दिवसेंदिवस अमली पदार्थ, अवैध चलन आणि विशेषतः कोकेनच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात लेहंगा, ब्रुमस्टिक्स, केसांचे विग, थर्माकोल बॉल्सचा वापर भारतात अवैध पैसे, हेरॉइन आणि कोकेनसारख्या अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी करण्यात आली, असे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नवीन अहवालात म्हटले आहे. ‘स्मगलिंग इन इंडिया’ अहवालात तस्करीच्या कल्पक पद्धतींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. डीआरआयने कोकेन, मेथाम्फेटामाइन, प्रतिबंधित सिगारेट आणि अवैध विदेशी चलन जप्त करण्यातही मोठी वाढ नोंदवली आहे. जमीन आणि सागरी मार्गांव्यतिरिक्त भारताला दोन प्रमुख अमली पदार्थ केंद्रांशी जोडणारे डेथ क्रेसेंट (अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान) आणि डेथ ट्रँगल (म्यानमार, लाओस आणि थायलंड) हे तस्करीचे नवीन मार्गदेखील उदयास आले आहेत. विशेषत: दुबई, दक्षिणपूर्व आशियामधून भारतात प्रतिबंधित सिगारेटची तस्करी करण्यासाठी प्रमुख संक्रमण केंद्र ठरत आहे. तस्करीत वाढ होण्यामागील कारणे काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘डीआरआय’च्या अहवालात काय?

पुस्तकातून कोकेनची तस्करी

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
journey of India’s engagement with the Taliban
तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट
supplementary chargesheet in Kalyaninagar accident case and chargesheet against accused in blood sample tampering case
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुरवणी आरोपपत्र, रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपीविरुद्ध आरोपपत्र

कोकेन हे मूळचे पश्चिम दक्षिण अमेरिकेतील कोका वनस्पतीच्या पानांपासून तयार केलेले औषध आहे. ‘डीआरआय’नुसार अलीकडच्या वर्षांत, दक्षिण अमेरिकन देशांमधून भारतात कोकेनची तस्करी करण्यासाठी हवाई प्रवास हा एक पसंतीचा मार्ग म्हणून उदयास आला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९७५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले, जे मागील आर्थिक वर्षात नोंदवलेल्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. भारतात प्रामुख्याने विमानतळांद्वारे तस्करी करून जप्त केलेल्या कोकेनचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले आहे. भारतात प्रामुख्याने कोकेनची तस्करी तीन मार्गांनी होते. पहिले म्हणजे, परदेशी नागरिक त्यांच्या शरीरात कोकेन लपवून विमानाने प्रवास करतात, दुसरे म्हणजे आफ्रिकेतून प्रवास करणाऱ्या भारतीयाद्वारे किंवा कुरिअर मालाद्वारे कोकेनची तस्करी. ऑगस्ट २०२३ मध्ये ‘डीआरआय’ने बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी नागरिकाला मुलांच्या पुस्तकात कोकेन लपवून आणताना पकडले. काही महिन्यांनंतर मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाच्या केसांच्या विगमध्ये कोकेन सापडले. शॅम्पू आणि मॉइश्चरायझरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या आणि साबणांमध्ये कोकेन लपवणेदेखील सामान्य आहे.

कोकेन हे मूळचे पश्चिम दक्षिण अमेरिकेतील कोका वनस्पतीच्या पानांपासून तयार केलेले औषध आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?

भारतीय नागरिकांच्या मदतीने होणारी तस्करी

परदेशी नागरिकांनंतर कोकेनची मोठे जप्ती आफ्रिकेत प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांशी संबंधित आहे. ही तस्करी त्यांच्या भारतात परत येण्याशी जोडलेली असल्याचे आढळून आले आहे. अनेकदा भारतीय परदेशात अडकतात, त्यांना परत मायदेशी पाठवण्यात येईल असे सांगून त्यांच्याद्वारे तस्करी केली जाते. म्यानमार, काठमांडू, माले आणि ढाका येथील विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय जप्तीमुळे हा कल विकसित झाला आहे. “भारतीय नागरिकांचा खेचर म्हणून वापर करणे हीदेखील एक सामान्य घटना ठरत आहे. अनेकांना लॉटरी योजना किंवा नोकरीच्या ऑफरद्वारे फसवले जाते, ज्यात काहीवेळा नकळत अवैधरित्या त्यांना कोकेनची तस्करी करण्यास सांगितले जाते,” असे अहवालात म्हटले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये सिएरा लिओनहून मुंबईला आलेल्या एका भारतीय नागरिकाकडून डीआरआयने चार किलोग्राम कोकेन जप्त केले.

हवाई प्रवासानंतर कोकेन तस्करीचा सर्वात प्रचलित मार्ग कुरिअर सेवा आहे. जून २०२३ मध्ये ब्राझील येथील साओ पाउलो येथून एका पार्सलमध्ये दिल्ली कुरिअर टर्मिनलवर थर्माकोलच्या बॉलमध्ये लपवून ठेवलेले कोकेन जप्त करण्यात आले. “काळजीपूर्वक तपासणी केल्यावर असे दिसून आले की, काही थर्माकोल बॉल इतरांपेक्षा किंचित जड होते. सर्व बॉल्स कापल्यानंतर असे आढळून आले की, अंदाजे १० हजार बॉल्सपैकी ९७२ बॉल्समध्ये पॉलिथिन होते; ज्यामध्ये पांढरी पावडर होती. प्राथमिक चाचण्यांमध्ये ही पावडर कोकेन असल्याचे आढळले. एकूण १९२२ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले,” असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुढील महिन्यात कोस्टा रिका येथून एका पार्सलमध्ये मुंबई कुरिअर टर्मिनलवर लाकडी वस्तूंमध्ये लपवून ठेवलेले कोकेन जप्त करण्यात आले.

