-ज्ञानेश भुरे

Kenyan Marathon Runner Eliud Kipchoge: मॅरेथॉन या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या शर्यतीमध्ये वर्षानुवर्षे वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या केनियाच्या एल्युड किपचोगेने रविवारी आपल्याच जागतिक विक्रमाला अर्ध्या मिनिटाने मागे टाकले. बर्लिन मॅरेथॉनमध्ये किपचोगेने ही कामगिरी केली. मॅरेथॉनसाठी अत्यंत पूरक असणाऱ्या हवामानात बर्लिनमध्ये तब्बल १२व्यांदा जागतिक विक्रमाची नोंद झाली. यात किपचोगेने चौथ्यांदा जागतिक विक्रमासह जेतेपद पटकावले. किपचोगेच्या या विलक्षण अशा विक्रमी मॅरेथॉन प्रवासाचा आढावा.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

किपचोगेला धावण्याची सवय कशी लागली?

लांब आणि मध्यम पल्ल्याच्या शर्यतीत केनियाचे वर्चस्व आहे. किपचोगेलाही धावण्याची सवय शाळेपासूनच लागली. मात्र, शालेय जीवनात किंवा त्यानंतरही त्याने धावपटू होण्याचा विचार केला नव्हता. शाळेत जाण्यासाठी त्याला रोज दोन मैल म्हणजे ३.२ किमी अंतर धावून जावे लागायचे. ही त्याची धावण्याची सवय त्याला पुढे कामी आली. वयाच्या १६व्या वर्षी किपचोगेला ऑलिम्पिक पदकविजेते पॅट्रिक सांग यांनी हेरले आणि त्याचा धावपटू बनण्याच्या प्रवासास सुरुवात झाली.

क्रॉसकंट्रीपासून सुरू झालेला किपचोगेचा प्रवास मॅरेथॉनपर्यंत कसा पोहोचला?

किपचोगेने सर्वात प्रथम क्रॉसकंट्री शर्यतीत धावायला सुरुवात केली. जागतिक क्रॉसकंट्री शर्यतीत २००२मध्ये तो पाचवा आला. त्यानंतर किपचोगे पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत स्थिरावला होता. या स्पर्धा प्रकारात त्याने जागतिक स्पर्धेपासून ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत अनेक पदके मिळविली. त्याने तीन हजार मीटर शर्यतीतही धाव घेतली. पण, तो या स्पर्धा प्रकारात फारसा रमला नाही. पुढे त्याने ६ ऑक्टोबर २०१२मध्ये सर्वप्रथम अर्ध-मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. पहिल्या वर्षी जागतिक स्पर्धेत तो सहावा आला. त्यानंतर २०१३मध्ये त्याने पूर्ण मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. यात हॅम्बर्ग मॅरेथॉनमधील त्याचे विजेतेपद पहिले ठरले. त्यानंतर त्याने तब्बल १५ वेळा मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत.

किपचोगेचे वेगळेपण कशात?

मॅरेथॉनमध्ये धावपटूच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. लांब पल्ल्याच्या या स्पर्धा प्रकाराकडे फारसे कुणी वळत नाही. लांब पल्ल्याच्या शर्यतीत इथिओपिया, केनिया या आफ्रिकन देशांतील धावपटूंचे वर्चस्व असले, तरी यातील बहुतेक जण ट्रॅकवर सुरुवात करून कारकीर्दीच्या अखेरीस मॅरेथॉनकडे वळले. यातही केवळ मॅरेथॉन धावणारे खेळाडू अधिक आहेत. पुरुष विभागात गॅब्रेसेलेसीचे नाव आधी येत असले, तरी तो सुरुवातीला ट्रॅक शर्यतीत अधिक रमला होता. किपचोगेने मॅरेथॉनवर लक्ष केंद्रित करत आपली कारकीर्द घडवली. तब्बल एका दशकापासून किपचोगे मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवतो आहे. वयाच्या ३७व्या वर्षीही त्याचा उत्साह कमी झालेला नाही. एकामागून एक आपलेच विक्रम तो मोडतो आहे.

किपचोगेच्या कारकीर्दीत बर्लिन मॅरेथॉनला वेगळे महत्त्व का?

जगातील प्रतिष्ठित मॅरेथॉन शर्यातींमध्ये बर्लिन मॅरेथॉनचा समावेश होतो. या शर्यतीत तब्बल १२वेळा विक्रमाची नोंद झाली आहे. यात किपचोगेने चार वेळा विक्रमी वेळ दिली आहे. विशेष म्हणजे चार वेळा ही मॅरेथॉन जिंकणारा तो दुसरा धावपटू ठरला. यापूर्वी इथिओपियाच्या हॅले गॅब्रेसेलेसीने चार वेळा ही शर्यत जिंकली होती. किपचोगेने सर्व प्रथम २००७, नंतर २००८ आणि २०१८मध्ये विक्रमासह ही शर्यत जिंकली होती. तसेच यंदाही तो या मॅरेथॉनचा विजेता ठरला.

मॅरेथॉन शर्यतीत किपचोगेची कामगिरी का ठरते विशेष?

ॲथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवर वेगाशी स्पर्धा करणाऱ्या धावपटूंचे अनेक दाखले देता येतील. पण, लांब पल्ल्याच्या शर्यतीत वेगाशी स्पर्धा करणारे फार थोडे धावपटू आहेत. यात किपचोगेचे नाव आघाडीवर आहे. दोन तास किंवा त्याहून कमी वेळेत शर्यत पूर्ण करण्याचा किपचोगेने बर्लिनमध्ये आटोकाट प्रयत्न केला. पण, त्यात त्याला यश मिळाले नाही. ऑक्टोबर २०१९मध्ये त्याने व्हिएन्ना येथे दोन तासात मॅरेथॉन पूर्ण केली होती. मात्र, त्याचा विक्रम अधिकृत मानण्यात आला नाही.

किपचोगे वादाच्या भोवऱ्यात का सापडला होता?

व्हिएन्ना येथील शर्यतीत किपचोगेने, क्रीडा साहित्य बनवणाऱ्या नायकी कंपनीने मॅरेथॉन धावपटूंसाठी तयार केलेले खास व्हॅप्रोफ्लाय बूट वापरले होते. धावपटूंसाठी असणाऱ्या बुटांमधील हे सर्वात प्रगत तंत्रज्ञान मानले जाते. यात बुटाचा तळभाग (सोल) अधिक जाड असतो आणि यात कार्बन धातूच्या पट्ट्यांचा वापर केलेला असतो. त्यामुळे धावपटूंना धावताना फार त्रास जाणवत नाही. किपचोगे या बुटाच्या वापरामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने बुटाच्या वापरासाठी विशेष नियम तयार केले असून, ते नोव्हेंबर २०२४पासून लागू होणार आहेत. नव्या तंत्राचे बूट वापरल्याने किपचोगेला किती मदत मिळाली हा चर्चेचा विषय ठरेल. मात्र, लांब पल्ल्याच्या शर्यतीमधील किपचोगेची कामगिरी उल्लेखनीय आहे. सलग दोन ऑलिम्पिक (रियो २०१६, टोकियो २०२०) विजेतेपदे त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात.