भारत लवकरच आपले हवाई संरक्षण अधिक सक्षम करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रगत व्होरोनेझ लाँग-रेंज रडार सिस्टीमसाठी चार अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला अंतिम रूप देण्यासाठी भारत रशियाशी चर्चा करीत आहे. भारताला ही रडार यंत्रणा मिळाल्यास क्षेपणास्त्र शोधण्याची आणि हवाई संरक्षण क्षमता वाढेल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या तीन दिवसीय रशिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या कराराविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली? भारतासाठी याचे महत्त्व काय? त्यामुळे भारताची हवाई संरक्षण क्षमता कशी सक्षम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

वोरोनेझ रडार प्रणाली काय आहे?

वोरोनेझ लाँग-रेंज अर्ली वॉर्निंग रडार प्रणाली रशियाच्या अल्माझ-अँटे कॉर्पोरेशनने निर्मित केलेल्या वोरोनेझ सीरिजचा भाग आहे. अहवालानुसार, या रडारची एकूण रेंज आठ हजार किलोमीटरपर्यंत आहे आणि ही प्रणाली एकाच वेळी ५०० हून अधिक वस्तूंचा शोध घेऊ शकते म्हणजेच ट्रॅक करू शकते. वोरोनेझ रडार यंत्रणा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी स्टेल्थ विमानांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. रशिया २०१२ पासून ही रडार प्रणाली वापरत आहे आणि हळूहळू जुन्या सोविएत काळातील रडार प्रणाली बदलत आहे.

SpaDeX satellites hold position at 15m
ISRO SpaDeX Docking Mission : …तर भारत ठरेल जगातील चौथा देश, इस्रो पुन्हा इतिहास रचण्यास सज्ज; भारताच्या SpaDex मिशनकडे जगाचं लक्ष!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
Chief Minister Devendra Fadnavis announcement regarding land registration Mumbai news
कोणत्याही कार्यालयातून दस्तनोंदणीची मुभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
stalled work of the proposed international airport at Purandar will get boost
‘पुरंदर’ विमानतळाचे लवकरच टेक ऑफ
विमानात हजारो फूट उंचीवर इंटरनेट कसं वापरता येणार? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Air India Flight Wifi : विमानात हजारो फूट उंचीवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळणार?
isro historical achievement
‘स्पेस डॉकिंग’च्या यशाकडे लक्ष, महत्त्वाच्या प्रयोगासह ‘इस्रो’ इतिहास घडविणार
चार अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला अंतिम रूप देण्यासाठी भारत रशियाशी चर्चा करीत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : कैद्यांना काम करण्याची अन् कुटुंबाबरोबर राहण्याचीही संधी? खुले कारागृह म्हणजे काय?

“सध्या याला नवीन घटकांसह श्रेणी सुधारित केले जात आहे; ज्यामुळे लष्कराला हवेतील आणि जवळच्या जागेच्या वातावरणात विविध आकारांच्या लक्ष्यांचा मागोवा घेणे, त्यांच्या अंतरांची गणना करणे आणि त्यांची क्षमता निर्धारित करणे शक्य होणार आहे. आवश्यक असल्यास ही प्रणाली त्यांना अडवूदेखील शकेल,” असे ब्यूरो ऑफ मिलिटरी-पोलिटिकल ॲनालिसीस (BVPA)चे प्रमुख अलेक्झांडर मिखाइलोव्ह यांनी ‘स्पुतनिक इंडिया’ला सांगितले. रशियाने किमान १० वोरोनेझ रडार प्रणाली तैनात केल्या आहेत; ज्यामुळे क्षेपणास्त्र संरक्षण पायाभूत सुविधा वाढल्या आहेत.

वोरोनेझ रडार प्रणाली भारताला का हवी आहे?

रशियाची वोरोनेझ रडार यंत्रणा मिळवण्यात भारताला रस आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, भारतीय संरक्षण अधिकारी आणि अल्माझ-अँटेचे शिष्टमंडळ सध्या चर्चेच्या प्रगत टप्प्यात आहे. गेल्या महिन्यात उपसभापती व्लादिमीर मेडोव्हनिकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली रशियन निर्मात्याच्या १० सदस्यांनी प्रकल्पाचा भाग असणाऱ्या ऑफसेट भागीदारांना भेटण्यासाठी दिल्ली आणि बेंगळुरूसह भारताला भेट दिली, असे वृत्त ‘द संडे गार्डियन’ने दिले आहे. सूत्रांनी वृत्तपत्राला सांगितले की, मेक इन इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने किमान ६० टक्के प्रणाली भारतीय भागीदारांद्वारे तयार केली जाईल. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे रडार यंत्रणा बसवणे अपेक्षित आहे.

भारतासाठी याचे महत्त्व काय?

वोरोनेझ रडार प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण क्षमतांना बळ देईल. हा निर्णय म्हणजे वाढत्या प्रादेशिक सुरक्षा धोक्यांमध्ये हवाई संरक्षण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या देशाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रणालीमुळे भारताला चीन, दक्षिण आणि मध्य आशिया आणि बहुतेक हिंद महासागर क्षेत्रातील हवाई धोक्यापासून दूर ठेवण्यास मदत करील, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ‘स्पुतनिक इंडिया’शी बोलताना ‘BVPA’चे मिखाइलोव्ह म्हणाले की, क्षेपणास्त्र इशाऱ्याच्या प्रयत्नांमध्ये रडार महत्त्वाची भूमिका बजावेल.

“जेव्हा एखादा उपग्रह प्रक्षेपण शोधतो तेव्हा तो वोरोनेझ रडारला सतर्क करतो, जो नंतर धोक्याची पुष्टी करतो किंवा खंडन करतो. या रडार यंत्रणांची महत्त्वाची भूमिका म्हणजे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपण यांसारख्या धोक्याची पडताळणी करणे आणि महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करणे,” असे त्यांनी स्पष्ट केले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे शोधण्यासाठी ही यंत्रणा रशियाच्या उपग्रहांबरोबर एकत्र काम करते. माजी भारतीय हवाई दल (आयएएफ) उपाध्यक्ष, सेवानिवृत्त एअर मार्शल अनिल खोसला यांनी ‘स्पुतनिक इंडिया’ला सांगितले की, भारताच्या शत्रूंकडून वाढत्या क्षेपणास्त्र धोक्यांमध्ये, धोरणात्मक स्थिरता राखण्यासाठी प्रगत रडार प्रणाली महत्त्वाची आहे.

हेही वाचा : एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?

“दक्षिण आशियामध्ये भारतासमोर वाढत्या सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे; ज्यात शेजारील देशांद्वारे प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीच्या संभाव्य तैनातीचा समावेश आहे. वोरोनेझसारखी प्रगत रडार प्रणाली भारताला तांत्रिक क्षमता राखण्यास आणि विकसित होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यास सक्षम करील,” असे ते म्हणाले. रडारच्या मल्टीरोल क्षमतेत अंतराळ निरीक्षणाचा समावेश आहे. त्यामुळे ही प्रणाली भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठीदेखील महत्त्वपूर्ण ठरू शकते. खोसला म्हणाले, “अवकाशातील वस्तूंवर नजर ठेवण्याची रडारची क्षमता भारताच्या नागरी आणि लष्करी उद्दिष्टांशी सुसंगत आहे. त्याचा फायदा भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)लादेखील होणार आहे. यामुळे भारत पाच हजारपेक्षा जास्त रेंजच्या रडार प्रणाली असलेल्या राष्ट्रांच्या यादीतदेखील सामील होईल.

Story img Loader