दिवसेंदिवस अमली पदार्थ, अवैध चलन आणि विशेषतः कोकेनच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अफगाणिस्तानातून हेरॉइन अन् श्रीलंकेत चरसची तस्करी

‘डीआरआय’ने मे २०२३ मध्ये अफगाणिस्तानातून येणारे ५.५ किलो हेरॉईन भारत आणि पाकिस्तानदरम्यान अटारी सीमेवर पकडले होते. या वर्षी मार्चमध्ये भारतीय तटरक्षक दलाने १०९ कोटी रुपये किमतीच्या ९९ किलो चरसच्या पाच पोत्या घेऊन श्रीलंकेकडे जाणारी बोट अडवली. काही दिवसांपूर्वी डीआरआय अधिकाऱ्यांनी मदुराई रेल्वेस्थानक आणि चेन्नई कोडुंगयूर डंप यार्ड येथे ३६ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते, जे श्रीलंकेला नेले जाणार होते. काही वेळा तस्करांनी रसायने आणि औषधांच्या नावाखाली अमली पदार्थांची निर्यात करण्याचाही प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, जानेवारीमध्ये बँकॉकसाठी नियत केलेल्या निर्यात मालामध्ये अधिकृतपणे हायड्रॉक्सीलिमाइन हायड्रोक्लोराइड समाविष्ट होते, हे फार्मास्युटिकल्स, ऍग्रोकेमिकल्स आणि रंगांच्या संश्लेषणामध्ये वापरले जाणारे संयुग होते. मात्र, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही खेप रोखली तेव्हा त्यात ५० किलो केटामाइन होते.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ‘डीआरआय’ने ८,२२४ किलोग्राम अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांसह १०९ प्रकरणे नोंदवली. यामध्ये ४९ किलोग्राम हेरॉइन (३६५ कोटी रुपये), २३६ किलोग्राम मेफेड्रोन (३५७ कोटी रुपये) आणि १३६ किलोग्राम मेथाम्फेटामाइन (२७५ कोटी रुपये) यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये प्रतिबंधित सिगारेटच्या जप्तींची संख्या १७९ कोटी रुपये इतकी होती. बहुतांश तस्करी ही सागरी मार्गाने होते. “म्यानमार-भारत सीमेव्यतिरिक्त, दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्वेतील तस्करी सिंडिकेट सागरी मार्गाने मोठ्या कारवाया करतात. मध्यपूर्वेतील फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन एक प्रमुख ट्रान्झिट पॉईंट म्हणून उदयास येत आहे. याच ठिकाणाहून सिगारेट-लपवलेला माल भारतात पाठवला जातो. “बेकायदा सिगारेट काही दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये तयार केल्या जात असल्या तरी असे दिसते की ही खेप सुरुवातीला आग्नेय आशियातून दुबईला पाठवली गेली आणि नंतर ती पुन्हा भारतात पाठवली गेली,”असे ‘डीआरआय’अहवालात नमूद आहे.

सोने, रत्ने आणि पैश्यांची तस्करी

‘डीआरआय’ने कोलकाता विमानतळावर मेंदीच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले १.१ कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. दिल्लीतील विमानतळ कुरिअर टर्मिनलवर ९४ कोटी रुपये किमतीचे सौदी रियालदेखील दुबईला जाणाऱ्या लेहंग्यातून जप्त करण्यात आले. या वर्षी जानेवारीमध्ये ‘डीआरआय’ने हैदराबाद आणि बंगळुरू विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या चार प्रवाशांकडून सुमारे १४ कोटी रुपयांचे नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत उगवलेले हिरे जप्त केले. दोन्ही घटनांमध्ये हे हिरे चॉकलेटच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. एजन्सीने आतापर्यंत लेन्स सेंटर उपकरणांमध्ये, कार इंजिन पिस्टनमध्ये, मोल्ड तयार करणाऱ्या मशीनमध्ये, फूड प्रोसेसरमध्ये आणि घरगुती वस्तू यांसारख्या वस्तूंच्या निर्यात मालामध्ये परदेशी नागरिकांनी वाहून नेलेले सोने जप्त केले आहे.

हेही वाचा : एटीएममधून काढता येणार पीएफ खात्यातील पैसे? ‘EPFO ​​3.0’ नक्की काय आहे?

“दुबई आणि बँकॉकमध्ये कमी किमतीत उपलब्ध असलेले सोने अनेकदा सागरी मार्गाने भारतात तस्करी करण्यासाठी श्रीलंकेसारख्या शेजारील देशांमध्ये नेले जाते. अनेक प्रकरणांमध्ये श्रीलंकेतून सोने आणले गेले आहे आणि मध्य समुद्रातील स्थानिक मासेमारी नौकांकडे हस्तांतरित केले गेले आहे, जे सावधपणे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर हे सोने उतरवतात. मंडपम आणि वेधलाई किनाऱ्यांवर हे वारंवार घडते. ‘डीआरआय’ने सर्वात कमी विकसित देशांना मदत करण्याच्या योजनेअंतर्गत गिनीमधून सोने आयात करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. बनावट प्रमाणपत्रांसह, कागदोपत्री कामासाठी आयातदार दुबईस्थित व्यापाऱ्यांवर अवलंबून होते आणि त्यांचा खाण कामगारांशी थेट संपर्क नव्हता. या आयातीशी जोडलेल्या खाणीत इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्पादन करण्याची क्षमता नव्हती. या प्रकरणात अंदाजे शुल्क चोरी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये ‘डीआरआय’ने ३० हजार ६०० कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने आयात करण्यासाठी ‘ASEAN-India FTA’ लाभांचा गैरफायदा घेतल्याबद्दल तीन आयातदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader