ज्ञानेश भुरे

विश्वकरंडक हॉकी स्पर्धेतील अपयश हॉकी इंडियाच्या जिव्हारी लागले. नेहमीप्रमाणे यात प्रशिक्षकाचा बळी गेला. फरक इतकाच की या वेळी ग्रॅहम रीड स्वतःहून गेले. नव्या शतकात २००९पासून भारतीय हॉकी आणि परदेशी प्रशिक्षक हे समीकरण सुरू झाले. त्यानंतर आतापर्यंत १३ वर्षांत रीड यांच्यासह सात परदेशी प्रशिक्षक झाले. यात रीड सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक वेळ प्रशिक्षक राहिले. घरच्या मैदानावरील अपयशानंतर आता भारतीय हॉकी संघासाठी परदेशी प्रशिक्षकाचा शोध संपणार की कायम राहणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या परदेशी प्रशिक्षकांच्या कारकीर्दीचा हा आढावा.

ms dhoni appointment letter for ticket collectors job in indian railways goes viral
महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या सरकारी नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर होतंय व्हायरल; PHOTO पाहून चाहते म्हणाले, ‘व्वा…”
Hanuma Vihari Leaving AP Cricket Association Politics Leaving Captaincy
Hanuma Vihari : खळबळजनक! भारतीय क्रिकेटपटूला नेत्याच्या मुलावर ओरडणं पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा
Sarfaraz Khan's fans angry with Virender Sehwag's pos
IND vs ENG : जुरेलच्या शानदार खेळीनंतर वीरेंद्र सेहवागने मीडियाकडे ‘ही’ मागणी केल्याने सर्फराझचे चाहते संतापले
Kota School Teacher beat 5-year-old-girl
शिक्षकाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीला जबर मारहाण, हातही मोडला; शिक्षक अटकेत

पहिले परदेशी हॉकी प्रशिक्षक कोण?

भारतीय पुरुष हॉकी संघासाठी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याची सुरुवात नव्या शतकात झाली. तेव्हा जर्मनीचे गेरहार्ड रॅश भारताचे पहिले परदेशी प्रशिक्षक ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ २००४ मध्ये अथेन्स ऑलिम्पिकला सातव्या स्थानावर आला. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने चौथे स्थान मिळविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने १३ सामन्यांत केवळ तीन विजय मिळविले. आठ सामन्यांत भारताचा पराभव झाला आणि दोन सामने अनिर्णित राहिले. यानंतर रॅश यांची हकालपट्टी झाली.

परदेशी प्रशिक्षक नियुक्तीची प्रथा?

स्पेनचे होजे बार्सा हे दुसरे परदेशी प्रशिक्षक ठरले. बीजिंग २००८ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ अपात्र ठरल्यावर बार्सांची नियुक्ती झाली. त्यांच्या कालावधीत २०१० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आठव्या स्थानावर राहिला. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि ग्वांगझू २०१० आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. मात्र, १३ विजयांनंतरही २०१२ लंडन ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळविण्यात भारत अपयशी ठरल्याने बार्सांना हटविण्यात आले. त्यांच्या कालावधीत २४ सामन्यांत भारत केवळ ८ सामने हरले.

विश्लेषण: फुटबॉलमधील ‘रॅशफोर्ड सेलिब्रेशन’ म्हणजे काय? रॅशफोर्डच्या कृतीचा नेमका अर्थ काय?

बार्सांनंतर परदेशी प्रशिक्षकांची कामगिरी कशी राहिली?

