William Dalrymple Golden Road: भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या जागतिक प्रभावा संदर्भात भाष्य करणारे इतिहासकार विल्यम डालरिंपल हे नाव विशेष चर्चेत आहे. डालरिंपल यांनी त्यांच्या ‘Golden Road’ या पुस्तकात प्राचीन भारताचा जागतिक संस्कृतीवर कसा व्यापक प्रभाव पडला होता यावर प्रकाश टाकला आहे. डालरिंपल यांच्या मते, प्राचीन भारताची संपन्न ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, धर्म आणि विज्ञान जगभर पसरले आणि विविध भागातील समाजांवर त्यांनी दीर्घकालीन प्रभाव टाकला. गोल्डन रोड हा शब्द डालरिंपल यांनी भारतातून सुरू झालेल्या सागरी व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या संदर्भात वापरला आहे. जागतिक इतिहासात प्रचलित असलेल्या ‘सिल्क रोड’ या संकल्पनेला डालरिंपल यांनी ‘गोल्डन रोड’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या मते Golden Road हा अधिक महत्त्वाचा होता, कारण या मार्गाद्वारे भारतीय संस्कृतीचा प्रसार जगभर झाला.

गोल्डन रोड का महत्त्वाचा होता?

डालरिंपल यांनी या मार्गाच्या माध्यमातून भारतीय तत्त्वज्ञानाचा, बौद्ध आणि हिंदू धर्माचा आणि संस्कृत साहित्याचा प्रसार आग्नेय आशियात, मध्य पूर्व, आणि युरोपमध्ये कसा झाला हे दर्शवून दिले. यामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान सैबेरिया, मंगोलिया आणि चीनपर्यंत कसे पसरले याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. गोल्डन रोड या पुस्तकात डालरिंपल यांनी भारताच्या सांस्कृतिक वारशाची पुनर्मांडणी केली आहे. व्यापाराच्या माध्यमातून व्यापक आणि गहन सांस्कृतिक प्रभाव कसा पडला याचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. डालरिंपल यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा प्रसार जगभरातील अनेक प्रांतात झाला आणि भारतीय संस्कृती ही त्या त्या स्थानिक संस्कृतींमध्ये विलीन झाली. व्यापारी मार्गांच्या माध्यमातून केवळ वस्त्रं, मसाले आणि धातूंचाच व्यापार झाला असे नाही तर संस्कृत साहित्य, राजकीय तत्त्वज्ञान, दैवी श्रद्धा, जीवनशैली यांसारख्या सांस्कृतिक गोष्टींचीही देवाणघेवाण झाली. प्राचीन भारताचे जागतिक दृष्टिकोनातून सांस्कृतिक महत्त्व गोल्डन रोडने अधोरेखित केले आहे.

Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

अधिक वाचा: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?

भारतावर काम करणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित मानले जाते

अलीकडेच विल्यम डालरिंपल यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या आयडिया एक्सचेंजमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना भारतीय इतिहास आणि त्यावरील चर्चा राजकीय विचारधारांनी प्रभावित असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, भारतात इतिहासातील विशिष्ट कालखंडांवर आधारित अभ्यासाला एकतर डाव्या विचारसरणीशी किंवा उजव्या विचारसरणीशी जोडले जाते. उदा., मुघलांच्या इतिहासावर काम करणाऱ्या इतिहासकारांना मार्क्सवादी समजले जाते, तर प्राचीन भारतावर काम करणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित मानले जाते. डालरिंपल यांनी असेही स्पष्ट केले की, इतिहासाचे असे वर्गीकरण चुकीचे आहे, कारण इतिहासाचा अभ्यास सत्य, तथ्ये आणि विश्लेषणाच्या आधारे होणे आवश्यक आहे. केवळ राजकीय विचारधारांच्या प्रभावाखाली या विषयाचे विश्लेषण होऊ नये. त्यांच्या मते, इतिहासाचा अभ्यास खोलवर जाऊन, वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि राजकीय पूर्वग्रह न ठेवता केला पाहिजे. भारतीय इतिहास हा खूप व्यापक आणि समृद्ध आहे, ज्यामध्ये विविध संस्कृती, धर्म आणि विचारांचे योगदान आहे. त्यामुळे, केवळ मुघल इतिहासात रस घेतल्यावर मार्क्सवादी ठरवणे, किंवा प्राचीन भारताबद्दल लिहिले म्हणून रा. स्व. संघाशी (RSS) जोडणे हा एक अतिरेकी विचार आहे. भारतातील इतिहासकारांवर अनेकदा अशी लेबले लावली जातात, ज्यामुळे इतिहासाचा अभ्यास पूर्वग्रहदूषित पद्धतीने होतो.

