दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे म्हणून साजरा केला जातो. उजव्या हाताने लिहिणाऱ्यांच्या जगामध्ये डाव्या हाताने लिहिणाऱ्यांसाठी हा दिवस साजरा केला जातो. डावखुऱ्या व्यक्तांनी या उजव्या हाताने लिहिणाऱ्यांच्या जगात दैनंदिन आयुष्यात कोणत्या अडचणींचा समाना करावा लागतो हे जाणवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी डावखुरेपणा साजरा केला जातो असं गंमतीने म्हटलं आहे. १९७६ साली सर्वात आदी लेफ्ट हॅण्डर्स इंटरनॅशन आयएनसीचे संस्थापक डॅन आर कॅम्पाबेल यांनी पहिल्यांदा लेफ्ट हॅण्ड दे साजरा केला होता. त्यानंतर दरवर्षी १३ ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा हे फोटो >> टाटा, मोदी, तेंडुलकर, बच्चन, ओबामा, आइन्स्टाइन, न्यूटन, अन्…; Left Handed सेलिब्रिटींची यादी

एका अभ्यासानुसार जगातील १० टक्के लोकसंख्या ही डावखुरी आहे. त्यातही पुरुषांचे प्रमाण हे महिलांपेक्षा अधिक आहे. इंडियन लेफ्ट हॅण्डर्स क्लबच्या माहितीनुसार महात्मा गांधी, मदर तेरेसा, नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, रजनीकांत, सचिन तेंडुलकर, उद्योजक रतन टाटा हे डावखुरे आहेत. जागतिक स्तरावरील प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींबद्दल बोलायचं झाल्यास गतिशास्त्रावरील निष्कर्ष आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे आयझॅक न्यूटन, प्रसिद्ध फ्रेंच योद्धा नेपोलियन बोनापार्ट, चित्रकार पाबलो पिकासो, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तसेच मुलाखतकार ओपरा विन्फ्रेसुद्धा डावखुऱ्या आहेत.

मागील अनेक काळापासून डावखुऱ्यांना अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. अनेक देशांमध्ये एखादी व्यक्ती डावखुरी असणं हे अशुभ मानलं जातं. डावखुऱ्या व्यक्तीला तुच्छ लेखलं जातं. भारतामध्येही काही प्रमाणात असं घडलं. तसेच काही ठिकाणी डावखुरेपणा हा आजार असल्याचं समजून त्यावर इलाज करण्याचे प्रकारही घडल्याची नोंद आहे.

केवळ सामान्य नाही तर प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींनाही हा भेदभाव सहन करावा लागलाय ब्रिटनचा माजी मोनार्क जॉर्ज सहावे हे जन्मापासून डावखुरे होते. मात्र त्यांना उजव्या हातानेच लिहावं लागायचं. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘द किंग्स स्पीच’ या त्यांच्या जीवनावरील चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्यांना बोलण्याची अडचण निर्माण होण्यामागे हे उजव्या हाताने लिहिण्याचं प्रेशर कारणीभूत ठरल्याचं मानलं जातं.

आजही रोजच्या दैनंदिन जिवनामधील लहान लहान गोष्टीही उजव्या हाताच्या व्यक्तींचा विचार करुनच बनवल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने कात्री, कीबोर्ड, डेस्क, गीटर अगदी व्हिडीओ कन्सोलरही उजव्या हाताच्या व्यक्तींना वापरण्यास योग्य ठरतील या दृष्टीकोनातून बनवले जातात. त्यामुळेच डावखुऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील या साध्या साध्या गोष्टीही किती क्लिष्ट होऊन बसतात हे दर्शवण्यासाठी आणि त्याची जाणीव उजव्या हाताने लिहिणाऱ्यांना व्हावी म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.