बांगलादेशातील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केले. या घटनेनंतर भारत आणि बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर आंदोलकांच्या एका समुदायाने त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला आणि परिसराची तोडफोड केली. ‘प्रथम आलो’ या बांगलादेशी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शेख हसीना यांना त्यांच्या निर्णयाबद्दल देशाला संबोधित करायचे होते, परंतु आंदोलकांचा समूह त्यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना दिली आणि त्यांच्याकडे वेळ नसल्याचेही सांगण्यात आले. परिणामी त्यांना आणि त्यांची बहीण रेहाना यांना देशातून पलायन करावे लागले.

सात लष्करी कर्मचाऱ्यांसह सी-१३०जे विमानात बसून शेख हसीना सोमवारी (५ ऑगस्ट) संध्याकाळी गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावर उतरल्या. त्यांनी तेथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आणि आता त्या ‘सेफ हाऊस’मध्ये आहेत. असे वृत्त आहे की, हसीना यांच्या लंडनला जाण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून देशाने त्यांच्या सुरक्षेसाठी राफेल जेट तैनात केले आहे. त्या आपल्या आश्रयस्थानी सुरक्षित पोहोचाव्या असा देशाचा उद्देश आहे. भारतात आल्यापासून त्या ‘सेफ हाऊस’मध्येच आहेत. त्यामुळे त्या भारतात आणखी किती दिवस राहणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्या इथे राहिल्यामुळे भारताला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? ब्रिटनने त्यांच्या आश्रयाला नकार दिल्यास पुढे काय होईल? याविषयी जाणून घेऊ.

police file case for forcing girl to perform obscene act in shelter home
धक्कादायक : लेस्बियन असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर बळजबरी, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
bangladeshi citizens lost kidney in india
Bangladesh : बांगलादेशातून भारतात नोकरीसाठी आले नी किडनी गमावून बसले; तिघांचा भयानक अनुभव
loksatta analysis how political instability in bangladesh adversely affecting Indian healthcare
विश्लेषण : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा विपरीत परिणाम भारतीय आरोग्यसेवेवर का होतोय?
Why are some elements in Bangladesh holding India responsible for the floods
विश्लेषण : पूरस्थितीसाठी बांगलादेशातील काही घटक भारताला जबाबदार का ठरवत आहेत?
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर आंदोलकांच्या एका समुदायाने त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला आणि परिसराची तोडफोड केली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने शेख हसीनांची सत्ता उलथवून लावली? कारण काय?

हसीना भारतात किती दिवस राहतील?

हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशच्या लष्कराने त्यांना लष्करी हेलिकॉप्टर देऊ केले होते. त्यांनी ढाका येथील त्यांच्या ‘गणभवन’ या अधिकृत निवासस्थानातून उड्डाण केले. या अधिकृत निवासस्थानातून निघाल्यानंतर लगेचच आंदोलकांनी हल्ला केला. तिथून शेख हसीना यांचे हेलिकॉप्टर लष्कराच्या हवाई तळाकडे गेले. त्या बांगलादेश हवाई दलाच्या सी-१३०जे लष्करी वाहतूक विमानातून आगरतळा येथे पोहोचल्या. त्यांचे विमान सोमवारी (५ ऑगस्ट) संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास हिंडन एअरबेसवर पोहोचले, जेथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे स्वागत केले. अनेकांच्या मते हिंडन एअरबेस दिल्लीपासून जवळ असल्यामुळे या ठिकाणाची निवड करण्यात आल्याचे सांगितले गेले.

डोवाल यांच्याशी तासभराच्या भेटीनंतर त्यांना दिल्लीतील ‘सेफ हाऊस’ मध्ये नेण्यात आले. मात्र, हसीना या भारतात तात्पुरत्या थांबल्या आहेत आणि त्या ब्रिटनमध्ये आश्रय मागत असल्याची माहिती आहे. त्या किती काळ भारतात राहतील हे सध्या अस्पष्ट आहे. परंतु, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी असा इशारा दिला की, शेख हसीना आणखी काही काळ भारतात राहतील. संसद भवनात बांगलादेशमधील परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीत बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, सरकारने हसीना यांच्याशी त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल संवाद साधला आहे आणि त्यांना या योजना ठरवण्यासाठी थोडा वेळ देऊ इच्छित आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, हसीना यांना भारतात घेऊन येणारे विमान आता बांगलादेशकडे परतले आहे. विमानाने सकाळी ९.०० च्या सुमारास सात लष्करी जवानांसह बांगलादेशातील तळाकडे उड्डाण केले.

शेख हसीना यांच्या ब्रिटनमधील आश्रयाचे काय?

