहे. याच वेळी सुतळी बॉम्बचा आवाज ७९ डेसिबल नोंदविण्यात आला. भुईचक्रांमुळेही ६५ ते ७५ डेसिबल आवाज होत आहे. रॉकेटचा आवाज ७२ डेसिबल आहे. तसेच, ३० शॉट फटाक्यांमुळे ७५ डेसिबलचा आवाज होत आहे. त्यामुळे एकही फटाका ध्वनिप्रदूषण पातळीच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?

रासायनिक घटकांचे काय?

फटाके वाजविल्यानंतर होणारे हवा आणि ध्वनिप्रदूषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते. मात्र, फटाक्यात कोणते घातक रासायनिक घटक आहेत, याची तपासणी मंडळाला करण्याचे अधिकार नाहीत. मंडळ केवळ प्रदूषणाची तपासणी करू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच फटाक्यांवर क्यूआर कोड बंधनकारक आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यातील रासायनिक घटक आणि आवाज पातळी याची माहिती मिळते. अनेक फटाक्यांवर अशी माहिती दिलेली नसते. ‘आवाज’ या स्वयंसेवी संस्थेने फटाक्यांचे रासायनिक परीक्षण केले होते. त्यात पर्यावरणपूरक फटाक्यांतही बेरियम घातक रसायन आढळून आले. बेरियमपासून बनविलेल्या फटाक्यांवर बंदी असतानाही त्यांची विक्री सुरू असून, पर्यावरणपूरक फटाकेही त्यातून मुक्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फटाक्यांची रासायनिक तपासणीही मंडळाने करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कारवाई करणार कोण?

फटाके वाजविण्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि वायू प्रदूषण या गंभीर समस्या बनल्या आहेत. असे असले तरी फटाक्यांच्या ध्वनिप्रदूषणावर कारवाई करण्याबाबत सरकारी यंत्रणांनी मौन धारण केले आहे. एखाद्या व्यक्तीने कोणताही फटाका वाजविला तरी ते ध्वनिप्रदूषण ठरणार आहे. यामुळे फटाके वाजविणाऱ्या व्यक्तीवर की फटाक्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ महापालिका आणि पोलिसांना कारवाईची शिफारस करू शकते. महापालिका आणि पोलिसांकडून फटाक्यांवर फारशी कारवाई होताना दिसत नाही. याचबरोबर फटाक्यांचे उत्पादन दक्षिणेतील राज्यांत प्रामुख्याने होत असल्याने तेथील उत्पादकांवर कारवाई कोण करणार, असाही प्रश्न उपस्थित होतो.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader