“कुंभ के मेले मैं बिछडे तीन भाई… अब मिलेंगे या नहीं,” तुम्ही मनमोहन देसाईंच्या १९७७ साली आलेल्या अमर अकबर अँथनी चित्रपटातील हा आयकॉनिक डायलॉग ऐकलाच असेल. वर्षानुवर्षे अनेक चित्रपटांनी ‘कुंभ’ आणि त्यात हरवणे या गोष्टीशी संबंधित कथानके दाखवली आहेत. कारण- अशा मोठ्या मेळाव्यात हरवलेल्या प्रियजनांचा शोध घेणे ही खरोखरच अशक्यप्राय बाब ठरते. जगातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रमांपैकी एक असणारा यंदाचा महाकुंभ मेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमासाठी जगभरातून ४५० दशलक्ष भाविक, पर्यटक व यात्रेकरू प्रयागराज येथे येण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या गर्दीमुळे लोकांची, विशेषत: लहान मुलांची, बेपत्ता होण्याची चिंता स्वाभाविकपणे निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने यात्रेकरूंच्या गर्दीत हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्यासाठी मदत करण्यासाठी एआयवर चालणारे संगणकीकृत ‘खोया पाया केंद्र’ सुरू केले आहे. हे केंद्र कसे कार्य करते? जाणून घ्या…

महाकुंभात एआयवर चालणारे संगणकीकृत ‘खोया पाया केंद्र’ सुरू केले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : एका हत्तीवरून भारत-बांगलादेशमध्ये वाद; नेमके प्रकरण काय?

महाकुंभ मेळ्यात सुनेचे अश्रू

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रयागराज येथील मेला मैदानावर रडत असलेली एक महिला दिसत आहे. जेव्हा जवळच्या लोकांनी तिला तिच्या त्रासाचे कारण विचारले, तेव्हा तिने स्पष्ट केले की, तिची सासू गर्दीत बेपत्ता झाली आहे. व्हिडीओमध्ये एक महिला रडणाऱ्या सुनेला विचारते, “काय झालं, तू का रडत आहेस?” रडत रडत ती स्त्री उत्तर देते की, ती तिच्या सासूबरोबर महाकुंभमध्ये अंघोळ करायला आली होती, जी आता मेळाव्यात हरवली आहे. त्यांनी त्या महिलेला एक घोषणा करण्यास सुचवले आणि तिला आठवण करून दिली की, तिच्या सासूला शोधण्यासाठी पोलीस मदत करू शकतात. अशा घटना रोखण्यासाठी, प्रशासनाने कुटुंबांना पुन्हा एकत्र करण्यासाठी एआय यंत्रणेवर चालणारे संगणकीकृत केंद्र कार्यान्वित केले आहे.

हे केंद्र कसे कार्य करते?

महाकुंभ मेळ्यातील एआय तंत्रज्ञानावर चालणारी ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ केंद्रे व्यक्तींना, विशेषत: लहान मुलांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर भेट घालून देण्यात क्रांती घडवत आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या म्हणण्यानुसार पोलिसांनी एआय टूल्स सादर केली आहेत. या टूल्सद्वारे हरवलेल्या व्यक्तींचे फोटो कॅप्चर केले जातात आणि त्या चेहऱ्यांशी साधणारे चेहरे शोधण्यासाठी गर्दीला स्कॅन केले जाते. महाकुंभ मेळ्याला भेट देणाऱ्या लोकांना कुंभ ॲप वापरण्यासाठीदेखील प्रोत्साहित केले जाते. ‘खोया-पाया केंद्र’ म्हणून ओळखले जाणाऱ्या सेक्टर ४ मधील केंद्राने अलीकडेच धरमजीत (७) आणि विकास कुमार (६) या दोन हरवलेल्या मुलांची त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणली. १५ जानेवारी रोजी वेगळ्या भागात आढळून आलेले, त्यांचे फोटो डिजिटल प्लॅटफॉर्म आणि टीव्ही स्क्रीनवर जत्रेच्या मैदानावर प्रसारित करण्यात आले; ज्यामुळे त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत त्वरित पोहोचली.

महाकुंभ मेळ्यातील एआय तंत्रज्ञानावर चालणारी ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ केंद्रे व्यक्तींना, विशेषत: लहान मुलांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर भेट घालून देण्यात क्रांती घडवत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

अतिरिक्त मेला अधिकारी विवेक चतुर्वेदी यांनी एएनआयला सांगितले, “या केंद्राची स्थापना एआयवर आधारलेली आहे. हरवलेल्या लोकांसाठी राहण्याची, कपडे आणि जेवणाची व्यवस्था तिथे केली जाते. अशी एकही घटना घडलेली नाही की, ज्यामध्ये आम्ही मुले किंवा हरवलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाइकांशी पुन्हा भेट करून देऊ शकलो नाही. “कॉम्प्युटराइज्ड केंद्राकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या नातेवाइकांशी पुन्हा भेटता आले नाही, तर प्रशासन स्वखर्चाने त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाते,” असेही त्यांनी सांगितले.