भारतीय हॉकीने पुढे ऑस्ट्रेलियाच्या मायकेल नॉब्सना पसंती दिली. त्यांनी लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवून दिली, त्यापूर्वी २०११ मध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपदही मिळविले. पण, लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारत १२व्या स्थानावर राहिले आणि भारताला २०१४ विश्वकरंडक स्पर्धेच्या थेट प्रवेशापासून दूर राहावे लागले. त्यामुळे २६ महिन्यांत ३७ सामन्यांत १२ विजय १६ पराभव, ७ अनिर्णित सामन्यानंतर नॉब्सनाही दूर करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे टेरी वॉल्श आले. त्यांनी जेमतेम १२ महिनेच काढले. त्यांनी भारताला २०१४ इंचेऑन आशियाई स्पर्धेत विजेते केले ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळविला. पण, जागतिक स्पर्धेत साखळीतच आव्हान संपुष्टात आले. वॉल्श यांच्या कालावधीत २४ सामन्यांत ११ विजय, १० पराभव आणि तीन अनिर्णित अशी भारताची कामगिरी होती.

यानंतरच्या परदेशी प्रशिक्षकांची कामगिरी कशी राहिली?

ऑस्टेलियाचे दोन प्रशिक्षक अनुभवल्यावर भारताने २०१५ ते २०१८ तीन वर्षांत नेदरलॅण्डसच्या प्रशिक्षकांचा अनुभव घेतला. यात सर्व प्रथम पॉल व्हॅन ॲस यांची निवड झाली. ते सहाच महिने टिकले. अझलन शाह २०१५ स्पर्धेत भारत कांस्यपदकाचे मानकरी राहिल्यावर ॲस यांना बदलण्यात आले. त्यांची जागा रोलॅण्ड ऑल्टमन्स यांनी घेतली. तोपर्यंतच्या परदेशी प्रशिक्षकांत ऑल्टमन्स यांचा कालावधी सर्वाधिक ३७ महिन्यांचा राहिला. रियो ऑलिम्पिकसाठी सहा महिन्यांचा अवधी असताना ऑल्टमन्स प्रशिक्षक झाले. या स्पर्धेत भारत आठव्या स्थानावर राहिला. चॅम्पियन्स करंडक २०१६ स्पर्धेत भारताने रौप्यपदक मिळविले. हॉकी वर्ल्ड लीग २०१५ मध्ये भारत कांस्यपदक विजेते राहिले. ऑल्टमन्सच्या कारकीर्दीत ५६ सामन्यात २७ विजय, २१ पराभव, ८ अनिर्णित अशी भारताची कामगिरी राहिली. पण, संघटनेच्या संघर्षात त्यांचीही गच्छंती झाली आणि त्यांची जागा नेदरलॅण्ड्सच्याच शुअर्ड मरिने यांनी घेतली. अर्थात, मरिने आधी महिलांचे प्रशिक्षक होते. त्यानंतर त्यांची निवड पुरुष संघासाठी झाली. मरिनेंचा कालावधी ९ महिन्यांचाच राहिला. राष्ट्रकुल २०१८ स्पर्धेत भारत पदकापासून वंचित राहिला. हॉकी इंडियाला न कळवता ते रजेवर गेले ते कायमचेच.

विश्लेषण: भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे जेतेपद ऐतिहासिक का ठरले?

ग्रॅहम रीड यांना सर्वात यशस्वी प्रशिक्षक मानता येईल का?

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी ग्रॅहम रीड यांचा कालावधी सर्वाधिक म्हणजे ४४ महिने राहिला. या कालावधीत ८५ सामने खेळताना भारताने ५१ विजय मिळविले. भारताचा २१ सामन्यात पराभव झाला, तर १३ सामने अनिर्णित राहिले. ऑलिम्पिक कांस्यपदक हा त्यांच्या यशातला सर्वात मोठा क्षण होता. याखेरीज एफआयएच मालिकेतील २०१९ मधील विजेतेपद, राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेतील रौप्यपदक, एफआयएच प्रो-लीग २०२१-२२ मधील तिसरा क्रमांक असा त्यांच्या यशाचा चढता आलेख होता. ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, घरच्या मैदानावर झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या एका पराभवाने त्यांना व्हिलन बनवले. विश्वचषक स्पर्धेत भारताने केवळ तेवढाच सामना गमावला. सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षक राहिलेल्या रीड यांच्या कारकीर्दीतला हा एकमेव पराभव भारताच्या जिव्हारी लागला.