सुरुवातीला हसीना जेव्हा भारतात आल्या, तेव्हा सर्व वृत्तांमध्ये असे म्हटले जात होते की, त्यांचा भारतात तात्पुरता मुक्काम असेल, कारण त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रयाची विनंती केली आहे. प्राप्त माहितीनुसार, लंडन हा हसीना यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, कारण त्यांची बहीण रेहाना यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. शिवाय, हसीना यांची भाची ट्यूलिप सिद्दिक या यूके हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदार आणि कीर स्टारमर सरकारमध्ये कनिष्ठ मंत्री आहेत. मात्र, तरीदेखील त्यांची विनती स्वीकारण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.

यूके होम ऑफिसने ‘सीएनबीसी टीव्ही १८’ला सांगितले की, ब्रिटीश इमिग्रेशनचे नियम व्यक्तींना पुर्णपणे आश्रय घेण्यासाठी किंवा तात्पुरता आश्रय घेण्यासाठी त्या देशात जाण्याची परवानगी देत ​​नाही. शिवाय, ब्रिटिश सरकारने असेही म्हटले आहे की, आश्रय शोधणाऱ्या व्यक्तींनी निवडलेल्या पहिल्या देशातच पुर्णपणे आश्रय घेणे आवश्यक आहे. “ज्यांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज आहे, त्यांनी पोहोचलेल्या पहिल्या सुरक्षित देशात आश्रयाचा दावा केला पाहिजे. सुरक्षिततेचा हा सर्वात योग्य मार्ग आहे,” असे यूके होम ऑफिसच्या प्रवक्त्यानेदेखील ‘एनडीटीव्ही’ला सांगितले. त्यामुळे ब्रिटनमध्ये शेख हसीना यांना आश्रयाची परवानगी मिळणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यापूर्वी ब्रिटनने अनेक देशांतील नेते, राजकीय नेते आणि हेरांना आश्रय दिला आहे. ब्रिटनने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक खासदार, रशियन गुप्तहेर अलेक्जेंडर वाल्टरोविच लिट्विनेंको आणि इतर लोकांना आश्रय दिला आहे. परंतु, ब्रिटनमध्ये बांगलादेशींचा एक मोठा गट आहे, जो शेख हसीना यांच्या विरोधात आहे.

हसीना अधिक काळ भारतात राहिल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात का?

जर ब्रिटनने हसीना यांना आश्रय दिला नाही तर, हसीना यांना भारतात राहण्याची परवानगी द्यायची की नाही, हा मोठा राजकीय प्रश्न भारतासमोर असेल. जर सरकारने बांगलादेशच्या शेख हसीना यांना देशात राहण्याची परवानगी दिली, तर देश एका पदच्युत नेत्याला पाठीशी घालत असल्याचे दिसून येईल. शिवाय, यामुळे बांगलादेशातील नवीन सरकारबरोबरचे संबंध गुंतागुंतीचे होतील. भारताला शेजारी देशाशी आपली भागीदारी सुरक्षित ठेवायची असेल तर बांगलादेशशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. कारण, बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी भारतविरोधी भावना अस्तित्त्वात आहे आणि देशाविषयी आणखी मतभेद निर्माण करणे, भारताला परवडणारे नाही.

दूसरा विचार केल्यास, शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबाशी भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. बांगलादेशातील १९७५ च्या अशांततेत त्यांच्या कुटुंबाची हत्या झाली तेव्हा इंदिरा गांधी सरकारने पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांना आश्रय दिला होता. शिवाय, त्यांच्या १५ वर्षांच्या सत्तेत त्या भारताच्या सुरक्षेच्या हिताचे रक्षण करत एक कट्टर सहयोगी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांची दिल्लीशी असलेली समीकरणे पाहता, या टप्प्यावर त्यांना सोडून देणेही सोपा निर्णय ठरणार नाही.

हेही वाचा : भारतविरोधी भूमिका घेणारे, नोबेल विजेते मुहम्मद युनूस कोण आहेत? बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापनेत त्यांचे नाव आघाडीवर का?

हसीना यांच्याकडे इतर पर्याय आहेत का?

भारत आणि ब्रिटन सोडले तर हसीना आणखी कुठे जाऊ शकतात? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती नाही. परंतु, ‘सीएनएन न्यूज १८’ ने दिलेल्या वृत्तानुसार त्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये जाण्याचा पर्याय शोधत आहेत. हसीना यांच्याकडील दूसरा पर्याय म्हणजे बांगलादेशला परतणे. परंतु, त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी ‘सीएनएन-न्यूज१८’ला सांगितले होते की, बांगलादेशला परतणार नाहीत.