‘भूला-भटका’ केंद्रे

महाकुंभ मेळ्याच्या सुरुवातीच्या दिवशी पवित्र संगमावर लाखो लोक जमले होते. परंतु, मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे पहिल्या काही तासांत २५० हून अधिक लोक त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त झाले. ‘भूला-भटका’ शिबिरे, पोलिस साह्य केंद्रे आणि टेहळणी बुरुजांवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसह उत्तर प्रदेश सरकारच्या पुढाकारांमुळे विभक्त झालेले लोक त्वरित पुन्हा एकत्र आले, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. या शिबिरांमध्ये डिजिटल टूल्स आणि सोशल मीडिया साह्याने सुसज्ज असलेल्या ‘खोया-पाया’ केंद्रांसह महिला आणि मुलांसाठी समर्पित विभाग आहेत. घाटांवरील लाऊडस्पीकरवर बेपत्ता व्यक्तींची नावे सतत जाहीर करण्यात येतात, तर पोलीस आणि नागरी संरक्षण पथकेही यात्रेकरूंना मदत करतात.

उत्तर प्रदेश नागरी संरक्षण दलामधील नितेश कुमार द्विवेदी यांनी शेअर केले की, पहिल्याच दिवशी शेकडो कुटुंबे पुन्हा एकत्र आली. “पहिल्या दीड तासात, आम्ही सुमारे २०० ते २५० लोकांना त्यांच्या कुटुंबाकडे परत आणण्यात यशस्वी झालो,” असे द्विवेदी यांनी पीटीआयला सांगितले. दिल्लीतील यात्रेकरू अजय गोयल यांनी तासाभरापासून विभक्त होण्याचा अनुभव सांगितला. “सुदैवाने आम्ही पटकन पुन्हा एकत्र आलो,” असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या अधिकृत निवेदनात, ‘खोया-पाया’ केंद्रांच्या यशाबद्दल चर्चा केली, जे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि सर्व उपस्थितांसाठी एक सहज आणि सुरक्षित अनुभव सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा घेत आहेत.

महाकुंभ मेळ्याच्या सुरुवातीच्या दिवशी पवित्र संगमावर लाखो लोक जमले होते. परंतु, मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे पहिल्या काही तासांत २५० हून अधिक लोक त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त झाले. (छायाचित्र-रॉयटर्स)

कुंभमेळ्यात हरवणे किती सामान्य?

कुंभमेळ्याच्या विशाल मेळाव्यात लोक त्यांच्या प्रियजनांपासून विभक्त झाल्याच्या असंख्य कथा गेल्या काही वर्षांत समोर आल्या आहेत. बरेच उपस्थित लोक सावधगिरी बाळगतात, जसे की त्यांची नावे आणि पत्ते लिहिलेल्या कागदी स्लिप्स बाळगणे, ते हरवल्यास त्यांना मदत करण्यासाठी इतरांना मदत करणे. हरवलेल्या आणि अखेरीस कुंभ मेळ्यात पुन्हा एकत्र येण्याच्या कथानकांना बॉलीवूड चित्रपटांमध्येही स्थान मिळाले आहे. प्रतिष्ठित अमर, अकबर अँथनीव्यतिरिक्त, मेहबूब खान दिग्दर्शित १९४३ च्या नर्गिस-स्टार तकदीरमध्ये कुंभ मेळ्याचे कथानक आहे. चित्रपटात, मेळ्यात नाटक करणाऱ्या एका विधुराला कळते की, त्याचा लहान मुलगा पप्पू बेपत्ता आहे. त्याचा शोध घेऊनही तो सापडत नाही.

हेही वाचा : चीनच्या नव्या तंत्रज्ञानामुळे चंद्रावर जाणं झालं स्वस्त; काय आहे प्रणाली?

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची प्रमुख भूमिका असलेला २००३ चा चित्रपट तुझे मेरी कसम, “कहीं कुंभ के मेले में तो नही बिछड गये थे? ऐसे अजनबी से क्यूँ लगते हो?”, असा संवाद आहे. प्रयागराजमध्ये भारत सेवा दल ही संघटना महाकुंभ, अर्धकुंभ व माघ मेळा यांसारख्या कार्यक्रमांमध्ये हरवलेल्या व्यक्तींची त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. ‘न्यूज १८’नुसार या मेळाव्यांदरम्यान ही संघटना सातत्याने सक्रिय असते.