वर्ल्ड तामिळ फेडरेशनचे अध्यक्ष नेदुमारन यांनी १३ फेब्रुवारी रोजी दावा केला की, श्रीलंकेचा तामिळ फुटीरतावादी गट “लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम”चा प्रमुख (LTTE Chief) वेलुपिल्लई प्रभाकरन अजूनही जिवंत आहे. तसेच तामिळ इलमची मुक्तता करण्यासाठी प्रभाकरन लवकरच पुन्हा सक्रीय होऊन त्याची पुढील योजना तो स्वतःच जाहीर करेल, असे नेदुमारन म्हणाले. १८ मे २००९ रोजी श्रीलंकेच्या सैन्याने प्रभाकरनच्या मृत्यूची घोषणा केली आणि श्रीलंकन बेटाच्या उत्तर आणि पुर्वेकडे बंडखोराच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातले गृहयुद्ध अखेर संपले. प्रभाकरनच्या मृत्यूमुळे लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचे नेतृत्वही संपुष्टात आले, त्यामुळे त्यांच्या सशस्त्र उठावाचाही अंत झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.

श्रीलंकेच्या गृहयुद्धाच्या शेवटच्या दिवसांत काय घडलं?

दोन दशकांच्या सशस्त्र उठावानंतर फेब्रुवारी २००२ मध्ये श्रीलंकन सरकार आणि LTTE च्या दरम्यान नॉर्वेच्या मध्यस्थीने युद्धविराम करार करण्यात आला. मात्र २००६ साली दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करत युद्धविराम संपविला. कराराच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी केला गेला. एलटीटीईने २००६ नंतर पुन्हा एकदा गनिमी हल्ले आणि आत्मघातकी मोहिमा राबविल्या. त्याच्या उत्तरादाखल श्रीलंकेच्या सैनिकांनीही बंडखोरांना मागे हटण्यास भाग पाडले.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?
Hockey India CEO Elena Norman resigns after nearly 13-year stint
Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय

२००८ साली श्रीलंकेच्या सैनिकांना कोलंबोमधील लष्करी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या बसला क्लेमोर येथील भू सुरुंग हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी युद्धविराम करार रद्द झाल्याची अधिकृतपणे घोषणा करत सैनिकी कारवाईला सुरुवात केली. पुढील वर्षभरातच श्रीलंकेच्या सैन्याने एलटीटीईला उत्तरकडे ढकलण्यात यश मिळवले. जानेवारी २००९ मध्ये एलटीटीईची प्रशासकीय राजधानी असलेल्या किलिनोच्चीला ताब्यात घेण्यात आले. जाफना येथील हल्ले वगळता श्रीलंकन सैन्यासमोर LTTE फार काही आव्हन उभे करु शकले नाही.

सरंक्षण विषयक तज्ज्ञ अशोक के मेहता यांनी या गृहयुद्धावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी अखेरच्या काळात प्रभाकरनने आपल्या गुप्तचर विभागाचे प्रमुख पोट्टू अम्मन यांना दिलेल्या सूचना नमूद केल्या आहेत. प्रभाकरन म्हणाल होता, “एलटीटीईची ७५ टक्के ताकद संपली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय हे युद्ध थांबवत नाही, तोपर्यंत तग धरून राहावे लागेल.”

एप्रिल २००९ पर्यंत, एलटीटीईच्या बंडखोरांना मुल्लैतिवू येथे काही नागरिकांसह किनाऱ्याच्या आठ किमी अंतरावर रोखून धरले. आंतरराष्ट्रीय दबाव, तसेच भारतात लोकसभा निवडणुका असल्यामुळे भारतानेही कारवाई करण्यास मनाई केली होती. त्यामुळे श्रीलंका सरकारने या भागाला नो फायर झोन घोषित केला. याठिकाणी हवाई हल्ला, विमानं, जड शस्त्रास्र यांचा वापरास मनाई करण्यात आली.

परंतु यामुळे LTTE ला किंचित दिलासा मिळाला. श्रीलंकन सैन्याने बंडखोरांची जमीनीवर आणि समुद्रात नाकेबंदी केली होती. ११ मे पर्यंत संघर्ष क्षेत्राची पुर्नरचना करण्यात आली. ज्यामुळे १.५ चौरस किमीपर्यंत LTTE सीमित करण्यात आले. मात्र ७०० LTTE बंडखोरांनी जवळपास काही हजार नागरिकांना ओलीस ठेवले होते. मेहता यांनी लिहिले की, श्रीलंकेच्या सैन्यासाठी ही एक डोकेदुखी होती. कारण या नागरिकांची मानवी ढालीप्रमाणे LTTE ने वापर केला.

