scorecardresearch

विश्लेषण : १८८ मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती पडला? पाऊस मोजतात कसा माहितीय का?

अमुक इतका मिमी पाऊस पडला म्हणजे किती पाऊस पडला?, पाऊस मोजतात कसा? त्यामागील तंत्र कसं आहे?

How Rainfall Is Measured
दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपण पर्जन्यमानाची आकडेवारी ऐकतो, पाहतो (फाइल फोटो, सौजन्य – एपीवरुन साभार)

How Rainfall Is Measured: अंबरनाथमध्ये १८८ मिमी पाऊस झाला किंवा चिपळूण १६९ मिमी पाऊस झाला यासारखी आकडेवारी आपण सामान्यपणे पावसाळ्याच्या काळात कमी दिवसांमध्ये अधिक पाऊस झाला किंवा जोरदार पाऊस झाला तर वृत्तपत्रांमधून वाचतो. अनेकदा वृत्तवाहिन्यांवरही ही आकडेवारी सांगितली जाते. आता पावसाळ्यात तर सातत्याने सातत्याने बातम्यांमध्ये ऐकायला, वाचायला मिळणारा अमुक इतका मिमी पाऊस पडला म्हणजे किती पाऊस पडला?, पाऊस मोजतात कसा? त्याचं काय तंत्र आहे? यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडतात. याच प्रश्नांची उत्तरं आपण मराठी विज्ञान परिषदचे डॉ. दि. मा. मोरे यांनी दिलेल्या माहितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा >> मुंबई, कोकणातील कोसळधार मध्य महाराष्ट्रातही बरसणार; कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकमध्येही वाढणार पावसाचा जोर

पाऊस किती प्रकारचा?
आपल्या देशातील सर्व भागांत साधारणत: वर्षांतील पावसाळ्याच्या चार-साडेचार महिने पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो. पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणीविषयी समजून घेणेही आवश्यक आहे. पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे.  बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते.

दोन मुख्य पद्धती…
पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकॉर्डिंग आणि नॉन-रेकॉर्डिंग अशा दोन प्रकारांत असतात.

१) रेकॉर्डिंग पर्जन्यमापक – 

हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घडय़ाळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते. या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवड्याचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते.

नक्की वाचा >> विश्लेषण : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी का साचते?

२) नॉन-रेकॉर्डिंग पर्जन्यमापक –

हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्केबसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.

नक्की वाचा >> विश्लेषण : पावसाळ्यात लोकल सेवा का कोलमडते?

नेमका कसा मोजतात पाऊस?
पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक ठेवताना, त्या ठिकाणापासून  किमान ३० मीटरच्या त्रिज्येमध्ये झाड, इमारत इ. अडथळे नसावेत. सपाट प्रदेशामध्ये साधारणत: १०० चौरस किलोमीटर क्षेत्राच्या परिसरात किमान एक पर्जन्यमापक असण्याची गरज आहे. हिमवर्षांव मोजण्यासाठी नॉन रेकॉìडग स्नो गेजचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How rainfall is measured in india mumbai maharashtra rains scsg