पुस्तकाचा उद्देश

(William Dalrymple) डालरिंपल यांच्या मते, त्यांच्या पुस्तकाचा उद्देश भारतीय संस्कृतीचे जगावरील प्रभावाचे वास्तव मांडणे आहे. त्यांना फक्त भारतीय इतिहास सांगायचा नसून, भारताबाहेर पसरलेल्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंना जगासमोर मांडायचे आहे. उदाहरणार्थ, बौद्ध धर्माचा प्रसार भारतातून सैबेरिया, मंगोलिया, आणि आग्नेय आशियात झाला. बौद्ध धर्माचा हा प्रवास भारताच्या विचारसरणीचा जागतिक प्रभाव दर्शवतो. त्यात केवळ व्यापार नाही, तर एक सांस्कृतिक देवाणघेवाणही होती. त्यामुळे, डालरिंपल यांनी इतिहासाचा अभ्यास केवळ भारतीय राजकीय विचारधारांशी संबंधित न ठेवता, सखोल आणि जागतिक दृष्टिकोनातून तो इतिहास समजून घेण्यावर भर दिला आहे.

अधिक वाचा: बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

व्यापक सांस्कृतिक एकात्मता

डालरिंपल यांच्या मते, बौद्ध धर्म आणि हिंदू संस्कृतीचा आग्नेय आशियातील प्रसार हा एक असामान्य आणि महत्त्वाचा सांस्कृतिक घटक आहे. बौद्ध धर्माचा प्रसार केवळ धार्मिक प्रचारापुरता सीमित नव्हता, तर ती एक विचारधारा होती, जी तत्कालीन समाजात खोलवर रूजलेली दिसते. बौद्ध भिक्षूंनी आशियाच्या विविध भागात जाऊन शिक्षण, तत्वज्ञान आणि सांस्कृतिक मूल्यांचे आदानप्रदान केले, त्यामुळे तत्कालीन समाजात एक व्यापक सांस्कृतिक एकात्मता तयार झाली. या दृष्टीकोनातून पाहता, बौद्ध धर्म आणि संस्कृत यांचा प्रसार भारताच्या सांस्कृतिक परिचयाचा एक अविभाज्य घटक आहे.

उजव्या विचारधारेच्या व्यक्तींना आवडतं, म्हणून सत्य नाकारणार का?

या पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करणे भारताच्या सांस्कृतिक अभिमानाचा भाग मानले पाहिजे, असे डालरिंपल यांचे मत आहे. प्राचीन भारताचा इतिहास, त्यातील तत्त्वज्ञान, संस्कार, विचारसरणी आणि धर्म – हे जगभरात पसरलेले आहेत आणि हे भारताच्या सांस्कृतिक संपन्नतेचे द्योतक आहे. त्यामुळे, जर काही ऐतिहासिक तथ्ये उजव्या विचारधारेच्या व्यक्तींना आवडतात, तर त्याचा अर्थ असा नाही की, त्या तथ्यांना नाकारले जावे किंवा त्यांचा अनादर केला जावा. ही सांस्कृतिक देवाणघेवाण केवळ व्यापारासाठी नव्हती; ती विचार, कला आणि जीवनशैली यांच्यामधील आदानप्रदान होती. इतिहासाच्या अभ्यासात पूर्वग्रह किंवा राजकीय मते इतिहासाच्या सखोल समजावणीत अडथळा ठरतात. आपण इतिहासाला केवळ एकाच विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला इतिहासाच्या एकसारख्या घटकांचा थोडक्यात किंवा अत्यल्प आढावा मिळतो. डालरिंपल यांच्या मते, इतिहासाचा अभ्यास करताना एक संपूर्ण आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवायला हवा, ज्यात वस्तुनिष्ठता आणि तथ्यांवर आधारित विश्लेषण असेल. त्यांचे हे विचार पुस्तकात देखील प्रतिबिंबित होतात, जिथे त्यांनी भारताबाहेर पसरलेल्या भारतीय विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

अधिक वाचा:  ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?

लाज वाटण्याची गरज नाही

तसेच, इतिहासातील विविध घटनांचा अभ्यास करताना त्या घटनांमधून आधुनिक समाजाने शिकण्यासारखे बरेच काही आहे. डालरिंपल यांचे पुस्तक हे केवळ प्राचीन भारतीय संस्कृतीचे स्तुतिगान नसून, त्या संस्कृतीने जगावर कसा प्रभाव टाकला, हे सांगण्यासाठी आहे. त्यात बौद्ध धर्माची शांती आणि सहिष्णुतेची शिकवण आहे, जी केवळ भारतापुरती मर्यादित न राहता जगभरात पोहोचली. त्यांच्या मते, प्राचीन भारताचा बौद्ध धर्म हा सर्वात प्रभावशाली भारतीय विचार होता, जो सैबेरिया आणि मंगोलियापर्यंत पसरला. ते म्हणतात की, भारतीय इतिहासातील हे पैलू भारतीय संस्कृतीचा अभिमान असायला हवा असे आहेत. यात काही राजकीय पक्षांना आकर्षित करणारे काही मुद्दे असले, तरी त्यांना नाकारण्याची किंवा लाज वाटण्याची गरज नाही.

संपन्न अनुभवांचा गोफ

शेवटी, डलरिंपल यांच्या मते, इतिहास हा एक संपन्न अनुभवांचा गोफ आहे, ज्यात विविध संस्कृती, धर्म, आणि समाज एकत्रित आले आहेत. या दृष्टिकोनातून इतिहास पाहणे केवळ भारतीय संस्कृतीच्या आदानप्रदानाच्या साक्षीदारांना गौरवते एवढेच नव्हे तर हा मानवतेच्या सर्व सामायिक वारशाचा सन्मानच आहे.

Story img Loader