LTTE केड फार काही पर्याय उरले नव्हते. श्रीलंकन सरकारचा कयास होता की, एलटीटीईचे बंडखोर लढवय्ये असल्यामुळे कदाचित ते सामुहिक आत्महत्येचा मार्ग पत्करू शकतात. प्रभाकरनना देखील युद्धविरामाच्या वाटाघाटीची शक्यता होती, तशी आशाही त्याने बोलून दाखविली. पण सरकारने जेव्हा युद्धविराम आणि वाटाघाटीचा प्रस्ताव नाकारला तेव्हा एलटीटीईने यातून बाहेर पडण्याच्या काही योजना आखल्या.

मेहता यांनी पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, अशक्यप्राय वाटणाऱ्या या सुटकेच्या तीन योजना होत्या. पहिल्या टप्प्यात, प्रभाकरनच्या नेतृत्वाखालील गट नांथीकडल सरोवर ओलांडून पूर्वेला तीन गटांमध्ये विखुरला जाईल. दुसऱ्या टप्प्यात, बी नादसेन यांच्या नेतृत्वाखालील गट जखमी आणि आजारी शरणागतींसाठी वाटाघाटी करेल आणि तिसऱ्या टप्प्यात, प्रभाकरनचा मुलगा चार्ल्स अँटोनी याच्या नेतृत्वाखाली उरलेले बंडखोर रिअरगार्ड अॅक्शन म्हणजे निकराची लढाई लढतील.

तथापि, बंडखोरांनी अखेरचा निकराचा लढा दिल्यानंतर २४ तासांहून कमी वेळात श्रीलंकन सैनिकांनी विजय मिळवला. एलटीटीईचा एकही बंडखोर सोडला नाही, सर्वांना मारण्यात आले. सैन्याच्या या कारवाईनंतर श्रीलंकेवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि शस्त्रबंदी असलेल्या क्षेत्रामध्ये तोफखाना वापरल्याबद्दल प्रचंड टीका झाली.

अखेर प्रभाकरनचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय माध्यमांना संघर्ष क्षेत्रापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रभाकरनच्या मृत्यूच्या वेगवेगळ्या आवृत्त्या समोर आल्या. सैन्याने दावा केला की, प्रभाकरन व्हॅनमध्ये आपल्या अनुयायांसोबत पळून जात असताना व्हॅनमधून सैन्यांवर गोळीबार करण्यात आला. दोन तासांच्या चकमकीनंतर सैनिकांनी व्हॅनवर रॉकेट डागून व्हॅन उडवून दिली. ज्यात प्रभाकरनचा मृत्यू झाला. यामध्ये सैनिकांनी कधी व्हॅन तर कधी रुग्णवाहिकेचा उल्लेख केला. दुसऱ्या आवृत्तीत म्हटले गेले की, प्रभाकरन सैन्याची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करत असताना मारला गेला.

काहींनी असेही म्हटले की, प्रभाकरनचा मृत्यू आत्महत्येने झाला. श्रीलंकेतील तामिळ पत्रकार डीबीएस जयराज यांनी २०२१ मध्ये लिहिले की, प्रभाकरनचा मृतदेह मंगळवारी पहाटेच्या आधी सापडला. त्याच्याजवळच सहा अंगरक्षकांचे मृतदेह सापडले. प्रभाकरनने तोंडात बंदूक ठेवून वरच्या दिशेने गोळीबार केल्याचे संकेत त्याच्या मृतदेहावरुन दिसत होते. अजून एका आवृत्तीत असा दावा करण्यात आला की, प्रभाकरनला सैन्याने पकडले होते. युनिव्हर्सिटी टीचर्स फॉर ह्युमन राईट्स-जाफना यांच्या गटाने केलेले प्रकाशित केलेल्या एका अहवालात लिहिले की, प्रभारकरनला पकडून डिव्हिजन ५३ च्या मुख्यालयात ठेवून त्याचा छळ करण्यात आला. त्यावेळी तिथे श्रीलंकेचे राजकारणी आणि सैन्य प्रमूख देखील उपस्थितीत होते, याबाबत इंडियन एक्सप्रेसने २००९ मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. मात्र श्रीलंका सरकारने हा दावा फेटाळून लावला होता.

पी नेदुमारन यांच्या दाव्यामुळे आता प्रभाकरनच्या मृत्यूवेळी ज्या वेगवेगळ्या अटकळ बांधल्या जात होत्या, चर्चा केल्या जात होत्या त्याला पुन्हा एकदा उधाण आले आहे.